Dongfeng Nammi 01: Tata, MG ला टक्कर देत, 9 लाखात 430 किमीची रेंज देणाऱ्या EV ची बाजारात एंट्री

Dongfeng Nammi 01 EV- इलेक्ट्रिक गाड्यांच्या दुनियेत चीनच नाव नेहमीच अव्वल नंबरला येतं,  नुकतीच चीनने XIaomi सर्वातकमी किंमतीत जास्त मायलेज देणारी EV lounch केली आणि आत्ता XIaomi च्या मागोमाग डोंगफेंग नावाची चिनी कंपनी नव्याने इलेक्ट्रिक नम्मी ०१ सादर करायला सज्ज झाल आहे. इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंट मध्ये डोंगफेंग सारखी मजबूत कंपनी आता ही नवीकोरी नम्मी ०१ ला घेऊन एंट्री करत आहे .

Dongfeng Nammi 01 EV

नम्मी 01 इलेक्ट्रिक: फिचर्स,रंग आणि किंमत(Dongfeng Nammi 01)

या डोंगफेंग नम्मी ०१ गाडीच्या फिचर्सबाबतीत सांगायचं झाल तर या गाडीमध्ये त्रिकोणी हेडलँप्स, क्लोसऑफ ग्रिल, इंटरकनेक्टिंग LED स्ट्रीप्स यांचा सामावेश आहे. ह्या गाडीच ट्रॅपेझॉइडल डिझाइन च फिनिशिंग मेटालिक आहे. या गाडीमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स  दिले आहेत. या गाडीची स्टोरेज स्पेस  945 लिटर इतकी आहे.  ड्रायविंग करताना चालकाला जास्त गोंधळात न पाडणारे कॉकपिट डिझाइन आहे, शिवाय मोठी टचस्क्रीन आणि  ड्रॉवर-प्रकार ग्लोव्ह बॉक्ससुद्धा या गाडीमध्ये देण्यात आला आहे. या गाडीच्या सीट्स फोल्डेबल आहेत.

गाडीच्या चार्जिंगच्या बाबतीत सांगायला गेलं तर, या गाडीमध्ये 31.5 आणि 42.3 kWh क्षमतेच्या दोन LFP बॅटरी दिल्या आहेत, ज्यामुळे नम्मी एकदा चार्ज केल्यावर साधारण 330 किमी ते 430 किमी. अंतर कापते, या गाडीमध्ये 400V फास्ट चार्जर असून ,तुम्ही फक्त आठ मिनिटांत किमान 200 किमी इतकं अंतर कापू शकता. ह्या EV च्या आकाराबाबतीत बोलायचं झालं तर,या डोंगफेंग नम्मी 4,030 मिमी लांबी, 1,810 मिमी रुंदी आणि 1,570 मिमी उंची इतका कॉम्पॅक्ट आहे. बाजारपेठेत हि गाडी जांभळा, पिवळा, हिरवा, हस्तिदंती पांढरा आणि हलका निळा यासारख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.Dongfeng Nammi 01

या गाडीची किंमत अंदाजे रु. 9.46 लाख ते रु. 13.02 लाख इतकी असून ह्या गाडीतील अन्य फीचर्समुळे या नम्मी 01 चायनीज स्मॉल कारची Citroen eC3, Tata Tiago, Mahindra XUV400, Tata Nexon, MG Comet यासारख्या मोडेल्स सोबत तुलना केली जातेय.

Xiaoma EV Car: लाँच होण्यापूर्वी Xiaomi च्या ‘The Game-Changing’ कारची किंमत लीक!

New Renault Duster SUV: सीएनजी इंधन, नवीन लुक आणि हायब्रीड इंजिन सह करणार पदार्पण; जाणून घ्या खासियत

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment