Honda Livo भारतात लाँच, 109cc इंजन, जबरदस्त मायलेज आणि कमी किंमत यामुळे तुफान बुकिंग्स

2023 Honda Livo: HMSI म्हणजे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया ने लिवो या बाईकला अपडेट करत पुन्हा एकदा भारतीय मार्केट मध्ये लाँच केली आहे. या नवीन अपडेट मध्ये बाईकच्या इंजिन मध्ये महत्वपूर्ण बदल केले गेले आहेत. CD110  या बाईकच्या अपडेट केलेल्या वर्जनला लाँच केल्यानंतर कंपनीने “होंडा लिवो” १०० सीसी क्षमतेच्या मोटरसायकल ला लाँच केले आहे. या आर्टिकल द्वारे तुम्हाला होंडा लिवोची महाराष्ट्रातील किंमत ते नवीन फीचर्स याबद्दल पुढे माहिती सांगितली जाणार आहे.

2023 Honda Livo Updated Features

Athletic Blue Metallic dev one

लिवो २०२३ मॉडेल मध्ये गाडीच्या डिजाईनला नवीन लुक देण्यासाठी ग्राफिक्स बदलण्यात आले आहेत या शिवाय फ्रंट वायजर आणि तेल लॅम्प व्यतिरिक्त गाडीच्या संपूर्ण भागावर कसले हि रिडिजाइन करण्यात आले नाही. असे असले तरी लिवो होंडाच्या पारंपरिक डिजाइन स्टाईलशी मेळ खाते. लिवो ११० मुख्यतः अर्बन स्टाईल साठी बनवली असून यामध्ये ग्राफिक डिजाईन देखील कंपनीने तश्याच पद्धतीची दिली आहे हे फोटोच्या माध्यमातून समजते.

होंडा लिवो मध्ये ग्राहकांना आता नवीन कलर्सचे ऑपशन्स दिले गेले आहेत ज्यामध्ये पहिला असेल एथलेटिक ब्लू मेटैलिक, दूसरा असेल मैट क्रस्ट मेटैलिक और तीसरा असेल ब्लैक, हे तीन कलर्स गाडीच्या लुकला वेगळ्या उंचीवर नेतात.

गाडीला स्पोर्टी बनवण्यासाठी कंपनीने इथे कष्ट घेतले आहेत. मस्क्युलर पेट्रोल टॅंक आणि त्याला जोडलेले शार्प विंग्स हे गाडीच्या स्पोर्ट लुकला ईन्हान्स करतात. ट्यूब लेस टायर सह १८ इंच अलॉय व्हील्स या गाडीत देण्यात आले आहेत. लिओ मध्ये आता सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंटल कंसोल ज्यामध्ये अनालॉग स्पीड मीटर आणि डिजिटल ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि फ्युएल गेज दिले आहे. या व्यतिरिक्त गाडीमध्ये टेलीमेट्री, सायलेंट स्टार्ट, एसपी टेक्नोलॉजी, लांब मोठे आरामदायी सीट, PGM-FI system with sensors, ब्रेक साठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सारखे ऍडव्हान्स फीचर्स ऍड करण्यात आले आहेत.

भारतीय ग्राहकांच्या बजेट फ्रेंडली विचारांचे स्वागत करून होंडा लीवो ला इकोनॉमिकल बनवण्यात आली आहे. हि गाडी 109.51 cc इंजन सोबत येते जी या सेगमेंट मध्ये येणाऱ्या अन्य कंपन्यांच्या वाहनांना आव्हान देते.

वाचा – Top 5 EV Scooters in 2023- या वर्षा अखेरीस लाँच होणाऱ्या ‘टॉप ५’ इलेक्ट्रिक स्कूटर

Body Dimensions

Matt crust metallic dev two

  • Length – 2020 mm
  • Width Drum – 742 mm, Disc – 751 mm
  • Height – 1116 mm
  • Wheel Base – 1278 mm
  • Ground Clearance – 163 mm
  • Kerb Weight Disc/Drum – 113 kg
  • Seat Height – 790 mm
  • Fuel Tank Capacity – 9 L

होंडा लिवो प्राईज (महाराष्ट्र)

होंडा लिओ ची महाराष्ट्रात एक्स शोरूम किंमत ₹७९,६०० रुपयांपासून सुरु होते. लिवो मध्ये ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक असे दोन ऑपशन्स आहेत यामध्ये कोणत्या वारिएंट ची किती किंमत आहे हे पुढे सांगितले आहे.

CityModelEx-Showroom
PuneLivo DrumRs.79600
Livo DiscRs.83600

 

ऑन-रोड किंमत – 

तुम्ही ड्रम व्हेरिएंट घेतले तर महाराष्टरातील शहरांमध्ये रोड किंमत ₹१,००,००/- इतकी होते आणि डिस्क व्हेरिएंट घेतले तर त्याची किंमत ₹१,०४,५३०/- रुपये होते. लिवो ड्रम ची किंमत लिवो डिस्क व्हेरिएंट पेक्षा ४.५ हजारांनी कमी आहे. लिवो वर कंपनीतर्फे वेगवेगळ्या बँकांचे लोन सुद्धा उपलब्ध आहे.

वाचा – जुनी गाडी घेताना काय महत्वाचे असते, किलोमीटर रिडींग किंवा वय – वाचा सविस्तर

होंडा लिवो इंजिन स्पेक्स, मायलेज & Broucher Download

लिवो ११० ला पॉवर देण्यासाठी 109.51 cc एयर कूल्ड BS-VI OBD-2 compliant इंजन दिले आहे जे पॉवरच्या बाबतीत जबरदस्त आहे. हे इंजिन 8.79 PS @ 7500 rpm आणि 9.30 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन स्टार्ट करण्यासाठी होंडाने त्यांची Silent start with ACG टेक्नोलोंजि दिली आहे ज्याने गाडी स्टार्टचा आवाज होता नाही. या इंजिनला ४ गेअर ट्रान्समिशन जोडले आहे. गाडी मध्ये ९ लिटर ची पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी दिली आहे तसेच गाडीचे संपूर्ण वजन ११३ किलो दिले आहे. होंडा लिवो चे मायलेज ७४ kmpl इतके आहे.

Engine

  • TypeAir Cooled, 4 Stroke, SI, BS-VI Engine
  • Displacement – 109.51 cc
  • Max Engine Output – 6.47 KW @ 7500 rpm
  • Max Torque – 9.30 N-m @ 5500 rpm
  • Fuel System – PGM-FI
  • Bore x Stroke (mm) – 47 x 63.121
  • Compression Ratio – 10.1:1
  • Starting Method – Self/Kick
  • Milage – 74 KMPL

संपूर्ण गाडीला होंडाने ३ वर्ष वॉररंटी दिली आहे जी ऑपशनल पॅक ने १० वर्षापर्यंत वाढवता येते.

इथून – E-Broucher Download करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment