हिरो मोटोकॉर्पच्या स्कूटरची विक्री मंदावली आणि अश्यातच ‘ही’ नवीन बाईक लाँच, वाहन विक्री-अहवाल

Aishwarya Potdar

हिरो मोटोकॉर्प – भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादकने या नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांचा वाहन विक्री अहवाल जाहीर केला आहे, फेब्रुवारीमध्ये ईयर-ओवर-ईयर हिरो मोटोकॉर्पची विक्री 19% वाढली असून, या वाहन-विक्रीमध्ये स्प्लेंडर, डेस्टिनी, करिझ्मा, ग्लॅमर सारख्या दुचाकी वाहनांची विक्री करते. (Hero MotoCorp YoY Sales)

अलीकडे Hero ने नव्या फ्लॅगशिप Xtreme 125R आणि Mavrick 440 ला लाँच केल असून, Mavrick ची डिलिव्हरी एप्रिल 2024 मध्ये सुरू होणार आहे. हिरो मोटोकॉर्पच्या ह्या नव्या मोटरसायकलची स्पर्धा थेट होंडा, TVS आणि सुझुकीशी होणार आहे. चला जाणून घेयूया हिरो मोटोकॉर्पच्या विक्री अहवालाबद्दल आणि हिरो मोटोकॉर्पच्या नव्या लाँचिंगबद्दल माहिती. Hero MotoCorp MoM Sales.

हिरो मोटोकॉर्प YoY सेल

फेब्रुवारी 2023 मध्ये Hero MotoCorp Motorcycles ची तब्बल 3,71,854 युनिट्सची विक्री झाली होती, तर त्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 4,36,929 युनिट्स विकल्या गेल्या. मागील वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 17.50 टक्क्यांनी जास्त मोटरसायकल विकल्या गेल्या आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
फेब्रुवारी 2023 मध्ये Hero Motocorp Scooter चे तब्बल 22,606 युनिट्स विकले गेले होते, तर त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये  स्कूटरचे 31,481 युनिट्स विकले गेले आहेत,थोडक्यात गतवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 39.26 टक्क्यांनी हिरो मोटरकॉर्पच्या स्कूटरची विक्री वाढ झालेली आहे.

 

डोमेस्टिक प्लॅटफॉर्मवर हिरो मोटरकॉर्पने फेब्रुवारी 2023 मध्ये 3,82,317 युनिटची विक्री केली होती, तर फेब्रुवारी 2024 मध्ये 4,45,257 युनिट ची विक्री केलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्री जवळपास 16.46 टक्क्यांनी जास्त आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर फेब्रुवारी 2023 मध्ये या कंपनीने 12,143 युनिट्सची विक्री केली होती आणि फेब्रुवारी 2024 मध्ये 23,153 युनिट्स विकले गेलेले आहेत , 2024 मध्ये जवळपास 90.67 टक्क्यांनी वाहन विक्री एक्स्ट्रा झालेली आहे. या कंपनीने ईयर-ओवर-ईयर ग्रोथ मध्ये जवळपास 18.75 टक्क्याने वाहन विक्री ज्यादा केलेली आहे.

हिरो मोटोकॉर्प MoM सेल

जानेवारी 2024 मध्ये हिरो मोटोकॉर्प मोटरसायकलच्या 4,02,056 युनिट्सची विक्री झाली होती, तर त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 4,36,929 मोटरसायकल विकल्या गेलेल्या आहेत जवळपास हा मंथ-ओवर-मंथ सेल 8.67% ने वाढलेला आहे. जानेवारी 2024 मध्ये हिरोच्या स्कूटर च्या तब्बल 31,542 युनिटची विक्री झाली होती ,तर त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 31,481 स्कूटरची विक्री झालेली आहे, अर्थात 2024 मधल्या एका महिन्यामध्ये स्कूटरची विक्री ही जवळपास 0.19 टक्क्यांनी कमी झालेली आहे.

डोमेस्टिक प्लॅटफॉर्मवर जानेवारी 2024 मध्ये तब्बल 4,20,934 युनिट्स विकले गेले होते आणि फेब्रुवारी 2024 मध्ये 4,45 ,257 युनिट जास्त विकले गेलेले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये जवळपास 2432 युनिट्स जास्त विकले गेलेले आहेत अर्थात या कंपनीच्या  वाहनांची डोमेस्टिक प्लॅटफॉर्मवर 5.78 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर या कंपनीने जानेवारी 2024 मध्ये 12,664 युनिट्सची विक्री केली होती त्याच तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये 23,153 युनिट्सची विक्री झालेली आहे म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये जवळपास 10,489 युनिट्सची विक्री जास्त झालेली आहे. मंथ-ओवर-मंथच्या विक्री अहवालानुसार हिरो मोटरकोर्पने तब्बल 8.03 टक्क्यांनी जास्त वाहन-विक्री केलेली आहे.

हिरो मावरिक 440

हिरोची सर्वात ‘प्रीमियम बाईक’ झाली लॉन्च झाली असून, 1.99 लाखापासून सुरु होणाऱ्या किंमतीची हि प्रीमियम बाईकची एप्रिलमध्ये डिलिव्हरी सुरु होणार आहे. या बाईकचे तीन व्हेरिएंट्स लॉन्च झाले आहेत, बेस, मिड आणि टॉप. या बेस व्हेरिएंट्सची किंमत 199,000/-,मिड व्हेरिएंट्सची किंमत 214,000/- आणि टॉप व्हेरिएंट्सची 224,000/- इतकी आहे. बाइकमध्ये दिलं गेलेलं इंजिन ‘TorqX’ इंजिन एअर-कूल्ड आहे. मावरिक 440 मधलं सिंगल-सिलेंडर इंजिन 440cc चे आहे. हीरो मोटोकॉर्प मावरिक 440 फिचर्सने भरपूर आहे. 15 मार्चपूर्वी Mavrick 440 चे तुम्ही जर बुकिंग केले तर तुम्हाला फ्री ऍक्सेसरीझसुद्धा मिळवू शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version