भारतात लाँच झाली TVS ची Apache RTR 160 4V 2024, मिळणार ई-बाईक सारखे ३ रायडींग मोडस

2024 TVS Apache RTR 160 4V Marathi: पेट्रोल स्कूटर आणि इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी “टीव्हीएस मोटर्स” ने गोव्यात सुरू असणाऱ्या बाईक विक 2023 मध्ये नवीन अपडेट सह TVS Apache RTR 160 4V लाँच केली असून या गाडीची ऑफिशियल बुकिंग सुरू झाली आहे.

Apache RTR 160 4V 2024: लाँच आणि डिलिवरी डेट

टीव्हीएस मोटर इंडिया ने शनिवारी, 9 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण भारतात Apache RTR 160 4V 2024 लाँच केली असून गाडीचे बुकिंग सुरू झाले आहे. नवीन आपचे बाईकची डिलिवरी 2024 च्या पहिल्या तिमाहीत सुरू केली जाणार आहे.

2024 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4v: नवीन अपडेट्स

नुकत्याच लाँच झालेल्या या नेकेड प्रकारच्या बाईक मध्ये फक्त लाइटनिंग ब्लू हा एकच कलर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त गाडीमध्ये डुअल-चैनल एबीएस सिस्टम, अर्बन, रेन आणि स्पोर्ट हे तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. गाडीमध्ये SmartXconnect सह स्मार्टफोन ब्लूटूथ कनेक्टिविटी, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, एलईडी हेडलैंप, व्हॉईस असिस्टंट, कॉल आणि एसएमएस अलर्ट, क्रॅश अलर्ट, टर्न बाय टर्न नेवीगेशन सिस्टीम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

पुढे टेलिस्कॉपिक आणि पाठीमागे मोनो सस्पेंशन, ब्रेक साठी अडजस्टेबल लिव्हर दिला आहे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 180 mm इतका असून 12 L पेट्रोल टँक दिला आहे.

Apache RTR 160 4V मध्ये नवीन पुढील ब्लू शेड फेंडर, नवीन हेडलॅम्प काउल, इंजिन काउल सीट पॅनेलच्या खालीबसवण्यात आला आहे.गाडीमध्ये नवीन स्पोर्टी ग्राफिक्स देखील दिले आहेत. नवीन सीट रेड अँड ब्लॅक रंगाचे सीट कव्हर्स आणि संपूर्ण रेड अलॉय व्हील्स अपडेट करण्यात आले आहेत.

इंजिन पॉवर

2024 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4v मध्ये 160 cc 4 वाल्व्ह सिंगल सिलेंडर SI, 4 स्ट्रोक,ऑइल कुल्ड, SOHC इंजिन दिले असून हि मशीन स्पोर्ट मोडमध्ये 17.75 पीएस ची पीक पावर आणि 14.73 एनएम पीक टॉर्क जेनरेट करते. अर्बन आणि रेन मोडमध्ये आउटपुट 15.64 पीएस आणि 14.14 एनएम आहे. इंजिन 5-स्पीड गियरबॉक्सने जोडलेला आहे.. इंजिनला 5-स्पीड गियरबॉक्सशी जोडले आहे. आरटीआर 160 4v चा ताशी वेग 140 kmph देण्यात आला आहे.

वाचा – 2024 Kawasaki W175 Street भारतात लाँच, किंमत आणि सर्व फीचर येथे जाणून घ्या

2024 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4v किंमत महाराष्ट्र 

नवीन लाँच झालेली टीव्हीएस अपाचे आरटीआर 2024 मॉडेलची महाराष्ट्रात एक्स-शोरूम किंमत 1 लाख 35 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. जर ऑन-रोड किमतीचा अंदाज बांधायचा म्हटलं तर या गाडीची अंतिम किंमत 1 लाख 60 हजार रुपये असेल.

वाचा – होंडाची पहिली EM1 इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच, सर्व माहिती आली समोर

या प्रतिस्पर्धी वाहनांना देणार टक्कर

नवीन TVS Apache RTR 160 4V ची स्पर्धा Honda CB Hornet 2.0 आणि Hero Xtreme 160R या वाहनांशी होईल.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment