मुंबईतील नऊ प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर वेग मर्यादा लागू,ही आहे नवी वेग मर्यादा..!

Speed limits in Mumbai: 13 डिसेंबर 2023 रोजी मुंबईमध्ये मुंबई वाहतूक पोलीसांकडून महत्त्वाच्या रस्त्यांवर वेग मर्यादा लागू केल्या आहेत, ह्या वेग मर्यादा रस्तावरील सर्व प्रकारच्या वाहतूकूसाठी लागू होणार आहे.

घाईचे जीवन असणाऱ्या मुंबई शहरातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर नागरिकांची होणारी गैरसोय आणि अपघात टाळण्यासाठी स्पीड लिमिट आणि सक्त ट्रैफिक नियम लागू झाले आहेत. मुंबईमधील बऱ्याच रस्यांवर अपघात यासारख्या समस्या रोज घडत आहेत,आणि त्यावर उपाय म्हणून स्पीड लिमिट तयार केला आहे अशी घोषणा ट्विटर म्हणजेच एक्स वर केली आहे.

नवीन वेग मर्यादा

  • गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस (महर्षी कर्वे रोड) 50 किमी प्रतितास वेग मर्यादा,
  • पी डी मेलो रोड -50 किमी प्रतितास वेग मर्यादा,
  • शहिद भाग सिंग रोड- 50 किमी प्रतितास वेग मर्यादा,
  • केशवराव खाडे मार्गावरील हाजी अली जंक्शन- 50 किमी प्रतितास वेग मर्यादा,
  • महालक्ष्मी रेल्वे स्टेशन- 50 किमी प्रतितास वेग मर्यादा
  • बिंदू माधव चौक ते लव्ह ग्रोव्ह जंक्शन- 60 किमी प्रतितास
  • खान अब्दुल गफ्फार खान रोड – 60 किमी प्रतितास
  • डायमंड जंक्शन ते एमटीएनएल जंक्शन – 60 किमी प्रतितास
  • अव्हेन्यू-1 बीकेसी 60 किमी प्रतितास
  • जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) मध्ये 60 वेग मर्यादा
  • JVLR उड्डाणपुलावरील पूर्व आणि पश्चिम बाजू 70kmph वेग
  • थांब्यावर, उड्डाणपुलाच्या उतारावर, वळणांवर आणि वक्रांवर, वेग मर्यादा 30kmph
  • चेंबूरमधील छेडा नगर- 60kmph
  •  अमर महल उड्डाणपुल- 70kmph (उड्डाणपुलांच्या चढण आणि उतरताना वेग मर्यादा ४० किमी प्रतितास कमी )

वाचा: टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्यांवर 1.5 लाखांपर्यंत सूट, EV घेण्याची सुवर्णसंधी..!

वाचा – Simple Dot One कमी किंमतीत जास्त रेंज देणारी Ola च्या तोडीस-तोड किंमत आणि फिचर्स

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment