Ather 450 Apex ची किंमतीमध्ये 6 हजाराची वाढ, काय आहे असं ह्या महागमोल्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये?

Published:

Ather 450 Apex

अथर इलेक्ट्रीक स्कूटरच्या लाइनअप मधली सर्वात वेगवान आणि एडवांस्ड फिचर्सने भरपूर्ण असणारी Ather 450 Apex स्कूटरच्या किंमतीमध्ये 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. ह्या स्कूटरला जानेवारी 2024 मध्ये 1.89 लाख रुपये या किंमतीमध्ये लाँच करण्यात आले होते. आता हीच किंमत 6,000 रुपयांनी वाढून 1.95 लाख झाली आहे. इतक्या महागमोलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये असे कोणते फिचर्स-स्पेसिफिकेशन आहेत? Ather 450 Apex चे बुकिंग कसे करायचे, याची संपूर्ण माहिती खालील माहितीमध्ये दिली आहे.

एथर 450 अपेक्स

ह्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.7 kWh चा लिथियम आयन बॅटरी पॅक आणि 7.0kW इलेक्ट्रिक मोटर आहे, स्कूटरचा टॉप-स्पीड 100 किमी प्रति तास असून PMSM ह्या प्रकारातून मोटर मिळते. स्कूटर एका चार्जमध्ये 157 किमी इतकी रेंज देते पण ही रेंज स्कूटरमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या रेंजवर अवलंबून आहे. स्कूटरमध्ये 6 मोड दिले आहेत; स्मार्ट इको मोडवर 110 km, रायिड मोडवर 95 किमी, स्पोर्ट मोडवर 90 किमी आणि रैप मोड वर 75 किमी इतकी रेंज मिळते, याचसोबत इको आणि रैप प्लस हेही मोड स्कूटरमध्ये मिळतात. घरबसल्या ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची 80% बॅटरी 4 तास 30 मिनिटामध्ये चार्ज होते तर संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी 5 तास 45 मिनिटे लागतात.

स्कूटरच्या वॉरंटीमध्ये 3 वर्षे/30,000 किमी वाहन वॉरंटी, 3 वर्षाची चार्जरची वॉरंटी आणि 5 वर्षाची /60,000 किमी डीफॉल्ट बॅटरी वॉरंटी मिळते. 

एथर 450 अपेक्स फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

एडवांस्ड फिचर्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग आणि रेजनरेटिव ब्रेकिंगचा समावेश आहे. LED हेडलाईट्स, टेललाइट्स  आणि इंडिकेटर दिला असून  22 लिटरची बूट स्पेस दिली आहे. डैशबोर्डमध्ये 17.7 सेमी ची TFT टचस्क्रीन मिळते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसोबत स्कूटरची खरेदी करताना नेव्हिगेशन, डॉक्युमेंट्स स्टोरेज, एथर ॲप, टो आणि द नोटिफिकेशन्स, माय स्कूटर सर्च, राइड रेड स्टेटस,  DM वरून नेव्हिगेशन, शहरांतर्गत सहली नियोजक, सेविंग ट्रॅकर्स सारखे फिचर्स 3 वर्षांसाठी मोफत मिळतात.  

तुम्हाला पडलेले प्रश्न

1. Ather 450 Apex ची भारतात किंमत किती आहे?
  • चार्जर आणि लागू सबसिडीसोबत भारतामध्ये Ather 450 Apex ची एक्स-शोरूम किंमत ₹1,88, 999 आहे.
2. एका चार्जमध्ये Ather 450 Apex km ची रेंज किती आहे?
  • स्कूटर एका चार्जमध्ये 157 किमी इतकी रेंज देते पण ही रेंज स्कूटरमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या रेंजवर अवलंबून आहे.
3. मी Ather 450 Apex कोठे विकत घेऊ शकतो?
  • तुम्ही तुमच्या जवळच्या मी Ather च्या शोरूममधून अथवा मी Ather डिलर कडून ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी करू शकता.
4. Ather 450 Apex चे प्रतिस्पर्धी कोण आहेत?
  • Ola S1 Pro आणि TVS X 
5. Ather 450 Apex ची खासियत काय आहे?
  • Ather 450 Apex ची खासियत म्हणजे हिची रेंज जी 100 किमीपेक्षा अधिक आहे शिवाय टॉप-स्पीड जो  100 किमी प्रति तास इतका आहे.
Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment