Maruti Suzuki discounts on MY2023 models: मारुती सुझुकीचा वर्षाअखेरचा ‘सर्वात मोठा डिस्काउंट’, 2.3 लाखांपर्यंत ‘या गाड्यांवर’ मोठी सूट

मारुती सुझुकीने MY2023 मॉडेल्सवर वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात सूट दिली असून तुम्ही जर मारुती सुझुकीची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हीच ती वेळ आहे, जत तुम्हाला मारुती सुझुकी विविध मॉडेल्सवर भरीव सूट मिळनार आहे. मारुतीच्या वाहनांवर 2.3 लाखांपर्यंत मोठी सूट मिळत आहे.

  • मारुती सुझुकीच्या वाहनांवर वर्षाच्या शेवटी – डिसेंबर 2023 मोठी सवलत
  • मारुती सुझुकी ची 2023 वाहनविक्री
  • जिमनी मूळ किंमत, मिळणारी सूट आणि इंजिन माहिती
  • सियाझ, बलेनो आणि इग्निस: सवलत
  • आल्टो के10, एस्प्रेसो आणि वॉगन-आर : सवलत

मारुती वाहनाच्या किंमतीत होणारे चढउतार यांचा सारसर विचार करता , बऱ्याच लोकानी मारुती सुझुकीच्या वाहन खरेदीसाठी माघार घेतली परिणामे, मारुतीच्या मागणी कमी आणि विक्रीत घसरण सुरू झाल्याने, मारुती सुझुकी वाहनविक्री मध्ये हळूहळू घट जाणवायला लागली, म्हणूनच ‘मारुती सुझुकीसाठी इच्छुक ग्राहकानी पुन्हा मारुती एक मजबूत आणि सक्षम ऑफ-रोडर च्या वाहनाकडे वळावे’, म्हणूनच काही ऑफर्स लाँच केल्या आहेत. लाभ रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट लाभांच्या रूपात ह्या ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो.

मारुती सुझुकी २०२३ वाहनविक्री

thmbnail 1 15

महिनायुनिट्स संख्या
जून3,071 युनिट्स
जुलै3,778 युनिट्स
ऑगस्ट3,104 युनिट्स
सप्टेंबर2,651 युनिट्स
ऑक्टोबर1,852 युनिट्स
नोव्हेंबर1,020 युनिट्स

मारुती सुझुकी जिमनी मूळ किंमत आणि मिळणारी सूट

भारतामध्ये मारुती सुझुकीजिमनी दोन प्रकारात उपलब्ध आहे,  ज्यांची किंमत रु. 12.74 लाख ते रु. 15.05 लाख या दरम्यान आहे; Zeta आणि Alpha.
मारुती सुझुकी जिमनी प्रकारमूळ किंमत मिळणारी सवलत
Zeta MTरु. 12.74 लाख2.21 लाख रुपये
Zeta AT13.94 लाख रुपये
अल्फा एमटीरु. 13.69 लाख1.21 लाख रुपये
अल्फा एटीरु. 14.89 लाख
अल्फा एमटी (ड्युअल टोन)13.85 लाख रुपये
अल्फा एटी (ड्युअल टोन)रु. 15.05 लाख

जिमनी: इंजिन

या गाडीचे पेट्रोल इंजिन असून याची क्षमता K15B 1.5-लिटर  इतकी आहे,हे इंजिन 105PS कमाल पॉवर आणि 134Nm पीक टॉर्क जनरेट करणारे असून, ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड एमटी आणि 4-स्पीड एटी मिळतात.

सियाझ, बलेनो आणि इग्निस: सवलत

मारुतीच्या ‘सियाझ, बलेनो आणि इग्निस’ या मारुती नेक्सा मॉडेल्सवर रु. 35,000 ते रु. 65,000 पर्यंत सूट दिली जात आहे.

आल्टो के10, एस्प्रेसो आणि वॉगन-आर : सवलत

रु. 52,000 ते Rs 63,000 पर्यंत सवलत Alto K10 वर मिळत असून, यातील CNG-चालित मॉडेलवरीलसुद्धा सवलतीचे फायदे मिळू शकतात. S-Presso ह्या मारुतीच्या गाडीवर जवळपास रु. 56,000 रुपयांपर्यंत सवलत, तर WagonR ला प्रकारानुसार रु. 63,000 पर्यंतच्या सवलतीं ऑफर केली जात आहे.

मारुती सुझुकीच्या Ertiga आणि Brezza वर मात्र कोणतीही सूट नाहीये.

हेपण वाचा:

Nissan X-Trail Spy pictures: न्यू निसान एक्स ट्रेल चाचणी करताना झाली स्पॉट,स्पायशॉट्स मधून मिळाली ही जबरदस्त माहिती

Tata Motors New Launch: कंपनीने सादर केली तब्ब्ल ५ वाहन, यातील Intra V70 आहे एकदम खास

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment