जुन्या ॲम्बेसेडरचा नव्या रुपात कमबॅक, हे असणार फिचर्स आणि किंमत

भारतातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध कार- मेकर कंपनी हिंदुस्थान मोटर त्याच्या सर्वात popular आणि गाजलेल्या Ambassador कारला पुन्हा एकदा लाँच करण्याच्या तयारीला लागले आहे. ह्या कारची ओळख आता vintage car म्हणूनच आहे, आपल्यापैकी बऱ्याच वाचकांना या कारच्या फिचर्सची स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळेचं सदर लेखात all new ambassador car जसं की इंडियन ॲम्बेसेडरची किंमत, नवीन कार मॉडल याबाबतीत सबंध माहिती मिळेल.

वाचा: नव्या स्विफ्टचे नवे 5 वेरिएंट्स आणि रंग, बुकिंग करायचंय? मग ही पाहा किंमत आणि अपडेटेड फिचर्स

Ambassador car new model

भारतामध्ये ॲम्बेसेडरचा इतिहास पहिला तर, 1957 ते 2014 पर्यंतच काळात या कारने संपूर्ण मार्केट हालवून टाकलं होतं. पण 2014 मधल्या एडवांस्ड काळानुसार ह्या गाड्यांना अपडेट दिले नव्हते त्यामुळे ह्या कार बनवणं बंद केलं, तरीही राजेशाही थाटात, राजकारणात आणि सरकारी ऑफिसमध्ये मात्र Hindustan Ambassador लाच पसंदी दिली जायची. अचानक बंद झालेल्या उत्पादनाला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे हिंदुस्थान मोटर्स कंपनीने पुन्हा एकदा हीच popular कार पुन्हा एकदा रस्तावर उतरवायचे ठरवले आहे. ह्या कारचे लाँचिंग ऑगस्ट 2024 मध्ये होणार असून हिची किंमत केवळ 20 लाखच्या आतमध्ये असणार आहे.

वाचा: टोयोटा टायसर लाँच, मारुतीच्या फ्रॉंक्सवर पडणार का भारी? जाणून घ्या फिचर्स,किंमत, बुकिंग-डिलीवरी आणि सर्व काही

जुनी ॲम्बेसेडर VS नवीन इलेक्ट्रिक ॲम्बेसेडर

ॲम्बेसेडर या कारचे उत्पादन बंद करताना या कारची किंमत 4.21 लाख इतकी होती. ओल्ड ॲम्बेसेडरला मॅन्युअल ट्रांसमिशन या पर्यायाची आणि CNG ,पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर- गॅसवर चालणारी होती. या कारचे इंजिन 1817cc आणि 1995cc चे होते. या कारची फ्युएल टँक 54 लिटरची होती. एका लिटरमधून ही कार 9 किमी इतकं मायलेज द्यायची. 5 लोक आरामात या कारमधून प्रवास करू शकत असत, पण त्याच तुलनेत नव्या ॲम्बेसेडर कारमध्ये बऱ्याच एडवांस्ड फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे, अगदी ह्या कारचे इलेक्ट्रिक वेरिएंटसुद्धा उपलब्ध होणार आहे. या कारची किंमत 10 लाख ते 15 लाख इतकी असू शकते. ऑटोमॅटिक ट्रांसमिशन सोबत अधिक नवे एडवांस्ड फिचर्स ह्या कारमध्ये दिले जाण्याची अपेक्षा मांडली जातेय. टाटा इलेट्रिक टिगोर आणि सिट्रॉन eC3 या कारला टक्कर देणाऱ्या new ambassador car बाबतीत अधिक माहिती अजून बाहेर पडली नाहीये.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment