Kia Sonet Facelift: जाणून घ्या , किआ सोनेट फेसलिफ्टचे ‘Game-changing’ बदल..!

Kia Sonet Facelift: भारतात किया सॉनेट ऑगस्ट २०२० मध्ये लाँच करण्यात आले होते, आणि कियाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कियाचा मेकओव्हर होत आहे, ज्याच्यासाठी सर्व आतुर झाले आहेत.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना Kia Sonet बाबतची फेसलिफ्ट लॉन्च होण्याची तारीख,किआ सोनेट फेसलिफ्ट एक्सटीरियर्स-इंटीरियर अपडेट्स,पॉवरट्रेन सोबत या फेसलिफ्टची वैशिष्ट्ये आणि किंमत सगळी महत्वाची माहिती तुम्हाला ह्या एका लेखात मिळत आहे.

Kia Sonet Facelift ५ महत्वाच्या गोष्टी

Kia Sonet Facelift

२०२४ च्या सुरवातीला किया-प्रेमींसाठी खुशखबर मिळणार आहे. कारण नवीन वर्षी Kia Sonet Facelift झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. २०२३ संपण्याचा मार्गावर Kia ​​Sonet चे फेसलिफ्ट चाचणी होत असताना दिसून आले आहे. २०२४ मध्ये Kia Sonet नव्याने लाँच होताना त्यातले काही बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

Kia India Sonet Facelift: इंटीरियर अपडेट्स

नव्या Kia Sonet च्या डॅशबोर्ड बद्दलची माहिती देताना जास्त काही बदल न करता केवळ ड्युअल टोन डॅशबोर्ड असणार आहे. मधल्या बाजूला फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आहे,सोबत AC मध्ये थोडे-थोडकेच बदल केले आहेत. या गाडीत एअर कॉन मिळणार आहेत.

Kia Sonet फेसलिफ्ट लॉन्च होण्याची तारीख

Kia India जास्तीच्या माहितीची चुप्पी ठेवत यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच ’14 डिसेंबर 2023′ रोजी Sonet फेसलिफ्ट सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. आणि ह्या गाडीच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ओपनिंगवरून अशीसुद्धा शक्यता वर्तवली जातेय कि, याच दिवशी  म्हणजेच 14 डिसेंबर या तारखेला Kia Sonet साठी ‘बुकिंग विंडो’ देखील ओपन होऊ शकते. आणि नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच, जानेवारी 2024 मध्ये त्याचे लाँचिंग आणि किंमती जाहीरसुद्धा  केल्या जातील.

किआ सोनेट फेसलिफ्ट: एक्सटीरियर्स

लोकप्रिय SUV Sonet चे फेसलिफ्ट मॉडेल चाचणी दरम्यान ही कार अनेकदा निदर्शनास आली आहे, त्यावरून अशी शक्यता मंडळी जातेय, कि या गाडीच्या च्या बाह्यभागात अनेक बदल दिसून आले आहेत. बंपरमध्ये ठराविकच बदल केले आहेत, शिवाय गाडीच्या अलॉय-व्हील्सलाही ड्युअल टोन लूक देण्यात येऊ शकतो.

किआ सोनेट फेसलिफ्ट: वैशिष्ट्ये

ह्या गाडीच्या वैशिष्ट्ये सांगायच झालं तर, या गाडीत सेफटीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि साइड फ्रंट साठी एअरबॅग्ज मिळण्याची शक्यता आहे. EBD सह ABS, रीअरव्ह्यू कॅमेरासोबत मागच्या बाजूला पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम दिली आहे. 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टम ज्यात अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay पर्याय असणार आहेत. या गाडीत 7-स्पीकर बोस साउंड सिस्टम, कनेक्टेड कार टेक, LED साउंड मूड लाइटिंग आहेत, गाडी संपूर्ण क्रूझ कंट्रोल आणि रंगीत मल्टी-कंट्रोल असणार आहे. गाडीत कीलेस एंट्री असणार आहे. पुश-बटण स्टार्ट सोबत सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प मिळणार आहेत. सेंट्रल लॉकिंग सुद्धा दिले आहे. इंजिन सेटअप सध्याच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले असल्याची शक्यता मंडळी जातेय.

किआ सोनेट: किंमत

हि नवीन गाडी Tata Nexon, Mahindra XUV300, Maruti Brezza, Maruti Suzuki, Nissan Magnite आणि Renault Kiger टक्कर देणारी असून या गाडीची किंमत सोनेट 8 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होणारी आहे.

हेपण वाचा :

Top 10 EV In India : 500km पेक्षा जास्त रेंज देणाऱ्या ‘Top 10 EV’ मायलेज आणि किंमती सह

Tata Motors’ sales fall: टाटाच्या ‘ह्या’ चार गाड्यांच्या विक्रीत प्रचंड घट, जाणून घ्या कारणे

Maruti Suzuki Price Hike: २०२४ पासून होणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ…!

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment