जावा येझदी ची ईअर-एंड ‘ऑफर’ जाणून घ्या एक्सचेंज, EMI आणि वॉरंटीवर फायदेशीर सवलती,

Huge discount on Jawa, Yezdi Motorcycles: मोटरसायकलसाठी प्रसिद्ध असणारे ब्रॅंड Jawa, Yezdi या बाइक खरेदीवर आता ईयरएंड डिस्काऊंट मिळत आहे. सोबत या मोटारसायकल खरेदीवर EMI , एक्सटेंडेड वॉरेंटी शिवाय जुनी गाडी एक्स्चेंज करुन बोनस मिळण्याची संधीसुद्धा मिळत आहे. जाणून घेऊया या बद्दल अजून माहिती

  • जावा येझदी मोटारसायकलींसाठी डिसेंबर ऑफर
  • Jawa ,Yezdi ची ईअर एंड ऑफर; एक्सचेंज, EMI आणि वॉरंटी

आजकाल दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या खरेदीवर भरपूर प्रमाणात सूट दिली जात असताना Jawa, Yezdi या दोन्ही मोटारसायकल कंपन्यांनी त्यांच्यासुद्धा दुचाकींसाठी विशेष वर्षाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींमध्ये EMI योजना, एक्सचेंज बोनस आणि राइडिंग गियर आणि मोटरसायकलच्या इतर काही अॅक्सेसरीजवरील सूट देण्यात येतेय,ज्यामुळे ज्याना Jawa, Yezdi च्या मोटरसायकल खरेदी करायच्या असतील त्यांचा फायदा होणार आहे.

नवीन पोर्श मॅकन EV चा फर्स्ट लूक पहिला का 1 5

मोटारसायकलच्या निवडक अॅक्सेसरीजवर आणि रायडिंग गियर वर 50 टक्के सूट मिळणार आहे. Jawa आणि Yezdi नवीन मोटारसायकल घेताना चार वर्षे किंवा 50,000 किमीची विस्तारित वॉरंटी मिळेल. जुन्या मोटरसायकलची देवाणघेवाण- ओल्ड बाइक एक्सचेंज मध्ये Rs. 10,000. पर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा इतकी सूट दिली मिळणार आहे. (सिंगल-टोन Jawa 42 आणि Yezdi Roadster मॉडेल्ससाठी)

तुम्हीसुद्धा Jawa आणि Yezdi मोटारसायकल घेण्याच्या विचारात असाल तर 31 डिसेंबर रोजी योजना संपण्यापूर्वी ह्या मोटारसायकल डिस्काऊंट बाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या जवळच्या शोरूम अथवा जवळच्या जावा येझदी डीलरशिपवर विज़िट करुन माहिती मिळवू शकता.

हेपण वाचा:

गुगल मॅपच नवं ‘इंधन वाचवा’ फिचर जाणून घ्या याबद्दल महत्वाची माहिती

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करुन मिळवा 80% सबसिडी, जाणून घ्या नोंदणीसोबत संपूर्ण माहिती

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment