Big discounts on Tata car : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्यांवर 1.5 लाखांपर्यंत सूट, EV घेण्याची सुवर्णसंधी..!

Huge discounts on Tata Tiago, Tigor EV and Nexon: टाटा मोटर वर्षाअखेरीस टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर दोन लाखापर्यंत बँपर डिस्काउंट देत आहे. Tata स्टॉकचा शेवट होऊपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत ह्या सूट लागू आहेत. तुम्हीपण टाटा ची इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हीच वेळ आहे ज्यामध्ये तुम्ही टाटाची गाडी कमी किंमतीत विकत घेऊ शकता. ही सूट प्रत्येक शहरावर ठरलेली आहे, अधिक माहिती साठी तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा शोरूममध्ये अथवा टाटा डीलरशिप कडे जाऊन चौकशी करू शकता.

 टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर दोन लाखापर्यंत बँपर डिस्काउंट

टाटा नेक्सॉन इवी -Tata Nexon EV

टाटाच्या प्री-फेसलिफ्ट Tata Nexon EV Max गाडीवर रु. 2.20 लाखांपर्यंत रोख सवलत आणि रु.50,000 च्या किंमतीत एक्सचेंज बोनसमिळणार आहे. सोबत जनरल मॉडेलवर रु. 1.50 लाख सूट आणि रु. 50,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळणार आहे. टाटाच्या नवीन मॉडेलवर रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस मिळत असून नवीन वर्षातली टाटाच्या गाड्यांची होणारी दरवाढ हा ह्या २०२३ च्या वर्षातला शेवटचा सेल असणार आहे.

प्री-फेसलिफ्ट Nexon2.लाख सूट
प्राइम व्हेरियंट1. 4 लाख रोख सवलत आणि 50,000 एक्सचेंज बोनस
मॅक्स2.1 लाख रोख आणि 50,000 एक्सचेंज बोनस

टीगोर इलेक्ट्रिक कार-Tigor EV

4 स्टार रेटिंगची आणि सरासरी एक्स-शोरूम किंमत असणारी टीगोर इलेक्ट्रिक कारची किंमत रु. 12.49 – 13.75 लाख आहे. पण या ऑफरच्या अंतर्गत ग्राहकाना मूळ किंमतीमध्ये जवळपास 1.1 लाख कमी होणार आहेत. ज्यामध्ये 50,000 रुपयांची रोख सवलत, 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळणार आहे.

टियागो ईव्ही

5 सीटर टियागो इलेक्ट्रिक कार सरासरी एक्स-शोरूम किंमत 8.69 रुपये बेस मॉडल ते 12.04 लाखपर्यंत टॉप मॉडल विकली जाते, 4 स्टार सेफ्टी रेटिंग असणारी ही गाडी परवडणारी EV – Tiago EV  म्हणून भारतात ओळखलं जात. या गाडीवर सेल दरम्यान ‘ग्रीन बोनस 55,000 चा फायदा, कॉर्पोरेट सूट 7000 आणि 77,000 सवलत दिली जात आहे.
हेपण वाचा:
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment