हॉप इलेक्ट्रिक हाई-स्पीड स्कूटर जानेवारीपासून महागणार..! सिंगल चार्जवर देते 125 किमी रेंज

हॉप इलेक्ट्रिक स्कूटर: येत्या नव्या वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि फोर व्हीलरची वाढती किंमत ही बाब काही नव्याने सांगायची गरज नाहीये, आता ह्या EV दरवाढीच्या यादीत जयपूर-आधारित इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता Hop Electric सुद्धा आली आहे. हॉप इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किमती जानेवारीपासून 3-5% दर-वाढ होणार आहे.

  • Hop Electric Bike च्या किंमतीत वाढ
  • हॉप इलेक्ट्रिक टू-व्हीलर अधिकारी यांनी दिलेली पुष्टी
  • हॉप इलेक्ट्रिक तपशील आणि किंमत

 हॉप इलेक्ट्रिक टू-व्हीलर

Hop Oxo and lyf

निर्मात्याने दिलेल्या माहितीनुसार, 2024 पासून Hop Oxo इलेक्ट्रिक मोटरसायकल Hop Leo आणि Lyf इलेक्ट्रिक स्कूटर्सना मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. एकीकडे एथर एनर्जी स्कूटरवर या 2023 च्या वर्षाअखेरीस सवलती आणि ऑफर्स मिळत असताना हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटी मोटारसायकलचे दर वाढताना निखिल भाटिया, सह-संस्थापक आणि मुख्य धोरण अधिकारी यांनी सांगितले की, ‘उच्च-गुणवत्तेच्या, नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक मोटारसायकल आम्ही तुम्हाला पुरवण्याच्या वचनात बांधिल आहोत, वाढत्या साहित्य खर्चाचा सामना करण्यासाठी यासोबत गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे आमच्या सर्व मॉडेल्सवर 3-5% किंमत वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.’

हॉप इलेक्ट्रिक तपशील, किंमत आणि प्रतिस्पर्धी

Hop इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी जिला उच्च-गुणवत्तेच्या, नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक दुचाकीसाठी ओळखलं जात, रिव्हॉल्ट RV400, ओबेन रॉर, टॉर्क क्रॅटोस आर आणि आगामी ओडिसी वडेर यांची प्रतिस्पर्धी असणारी Hop Oxo ई-मोटरसायकलची किंमत ₹1.43 लाख आहे. हॉप ऑक्सओ मोटारसायकल एका चार्जवर 150 किमीच्या रेंज देते.

दरम्यान, Ola S1X+, Okinawa PraisePro, Kinetic Green Zulu या गाड्यांची प्रतिस्पर्धी हॉप इलेक्ट्रिक रेंज Leo आणि Lyf ई-स्कूटरची किंमत ₹84,360 रुपयांपासून सुरू होते. हॉप लिओ गाडीचा टॉप स्पीड 70 kmph असून ही गाडी 120 km ची रेंज देते आणि Hop Lyf गाडी 125 किमी ची रेंज देते.

हेपण वाचा:

एथर एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतेय 24,000 रुपयांपर्यंत ऑफर्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जावा येझदी ची ईअर-एंड ‘ऑफर’ जाणून घ्या एक्सचेंज, EMI आणि वॉरंटीवर फायदेशीर सवलती,

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment