Tata Motors’ sales fall: टाटाच्या ‘ह्या’ चार गाड्यांच्या विक्रीत प्रचंड घट, जाणून घ्या कारणे

Tata Motors: देशभरातच नाही तर जगभरात सगळ्यांनाच माहितीये कि, गाड्यांच्या सेफेटी विषयी बोलायचं झालं तर ‘टाटा’ नाव तोंडात येत, भारतात टाटा च्या गाडीचा दर्जा काही औरच आहे. Tata Motors कंपनीच्या टाटा Nexon, Punch, Harrier, Safari किंवा  Tiago कोणत्याही गाड्या विकत घेताना लोक अजिबात कचरत नाहीत. याच केवळ एकमेव कारण आहे ते म्हणजे, Tata Motors गाडीकडून मिळणारी सुरक्षतेची हमी..!

पण इतक्या चांगल्या कॊतुकास्पद आणि दाद मिळण्यासारखे फीचर्स असून सुद्धा यावर्षी अखेपर्यंतच्या सुमारास टाटा नी काही गाडयांना खपविण्यात यशस्वी दिसत नाहीये. देशात जर सर्वाधिक वाहन कोणत्या कंपनीचे विकले जाते ? असा प्रश्न कोणी केला तर त्याच्यावर एक उत्तर असायचं कि टाटांची वाहने…! पण यावर्षी झालेल्या अहवालानुसार टाटाच्या चार अश्या गाड्या आहेत, ज्या नेहमीसारख्या विकल्या गेल्या नाहीयेत. मागील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये  विकल्या गेलेल्या कारच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आत्तापर्यन्त केवळ ४८,३४३ कार विकल्या गेल्या आहेत.

टाटा मोटर्स- Tata Motors’ sales fall down

भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी ‘टाटा मोटर्स-Tata Motors लिमिटेड’ कंपनी हि कार, ट्रक, व्हॅन आणि बसेसची निर्मिती करते.  टाटा मोटर्स कंपनीच्या अंडर ज्या सबकंपन्या आहेत त्यात ब्रिटीश जग्वार लँड रोव्हर आणि दक्षिण कोरियाचे टाटा देवू यांचा समावेश आहे. पण तरीही इतक्या मोठ्या कंपनीची वाहने घ्यायला लोक आधीसारखा का प्रतिसाद देत नाहीयेत किंवा नक्की टाटाच्या कोणत्या चार गाड्या आहेत ज्याच्या विक्रीत घट झाली आहे? हे जाणून घेऊया.

टाटा टियागो विक्री-Tata tiago sales

टियागो

सण वाहन विक्री संख्या
ऑक्टोबर 2022७ हजार १८७ युनिट्स
ऑक्टोबर 2023५ हजार ३५६ युनिट्स

टाटा हॅरियर विक्री- Tata Harrier and Safari sales

हॅरियर

सण वाहन विक्री संख्या
ऑक्टोबर 2022२ हजार ७६२ युनिट्स
ऑक्टोबर 2023 १ हजार ८९६ युनिट्स

 

टाटा टिगोर विक्री- Tata tigor sales 

टिगोर

सण वाहन विक्री संख्या
ऑक्टोबर 2022४,००१ युनिट्स
ऑक्टोबर 2023१ हजार ५६३ युनिट्स (६१ टक्क्यांनी कमी)

 

टाटा सफारी विक्री-Tata Safari sales

सफारी

सण वाहन विक्री संख्या
ऑक्टोबर 2022१,७५१ युनिट्स
ऑक्टोबर 2023१,३४० युनिट्स

हेपण वाचा :

SELTOS price droped: ‘या’ कारणामुळे किया सेल्टोसची किंमत 2,000 ने कमी होणार….!

Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment