Maruti Suzuki Swift 2024: खतरनाक मायलेज आणि जबरदस्त पॉवरसह लाँच होणार “स्विफ्ट”, स्पेक्स झाले जाहीर

Maruti Suzuki Swift 2024 New Model Marathi: जपान मोबिलिटी शो मध्ये निळ्या रंगात पेश केलेल्या सुझुकी स्विफ्ट ची भारतीय आवृत्ती काही महिन्याच्या अंतरावर येउन ठेपली आहे. मारुति सुझुकी इंडिया लवकरच स्विफ्टच्या चौथ्या जनरेशनला लौंच करेल. पण त्या आधी भारतीय व्हर्जनच्या स्विफ्टच्या इंजिन इंजिनचे स्पेसिफिकेशन्स जाहीर झाले असून या लेखात आम्ही तुम्हला नवीन मारुती सुझुकी स्विफ्टच्या इंजिन स्पेक्स, मायलेज आणि हायब्रीड ऑपशनची माहिती मराठीतून देणार आहोत.

2024  Maruti Suzuki Swift New Model specifications

भारतामध्ये मारुति सुझुकी स्विफ्ट चे किती फॅन्स आहेत हे वेगळं सांगायला नको. मारुतीने नवीन स्विफ्ट च्या इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि पर्याय यावरून पडदा उठवला असून भारतीयांची आवडती हॅचबॅक आता पूर्वीपेक्षा अधिक ऍडव्हान्स आणि इकोनॉमिकल असणार आहे. 

2024 सुझुकी स्विफ्टला ऑटो-होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक कूल एंड हॉट व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटो-क्लायमेट एसी, पुश-बटण स्टार्ट-स्टॉप आणि इलेक्ट्रिकली रिट्रॅक्टेबल ORVM हे फीचर्स स्टॅंडर्ड असतील. 2024 स्विफ्ट मध्ये नवीन ADAS फिचर ऍड केलं जाणार आहे ज्यामध्ये ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम, लेन कीप असिस्ट आणिकॉलिजन (धडक) अलर्ट यासारखी वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत.

वाचा – Maruti jimny thunder edition: विकत घ्या “दोन लाखांनी” स्वस्त मारुति जिम्नी, जाणून घ्या नवी किंमत आणि शेवटची तारीख

swift 2024 adas

Next-Gen Swift 2024: इंजिन

ऑक्टोबर २०२३ मध्ये जपान मोबिलिटी शोच्या शेवटच्या टप्प्यात नवीन स्विफ्ट चे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर जाहीर झालेल्या माहिती नुसार चौथ्या जनरेशनच्या स्विफ्ट मध्ये थोडा बदलावं करत झेड सिरीज इंजिनमधून नवीन 1.2-लिटर Z12E तीन-सिलेंडर नेचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 5,700 rpm वर 81 bhp आणि 4,500 rpm वर 108 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याला जोडून कंपनी माईल्ड हायब्रीड सेटअपचा पर्याय देखील उपलब्ध करून देणार आहे ज्यामध्ये 48V चा सेटअप असणार आहे. यामध्ये DC Synchronous मोटर आणि लिथियम बॅटरी दिली जाईल ज्याची आउटपुट पॉवर 3 bhp आणि 60 Nm टॉर्क इतकी असेल. कंपनीने जपानमध्ये ऑल व्हील ड्राईव्ह व्हर्जन देखील उपलब्ध केले आहे पण भारतीय बाजाराचा अभ्यास पाहता आपल्या देशात कंपनी ऑल व्हील ड्राईव्ह ऑपशन लाँच कारण अपेक्षित नाही परंतु ग्राहकांना गाडी लाँच होताच सीएनजी इंधनाचा पर्याय देखील उपलब्ध केला जाणार आहे.

img02

गियरबॉक्स – 

सुझुकी स्विफ्ट 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन शी जोडली असेल, तर आउटगोइंग स्विफ्टमधील AMT गिअरबॉक्स डिस्कंटीन्यू करून पॅडल शिफ्टर्स सह CVT ऑटोमॅटिकचा पर्याय खुला होईल.

मायलेज – 

सुझुकी नेहमीच त्यांच्या मायलेज कार मुळे प्रसिद्ध आहे. जापनीज नॉन-हायब्रिड स्विफ्ट व्हर्जन मध्ये 23.4 kmpl आणि माईल्ड-हायब्रीड मध्ये 24.5 kmpl असे मायलेज प्रदान करते. जापनीज व्हर्जन भारतीय व्हर्जनच्या तुलनेत अधिक इफिशिअंट असून भारतात क्लेम मायलेज कमी असण्याची शक्यता आहे.

भविष्यात स्विफ्टचा रिव्हिव पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा.

इंजिन स्पेक्सनवीन-जनरेशन सुझुकी स्विफ्ट (जपान-वर्जन)
डिस्प्लेसमेंट1,197cc, 3-सिलेंडर DOHC इंजिन
पावर81 bhp
टॉर्क108 nm
ट्रांसमिशन5-MT / CVT (Paddle Shifters)
फ्यूल इकॉनमी 24.5 kmpl (माईल्ड -हायब्रिड) / 23.4 kmpl ( फक्त पेट्रोल)

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment