TVS ने दिली नवरात्रीची भेट, मोठ्या TFT डिस्प्लेसह TVS Jupiter 125 लाँच, फक्त या किमतीत

 TVS Jupiter 125: भारतीय दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस ने नवरात्रीच्या शुभ दिवसांत ग्राहकांसाठी खास नवरात्री भेट दिली आहे. टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर १२५ ला २०२३ साचा सर्वात मोठा अपडेट मिळाला असून हि स्कूटर आता पहिल्याच्या टुनेर अधिक फीचर्स ने समृद्ध झाली आहे. नवीन माहिती नुसार टीव्हीएस ने ज्युपिटर १२५ मध्ये मोठा टीएफटी डिस्प्ले आणि इतर कन्विनिएंट फीचर्स जोडले आहेत. टीव्हीएस ज्युपिटर १२५ ला कंपनीने अपडेट केल्यानंतर ₹ 98 730 (एक्स शोरूम) रुपयांच्या किमतीत सादर केले आहे.

Jupiter125 1178

TVS Jupiter 125 SmartXonnect specifications

टीव्हीएस ज्युपिटर १२५ च्या नवीन मॉडेल मध्ये SmartXonnect ची सुविधा जोडली असल्याने हे व्हेरिएंट आता SmartXonnect रूपात ओळखले जाणार आहे. यामध्ये ६ रंगाचे ऑपशन्स आणि ४ ट्रीम्स चे प्रकार दिले जातील, ग्राहक आपल्या बजेट आणि पसंतीच्या फीचर्स नुसार ज्युपिटर निवडू शकतात. टीव्हीएस ज्युपिटर १२५ मध्ये १२४.८ सीसी चे BS6 इंजन दिले आहे. या गाडीचे संपूर्ण वजन १०८ किलो इतके सून ५ लिटर ची पेट्रोल टाकी या गाडीत दिली जाते. एक लिटर मध्ये हि गाडी ५० किलोमीटर चे अव्हरिज प्रदान करते ज्याने एकदा टाकी फुल केली कि गाडी २५० किमी प्रवास करेल. १२५ सीसी मॉडेल सोबत टीव्हीएस ने एलिगेंट रेड और मैट कॉपर ब्रॉन्झ हे २ नवीन रंग सादर केले आहेत.

Call and WA revised 2

पुढच्या बाजूला टेलेस्कोपिक तर पाठीमागे मोनो शॉक सस्पेन्शन दिलेले आहे ज्याने भारतीय रोड वर हि गाडी चांगला कम्फर्ट प्रदान करेल.

tvs

TVS Jupiter 125 SmartXonnect फीचर्स

जुपिटर १२५ हे टीव्हीएस कंपनीचे नविन प्रोडक्ट आहे, यामध्ये नविन बॉडी फ्रेम नविन इंजिन आणि नविन फीचर्स अपडेट केले आहेत. SmartXonnect व्हेरिएंट मध्ये तर कंपनीने नवीन इन्ट्रुमेन्ट डिस्प्ले आदर केला आहे ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, ई-मेल नोटिफिकेशन, व्हॉइस असिस्टेड टूर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टिम सारखे ऍडव्हान्स सुविधा दिल्या आहेत. या व्यतिरिक्त सोशल मीडिया, शॉपिंग, फूड डिलिव्हरी अँप्स चे नोटिफिकेशन देण्याची सुविधा देखील यामध्ये दिली जाते. डिस्प्ले मध्ये स्पिडो मीटर, टेको मीटर, पेट्रोल गेज, सर्विस रिमायंडर, टाइम, न्युज अपडेट सारखे फीचर्स दर्शवतो.

FeatureDescription
Engine124.8cc, BS6
PowerApprox. 8.2 bhp
Torque10.5 Nm
Fuel SystemCarburetor
TransmissionCVT
Weight108 kg
Fuel Tank Capacity5.1 liters
MileageUp to 50 km/liter
Brakes (Front)220mm Disc
Brakes (Rear)130mm Drum
Suspension (Front)Telescopic Forks
Suspension (Rear)Mono-Shock with 12-inch Wheels
Instrument ClusterSmartXonnect with Smartphone Connectivity
ConnectivityCall Alerts, SMS Alerts, Email Notifications, Voice Assist, Turn-by-Turn Navigation
Additional AlertsSocial Media and Food Shopping Apps Alerts
Safety FeaturesFollow-Me Headlamp, Hazard Lights
StorageUnder-Seat Storage: 33 liters (Can accommodate two helmets)
Color Options6 (Including Elegant Red and Matte Copper Bronze)
Price (Ex-Showroom)₹96,855

 सेफ्टी

टीवीएस जूपिटर 125 SmartXonnect मध्ये प्राथमिक २ सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत. यामध्ये फॉलो-मी हेडलॅम्प आणि हजार्ड लाईट या दोन सुविधा दिल्या आहेत.

वाचा – सफारीला टक्कर द्यायला टोयोटा लाँच करणार नवीन एसयूव्ही, कोडनेम – 340D

स्टोरेज स्पेस

UnderSeat

टीव्हीएस च्या या नवीन स्कूटर मध्ये ३३ लिटर चा स्टोरेज स्पेस दिला जातो ज्यामध्ये तुम्ही हेल्मेट, भाजीच्या पिशव्या, किराणा सारखे सामान ठेवू शकता.

इंजिन

Engine

टीव्हीएस ज्युपिटर स्मार्ट एक्सकनेक्ट ट्रिम च्या इंजिन मध्ये कोणतेच बदल कंपनीने केलेले नाहीत पूर्वी प्रमाणेच १२४.८ सीसी चे सीव्हीटी ट्रान्समिशन सिस्टिम सह एअर कूल्ड इंजिन दिले जाते. हे इंजिन ८.२ बीएचपी पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

ब्रेकिंग सिस्टिम

टीव्हीएस ने या स्कूटर मध्ये पुढच्या बाजूला 220mm डिस्क दिली आहे आणि पाठीमागच्या चाकाला 130mm ड्रम ब्रेक दिला आहे. गाडीच्या दोन्ही बाजूला १२ इंचाचे व्हील्स आणि ट्यूब लेस टायर दिलेले आहेत.

टीव्हीएस ज्युपिटर १२५ महाराष्ट्रातील किंमत

ज्युपिटर १२५ ची महाराष्ट्रात ट्रिम प्रमाणे किंमत –

  • Drum – Alloy ₹ 88 255
  • Disc ₹ 92 030
  • SmartXonnect ₹ 98 730
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment