‘अंत’ जवळ आलाय यामाहा R1 आणि R1M चा, जाणून घ्या काय आहे कारण

Published:

सुपरस्पोर्ट मोटारसायकल यामाहा आता लोकप्रिय मॉडल ‘YZF-R1 आणि YZF-R1 M हि पॉप्युलर बाईक बंद’ करणाऱ्यांची बातमी पसरत आहे, सोबत 2024 च्या अखेरीपर्यंत या लिटर-क्लास सुपरबाइकची विक्री फक्त जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्येच होणार आहे. यामोहाच्या इतक्या मोठ्या निर्णयामागचं कारणही तितकंच गंभीर आहे. चला जाणून घेऊया नक्की का यामाहा स्पोर्ट मोटारसायकल का बंद होणार आहेत, या मोटारसायकल इतके लोकप्रिय असणारे कारण आणि या स्पोर्ट मोटारसायकलचे फीचर्स खालील लेखात.

Yamaha Motor India

यामाहा मोटर कंपनी निर्मित YZF-R1 आणि Yamaha YZF-R1 ची माहिती घेता, 1998 मध्ये लाँच झालेल्या आणि 998 cc चे इंजिन असणाऱ्या या दोन्ही स्पोर्ट्स बाईकला गेल्या अनेक वर्षात विविध अपडेट्स मिळाले, या स्पोर्ट्स मोटरसायकलमध्ये 998 cc चे इंजिन दिलं गेलं आहे.

वाचा: ‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

यामाहा R1 ‘या’ कारणामुळे बंद

यामाहाच्या या दोन मोटोरसायकल बंद करण्याचे महत्वाचे कारण असे सांगितले जातेय कि, गेल्या वर्षांपासून लागू केलेला कडक Euro5+ उत्सर्जन नियम. याचसोबत असहीदेखील बोलल जातंय कि, यामाहाचे मॉडल YZF-R1 आणि YZF-R1 M चा उत्पादनाचा खर्च जास्त आणि विक्री कमी असल्याने या दोन्ही मॉडेल्स आता बंद होण्याची शक्यता आहे.

Euro5+ एमिशन स्टॅण्डर्ड

सरकारने गेल्या एप्रिल 2023 पासून हा नवीन उत्सर्जन नियम -कडक Euro5+ उत्सर्जन नियम लागू केला आहे.या नियमांतर्गत वाहनांमधून होणारे उत्सर्जन रिअल टाइममध्ये जाते.ज्यासाठी वाहनांमध्ये विशेष उपकरणे बसवावी लागतात. हे नियम पाळण्यासाठी वाहनेअपडेट करणे आवश्यक आहे.

यामाहा YZF-R1 आणि R1M फीचर्स

यामाहा YZF-R1 आणि R1M चे डिझाइन जवळपास सारखे आहे. या मोटोरसायकलमधल्या फीचर्समध्ये फ्रंट फेअरिंगच्या आकारात एकत्र होणारे डीआरएल आणि प्रोजेक्टर हेडलॅम्पचा समावेश आहे. ब्रेक लाईट्स, इंडिकेटर स्लिम एलईडी युनिट्स दिले गेले आहे. YZF-R1 आणि R1M बाईकच्या कॉमन फीचरमध्ये डिजिटल टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. YZF-R1 चे सस्पेंशनसाठी इनवर्टेड फोर्क्स पुढे आणि मागे मोनो-शॉक यूनिट दिले गेले आहे तर R1M ला समोरील बाजूस इलेक्ट्रोनिकली ॲडजस्टेबल ओहलिन शॉक मिळतात.

या दोन्ही टू-व्हीलरमध्ये ब्रेकिंग सिस्टीममध्ये फ्रंटला ड्युअल-डिस्क आणि रिअरला सिंगल-डिस्कची आहे. लीन सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, स्लाइड कंट्रोल, लिफ्ट कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, अपशिफ्ट क्विक-शिफ्टिंग आणि लिंक्ड एबीएस यासारखे फीचर्स आहेत.

वाचा: भारतात मारुती एर्टिगा हायब्रीड कधी येणार? हायवे कारला मिळतेय ईव्हीपेक्षा परवडेल असे मायलेज

यामाहा YZF-R1 आणि R1M इंजिन

दोन्ही बाईकमध्ये 998CC, लिक्विड कूल्ड, इन-लाइन 4-सिलेंडर इंजिन दिल गेलं आहे, जे 13,500rpm वर 200PS पॉवर आणि 11,500rpm वर 112.4Nm कमाल टॉर्क निर्माण करते. YZF-R1 आणि R1M ची किंमत अनुक्रमे 20.39 लाख आणि 29.43 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

2020 Yamaha R1 and R1M. R History. Your Future. We R1.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version