इथे मिळणार तुम्हाला मारुती जिमनीवर २ लाखापेक्षा जास्त डिस्काउंट, जाणून घ्या इंजिन आणि फिचर्स माहिती

Aishwarya Potdar

Updated on:

तुम्ही जर जिमनी घेण्याचा विचार करत असाल, तर त्वरित तुम्ही तुमच्या जवळच्या डिलरशिपकडे जाऊन या SUV ची चौकशी करा, कारण मारुती सुझुकी देत आहे जिमनी अल्फा या मॉडेल्सवर कमालीचा डिस्काउंट.

Maruti Jimny Alpha

मारुती जिमनी हि SUV घेण्याचं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, पण तुम्हाला माहितीये का? कि आता तुम्ही हे स्वप्न सत्यात उतरवू शकता, हो अगदी योग्य माहिती वाचत आहेत, आता तुम्हीसुद्धा मारुती सुझुकीची जिमनी विकत घेऊ शकता, कारण जिमनी अल्फा MT-DT मॉडेल्सवर मिळत आहे, तब्बल २ लाखाहून अधिक डिस्काउंट. हा डिस्काउंट मागील वर्षाच्या जिमनी मॉडेल्सवर मिळत आहे. या SUV ची किंमत १३.८५ लाख इतकी आहे, जर तुम्ही ह्या कारचे बुकिंग, fastag आणि TSC charges एकत्र करून बिल केले तर हीच कार तुम्हाला १५.१० लाख पर्यंत मिळू शकते, पण भारतामधले काही डीलर्सकडे या मारुती जिमनीवर २.२ लाखापर्यंत सूट शिवाय २०,००० रुपयांचा इन्शुरन्स डिफरेन्स मिळत आहे, त्यामुळे हि कार विकत घेणाऱ्याला फायदाच फायदा होणार आहे. चला माहिती घेऊया मारुती जिमनी अल्फा MT-DT इंजिन आणि फीचर्सची.

वाचा: इलेक्ट्रिक स्कूटरला 31 मार्च नंतर ही मिळणार FAME 2 subsidy फक्त करा हे काम

वाचा: आत्तापर्यंतची ‘हायेस्ट- रेंजवाली’ BYD इलेक्ट्रिक कार, एका दिवसात 300 पेक्षा जास्त बुकिंग

डिलर्सद्वारे मिळवा मारुती जिमनीवर सूट

चला बघूया, या कारच्या खरेदीवेळी कुठेकुठे तुमचा खर्च होऊ शकतो आणि इतका खर्च होउनसुद्धा तुम्हाला कुठे आणि किती डिस्काउंट या कार खरेदीवर मिळू शकतो, मारुती जिमनीची एक्स शोरूम किंमत १३,८४,९४२ रुपये इतकी आहे. कारची बुकिंग अमाउंट ४६,६०६ रुपये, इन्शुरन्स म्हणजे विम्याची किंमत ६४,३५९ रुपये, फास्टेग ६०० रुपये, MS- Rewards ८८५ रुपये, TSC १३,८४० रुपये इतका सर्व खर्च होऊन, ही एस्यूव्हीची किंमत १५,११,२४१ रुपये इतकी होते. पण काही डीलर्सकडे तुम्हाला २,२०,००० रुपयांची सवलत आणि २०,००० रुपयांचा इन्शुरन्स डिफरन्स तुम्हाला मिळणार आहे, थोडक्यात ही जिमनी तुम्ही फक्त १२,७१,२४१ रुपयांनी खरेदी करू शकता.

मारुती जिमनी इंजिन आणि फिचर्स माहिती

मारुतीच्या या कारमध्ये MT म्हणजेच ५-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि ४-स्पीड ऑटोमैटिक ट्रांसमिशनचे ऑप्शन्स मिळतात. जिमनीमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते, ज्याची १०३ hp आणि १३४ Nm टॉर्क तयार करण्याची क्षमता आहे. याचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा २१० मिमी म्हणजे बऱ्यापैकी मोठा दिलेला आहे.  ह्या कारच्या मायलेजची माहिती घेता, या कारमध्ये ४० लिटरची कपॅसिटी असणारी पेट्रोल टाकी मिळते. सिटी मायलेज १३.२१ किमी प्रति लिटरचे तर हायवे मायलेज १५.२९ किमी प्रति लिटर इतके मिळते. या कारचा टॉप स्पीड १५५ किमी प्रति तास इतका आहे.

५ दरवाजे असणाऱ्या ह्या कारमध्ये ४ जण आरामात प्रवास करू शकतात. दोन रोमध्ये या गाडीतली सीटिंग अरेंज केलेली आहे. या गाडीचा बुट्स्पेस २०८ लिटरचा आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये ओव्हरस्पीड वॉर्निंग, सीटबेल्ट वॉर्निंग, चाईल्ड सेफ्टी लॉक आणि ६ एअरबॅग दिल्या आहेत. कारमध्ये मनोरंजनासाठी टच स्क्रिन डिस्प्ले, ऍपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो, ४ स्पीकर्स तर एडवांस्ड फिचर्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी, GPS  नॅविगेशन, ऑटोमैटिक क्लायमेट कंट्रोल, अलोय व्हिल्स, AC, पॉवर स्टिअरिंग यासारख्या फिचर्सचा समावेश कारमध्ये आहे. ब्लुइस ब्लॅक, नेक्सा ब्लू, ग्रॅनाईट ग्रे आणि पर्ल आर्टिक व्हाइट या रंगामधून मारुती जिमनी उपलब्ध आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment