Simple Dot One कमी किंमतीत जास्त रेंज देणारी ‘सिंपल एनर्जी डॉट वन’, Ola च्या तोडीस-तोड किंमत आणि फिचर्स

Cheap and best Electric Scooter Simple Dot One: सिंपल एनर्जी ची सिंपल वन नंतर दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल डॉट वन भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच झाली आहे. तुम्ही जर ही Simple Dot One स्कूटर घेण्याच्या विचारात असाल तर सिंपल एनर्जीच्या मुख्य वेबसाइटद्वारे तुम्ही ही स्कूटर बुक करू शकता. किंवा तुमच्या जवळच्या डिलर्सकडे जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. ह्या स्कूटर बाबतीत रंग पर्याय, वैशिष्ट्ये आणि किंमतीबाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील लेख वाचा.

सिंपल एनर्जी डॉट वन: बॅटरी

सिंपल एनर्जीचा इतिहास पाहिला तर, याआधी सिंपल एनर्जीकडून, सिंपल गाडी डिलीवरी करण्यास जरी विलंब झाला होता, तरी 2021 च्या ऑगस्टमध्ये सिंपल ने त्यांचे पहिले मॉडल लाँच केले.ज्याच्या गुणवत्तेवर त्याना एक लाख इतके बुकिंग्स मिळाले होते, आणि त्यानंतर भारतीय मोबेलिटीच्या स्पर्धात्मक यादीत नाव रोवत सिंपल ने सिंपल डॉट वन लाँच केले.

नवीन पोर्श मॅकन EV चा फर्स्ट लूक पहिला का 1 10

सिंपल वनच सब-व्हेरिएंट अशी ओळख असणाऱ्या सिंपल डॉट वन स्कूटर, एका चार्जमध्ये 151 किमी इतक मायलेज देते. सिंपल सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान आणि परवडणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरची 3.7kWh बॅटरी पॅक आणि 8.5kW इलेक्ट्रिक मोटर आहे,  जी 72 Nm इतका टॉर्क आउटपुट करते. ह्या गाडीमध्ये 750W चार्जर येते. सिंपल ने नमुद केल्याप्रमाणे ही गाडी 2.8 सेकंदात 40km/ताशी पार करते. ह्या गाडीमध्ये इको, राइड, डॅश आणि सोनिक असे 4 राइडिंग मोड आहे.

सिंपल डॉट वन: लूक आणि फीचर्स

सध्या डॉट वन नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाईट आणि अझूर ब्लू हे रंग पर्यायामध्ये ही स्कूटर उपलब्ध असून लवकरच LiteX आणि BrazenX रंगांमध्ये उपलब्ध होईल. या स्कूटरमध्ये टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर सुविधा हाताळण्यासाठी अॅप कनेक्टिव्हिटी हे फिचर देण्यात आले आहे, 12-इंच चाकांसह ट्यूबलेस टायर असणाऱ्या ह्या स्कूटरमध्ये 35-लिटर स्टोरेज स्पेस जी सिटखालीच दिली गेली आहे.

सिंपल डॉट वन: बुकिंग आणि किंमत

तुर्तास ही स्कूटर बेंगलोरमध्येच उपलब्ध केली असून, संपूर्ण भारतामध्ये ह्या गाडीच बुकिंग आणि डिलीवरी टप्याटप्याने केली जाणार आहे.  या गाडीची किंमत ₹99,999 (एक्स-शोरूम ) असून ही किंमत प्री-बुक केलेल्या सिंपल वन ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. नव्या ग्राहकांसाठी किमती जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील.

हेपण वाचा:

हॉप इलेक्ट्रिक हाई-स्पीड स्कूटर जानेवारीपासून महागणार..! सिंगल चार्जवर देते 125 किमी रेंज

एथर एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतेय 24,000 रुपयांपर्यंत ऑफर्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment