VIDA EV scooter: विदाची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 1 लाखाच्या आतमध्ये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published:

नामांकित इलेक्ट्रिक स्कूटर मेकर कंपनी हिरो मोटोकॉर्प लवकरच नवीन विदा ईव्ही स्कूटर लाँच करण्याच्या मार्गावर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 1 लाखाच्या आतील किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. प्रीमियमनेस आणि कमालीची रेंज असणारी ही विदा इलेक्ट्रिक स्कूटर भारतामधील बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर च्या यादीत बसणारी आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तुम्हाला जर ह्या स्कूटरची माहिती जाणून घ्यायची असेल तर सदर माहिती संपूर्ण वाचा.

आगामी परवडणारी विदा इलेक्ट्रिक स्कूटर

विदाच्या लोकप्रिय मॉडेल्स मध्ये विदा V1 जिची किंमत 1.29 लाख आणि V1 Pro जिची किंमत 1.50 लाख इतकी आहे अश्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे, आणि यानंतर ही कंपनी किफायतशीर किंमतीमध्ये अजून एक मॉडल लाँच करत आहे, ज्याची किंमत या दोन्ही स्कूटरच्या तुलनेत कमी आहे, ह्या स्कूटरला विदा EVs ची नवीन श्रेणी किंवा आगामी परवडणारी विदा इलेक्ट्रिक स्कूटर अस नाव देण्यात येत आहे.

वाचा: ‘पेट्रोलविना चालणारी’ Maruti WagonR, आता लाँच होतंय वॅगन-आरचे Electric वर्जन, वाचा संपूर्ण माहिती

Hero MotoCorp कंपनीची नवीन विदा इलेक्ट्रिक स्कूटर ही PLI पीएलआय योजना साठी पात्र ठरली असून, ज्या योजनेद्वारे ही कंपनी अधिक इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन करू शकेल,शिवाय या उत्पादनाचा खर्चही कमी प्रमाणात होऊ शकेल. यासोबत या कंपनीने विदा च्या इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी रोडवर इलेक्टिक चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर एथर एनर्जी या कंपनीसोबत भागीदारीसुद्धा केली आहे, ह्या भागीदारीद्वारे भारतामध्ये 2,000 पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन उभारले जाण्याची आशा आहे.

हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर- विदा

हिरो मोटोकॉर्पची टॉपसेलर विदा V1 हिची किंमत 1,29,900 एक्स शोरूम इतकी आहे, तर बेस्टसेलर विदा V1 pro हि स्कूटर 1.50 लाख या किंमतीमध्ये मिळते. विदा V1 ह्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5 रंग उपलब्ध आहेत, ह्या स्कूटरची बॅटरी 3.94 kWH लिथियम आयन बॅटरी असून एका चार्जमध्ये ही बॅटरी 165 किमी इतका पल्ला गाठू शकते. या स्कूटरच्या मुख्य फिचर्समध्ये रायडिंग मोड्स- स्पोर्ट, राइड, इको आणि कस्टम मिळतात, याचसोबत किलेस कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, 7 इंचाची TFT स्क्रीन, LED इल्युमिनेशन, LED टर्न इंडिकेटर सारखे फिचर्स मिळतात. विदा V1 Pro च्या फिचर्समध्ये LED टेल लाइट्स, क्रुझ कंट्रोल आणि मोबाईल कनेक्टिविटीसारखे पर्याय मिळतात. ह्या स्कूटरमध्ये 3.9 kWH ची बॅटरी मिळते, एका चार्जद्वारे ही बॅटरी 80 किमी इतका पल्ला गाठू शकते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment