गुरखा 5-डोअरची चाचणी करताना मिळाली ‘सिक्रेट इन्फॉर्मेशन’, गुरखाची जिमनी आणि थारसोबत टक्कर

लडाखमध्ये गुरखा 5-डोअर स्पायड चाचणी दरम्यान दिसून आली, ही 5-डोअर एसयूव्ही मारुती सुझुकी जिमनी आणि महिंद्रा थारच्या 5-दरवाज्यांच्या मॉडेल्सना टक्कर देणारी गुरखा 18 जून 2024 मध्ये लाँच होणार आहे. 15.50 लाखपासून या एसयूव्ही बॉडीस्टाइल असणाऱ्या कारची किंमत सुरू होईल.

फोर्स गुरखा 5-डोर 2023

गेल्या काही दिवसांपासून फोर्स मोटर्स गुरखाच्या 5-दरवाज्याच्या मॉडल्सवर  काम करत आहे शिवाय या ऑफ-रोडर एसयूव्हीची टेस्ट मनालीमध्ये झालेली आहे, आधी माहितीच्या चाचणीसाठी लेह प्रदेशात सुद्धा गुरखाला नेण्याची शक्यता मांडली जातेय.

गुरखाचे प्रोफाइल मर्सिडीज जी-क्लास किंवा जी वॅगनशी मिळती-जुळती वाटते. लेटेस्ट फोर्स गुरखा 5-डोअर टेस्ट राईड दरम्यान कॅमेरामध्ये कैद झाले तेव्हा, 5-डोअर आणि १८ इंचाचे ऑलोय व्हील्स निदर्शनास आले. गुरखा 3-डोअरच्या बॉडीच्या तुलनेत, 5-डोअर गुरखाची बॉडी थोडी वाढलेली जाणवते.

वाचा: हैदराबादमधले ‘हे’ आहेत इलेक्ट्रिक कार फास्टेस्ट चार्जिंग स्टेशन

गुरखा 5-डोअर कधी लाँच होईल?

या एसयूव्हीची टेस्ट मनाली येथे होताना काही स्पाय शॉट्स सोशल मीडियावर पसरले, तर महाराष्ट्रातील पुणे येथेसुद्धा टेस्ट दरम्यान पाहण्यात आली. द फोर्स गुरखाने सप्टेंबर २०२१ 3-दरवाजा गुरखाला लॉन्च केले होते, संपूर्ण भारतात ह्या गाडीला लोकप्रियता मिळाली, खासकरून पर्वतीय प्रदेशांत एसयूव्हीला वापरण्यात प्राधान्य मिळालं आणि आता जून 2024 कंपनी 5-डोअर गुरखाला लाँच करण्याची माहिती मिळत आहे.

वाचा: TATA Nexon सह वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

गुरखा 5-डोअर वैशिष्ट्ये

फोर्स च्या 5-डोअर एसयूव्हीचे फीचर्स बऱ्यापैकी 3-दरवाजा गुरखासारखेच असू शकणार, ज्यामध्ये गोल हेडलाइट्स, इंटर्ग्रेटेड डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, फॉग लाइट्स, स्ट्रेट -स्टॅक केलेले टेल लाइट्स,एक उंच स्नॉर्कल, सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील, पॉवर विंडो, मॅन्युअल AC , ब्लॅक इंटीरियर थीम, डोअर हिंज ,रिवाईज्ड -एंडेड डझन,पब्लिक-रिअर व्हील डिस्क ब्रेक, हेवी-ड्यूटी बॉक्स ऑफिस आणि रिअर बंपरचा यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.  ह्या SUV मध्ये थ्री रो सीटिंग अरेंजमेंट असण्याची शक्यता मांडली जातेय.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

गुरखा 5-डोअर सेफ्टी फीचर्स

5-डोअर गुरख्याच्या आत सेफ्टी आणि अडवान्सड फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर, मॅन्युअल एअर कंडिशनिंग Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिविटी ऑप्शन , 4-स्पीकर साउंड सिस्टम आणि फ्रंट पॉवर विंडो यांचा समावेश करण्यात आला आहे.

गुरखा 5-डोअर इंजिन

5-डोअर एसयूव्हीमध्ये 2.6-लीटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन दिल गेलं आहे. हे इंजिन 90 PS पॉवर आणि 250 Nm चा पीक टॉर्कजनरेट करत. याचा गेअरबॉक्स 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत जोडला गेला आहे.

फोर्स गुरखा 5-डोअर किंमत

महिंद्रा थार हि देसी रँग्लर सारखी आहे, तर गुरखा देसी जी-क्लास उदा; मर्सिडीज-बेंझ जी-क्लास सारखी आहे. त्यामुळे हि एसयूव्ही कार स्कोडा कुशाक, आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायब्रीड महिंद्रा थार, मारुती जिमनी सारख्या कारना टक्कर देऊ शकते सोबत फोर्स गुरखा 5-डोअरची किंमत 3-दरवाज्याच्या गुरख्याच्या किंमतीपेक्षा म्हणजेच 15.10 लाख रुपयापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियामध्ये फोर्स गुरखा 5-डोअर लाँच 

इंडोनेशियातील इंडो डिफेन्स एक्सपो आणि फोरममध्ये फोर्स गुरखा 5-डोअर लाँच करण्यात आले, ज्यामध्ये सहा-सीट लेआउट मध्ये हि एसयूव्ही दिसून आली. इंडोनेशियन गुरखाची 5-डोअरमध्ये, गोलाकार एलईडी हेडलॅम्प, एक प्लेन बोनेट, चंकी व्हील तर इंटिरियर फीचर्समध्ये ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅन्युअल एअर कंडिशनर, Kstaria चे केबिन गोलाकार एअरकॉन व्हेंट्स,  यासारख्या इतर फीचर्सना टिपण्यात आले.

इंडोनेशियन गुरखामध्ये 2.6-लिटर डिझेल इंजिनचा वापर केला गेला आहे जे 90bhp आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते सोबत या एसयूव्हीची मोटर 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment