मारुती जिम्नी भारी पडली इंडिनेशियाच्या मार्केटवर, 25.4 लाखात मिळणार टॉप वेरिएंट्स तरीही एका वैशिष्ट्याची कमी

2024 Jimny 5 Door Launched At Indonesia: मेड इन इंडिया जिम्नीने Indonesia International Motor Show 2024 मध्ये हजेरी लावत आकर्षक रंग सादर केले, या इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो 2024 द्वारे जिम्नीबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी बाहेर पडल्या, ह्या गोष्टी आहेत जिम्नीला मिळालेल्या एक्स्ट्रा स्पेसिफिक्शन आणि किंमतीबाबत, चला जाणून घेयूया मारुती जिम्नीची माहिती.

इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो 2024 मध्ये पदार्पण जिम्नीने पदार्पण करत मेड-इन-इंडिया जिम्नीला 5-डोअर दिले आहेत याची पुष्टी केली. सध्या बाजारात जिम्नी 5-डोअर सोबत जिम्नी 3-डोअर उपलब्ध आहे. याआधीही भारतात तयार होणाऱ्या 5-डोअर जिम्नीला ऑस्ट्रेलियामध्ये जिम्नी XL म्हणून सादर  करण्यात आले होते, जिच्यामध्ये 9-इंचाची इंफोटेनमेंट सिस्टमचा अपडेट मिळाला होता.

इंडोनेशियन जिम्नी 5-डोअर फिचर्स

जिम्नी 5-डोअर दिसायला अगदी भारत-स्पेक मॉडेल प्रमाणेच असली तर एका हे सुविधेची या गाडीमध्ये कमतरता आहे;  तुम्ही जर या गाडीत निरखून पाहिल तर तुम्हाला जाणवेल की गाडीमध्ये पुश बटण स्टार्ट दिला गेला नाहीये. मात्र स्लॅटेड लोखंडी ग्रील, राउंड एलईडी हेडलाइट्स आणि 15-इंच अलॉय व्हील्स मध्ये जिम्नीची बॉक्सी डिझाइन सादर झाली आहे.

गाडीमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमैटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 4X4 ट्रान्सफर केस, प्रोजेक्टर हेडलाइट्स, मागील टेलगेट माउंट केलेले स्पेअर व्हील , फ्रंट हेडलाईट वॉशर, सहा एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांचा समावेश असून आतल्या बाजूला अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 9-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, 6 एअरबॅग्ज, पार्किंग सेन्सर्स ,पार्किंग कॅमेरासोबत अन्य वैशिष्ठ्ये समाविष्ठ आहेत.

वाचा: ‘सुजुकीची इलेक्ट्रिक स्कूटर’ पेट्रोल इंजिनवर भारी पडणारी आणि 100 किमीपेक्षा जास्त range देणारी सुझुकी स्कूटर

इंडोनेशियन मारुती जिम्नी इंजिन

इंडोनेशियन जिम्नी 5-डोअर एमडी 1.5-लिटर नेचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ज्याला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकची जोड दिली गेली आहे,  ही इंजिन 102bhp आणि 134Nm टॉर्क जनरेट करत, सुझुकीचे हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट असणार आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

मारुती जिम्नी किंमत

आयआयएमएस -इंडोनेशिया इंटरनॅशनल मोटर शो येथे लॉन्च झालेल्या मारुती सुझुकी जिम्नीमध्ये मेटॅलिक शिफॉन आयव्हरी शेड रंगाचा ऑप्शन असून कँडी रेड + ब्लूश ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये ड्युअल टोन रूफचा हासुधा ऑप्शन मिळाला आहे.

भारतात मारुती जिम्नीची सुरवातीची किंमत 12.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे पण इंडोनेशिया मध्ये सदर केलेल्या जिम्नी 5-डोअरची किंमत भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे, ही किंमत सुमारे IDR 478 दशलक्ष आहे म्हणजेच रु. 25.4 लाख आहे.

वाचा: टाटा कर्वचा शानदार लुक, पावरफुल इंजन आणि कमाल फीचर्स जाणून घ्या

भारत-स्पेक मॉडेल जिम्नी

Zeta, Alfa आणि Zeta AT या वेरिएंटमधून उपलब्ध असणाऱ्या जिम्नी कार फिचर्समध्ये एअरबॅग्ज (ड्रायव्हर, पॅसेंजर आणि साइड फ्रंट), ABS, एसी, सेंट्रल लॉकिंग, पॉवर स्टेअरिंग समाविष्ठ आहेत. 211 litres ची बुट्सपेस या SUV मध्ये मिळते. मॅन्युअल ट्रांसमिशन आणि 5 स्पीड गियरबॉक्स असणाऱ्या या गाडीचे वजन 1195 किग्रॅ इतके आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment