टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत, कमाल फिचर्ससोबत 5 स्टार रेटिंग सेफ्टीसुद्धा

टाटा मोटर्सची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार म्हणजेच टाटा नेक्सॉन एसयूव्ही, नुकतेचं टाटा मोटर्सने त्यांच्या काही लोकप्रिय कारना डार्क एडिशनमध्ये बनवलं आहे, ज्यामध्ये नेक्सॉन, सफारी आणि हॅरियर यांसारख्या कारचा समावेश आहे. तुम्ही जर टाटाची बेस्ट-सेलर नेक्सॉन ईव्हीचे डार्क एडिशन विकत घेण्याचा विचार करत असाल, तुम्ही अगदी योग्य माहिती वाचत आहात. सदर माहितीमध्ये इलेक्ट्रिक नेक्सॉनची भारतमधल्या टॉप पाच शहरातील किंमत याचंसोबत या ईव्ही डार्क एडिशनचे फिचर्स- स्पेसिफिकेशन यांची माहिती दिली आहे.

टॉप 5 शहरामधील टाटा नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची किंमत

या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये 10 वेरिएंट्स उपलब्ध आहेत. या वेरिएंट्सची किंमत 14 लाखापासून सुरू होते तर 19 लाखापर्यंत संपते. भारतामधल्या टॉप 5 शहरातील या लोंग रेंजवाल्या इलेक्ट्रिक नेक्सॉनची किंमत वेगवेगळी आहे. मुंबईमध्ये या ईव्हीची किंमत 20.67 लाख इतकी आहे. कोलकत्ता शहरामध्ये नेक्सॉन ईव्हीची किंमत 20.67 लाख इतकी आहे. साउथ कर्नाटकमधलं सर्वात प्रसिद्ध शहर बेंगलोरमध्ये या कारची किंमत 20.68 लाख इतकी आहे. भारताचे कॅपीटल आणि प्रमुख शहर दिल्लीमध्ये नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची 20.71 इतकी किंमत आहे. चंदिगढमध्ये या कारची किंमत 20.65 लाख इतकी आहे.  तुम्हाला जर या कारचे बुकिंग क्रायचे असेल तर, तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूममध्ये भेट देऊन कारचे बुकिंग आणि टेस्ट राईडसुद्धा करू शकता.

वाचा: टाटा ने लाँच केली ही लोकप्रिय ऑटोमॅटिक सीएनजी कार, १ किलोमध्ये धावते 28 km

नेक्सॉन ईव्हीला ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग प्राप्त

इलेक्ट्रिक नेक्सॉन कारच्या सेफ्टी फीचर्सची माहिती घेता, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, 6 एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉकिंग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, सीटबेल्ट-डोअर अजर वॉर्निंग, स्पीड अलर्ट, 360 डिग्री कैमरा, टायर प्रेशर मॉनिटर, EBC आणि ट्रॅक्शन कंट्रोल या कारमध्ये मिळतात. मनोरंजनासाठी रेडिओ, पुढच्या- मागच्या बाजूस स्पीकर्स, वायरलेस फोन चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिविटी, 12.3 इंचाची टच स्क्रीन ज्यामध्ये अँड्रॉईड ऑटोप्ले आणि ऍपल कारप्ले ऑप्शन मिळतो. या कारला ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार रेटिंगसुद्धा मिळाले आहेत.

नेक्सॉन एसयुव्हीच्या एडवांस्ड फिचर्समध्येपॉवर स्टिअरिंग, मल्टी पर्पस स्टिअरिंग व्हील, पुढच्या बाजूस पॉवर विंडो, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एसी, ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल आणि आलोय व्हिल्स यांचा समावेश आहे.

वाचा: कमी पैशात अधिक सुरक्षा देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी कोमाकीची फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर

ईव्ही नेक्सॉन एका चार्जमध्ये 465 किमी इतकी रेंज देते

नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनच्या फिचर्सची माहिती घेता, ऑटोमैटिक ट्रांसमिशनचा पर्याय असणाऱ्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 5 लोक आरामात प्रवास करू शकतात. दोन इलेक्ट्रिक इंजिन असणाऱ्या या इलेक्ट्रिक कारची बॅटरी 40.5 किलोवॅटची आहे. 142 bhp इतकी पॉवर तर 215 nm इतका टॉर्क या कारमध्ये जनरेट केला जातो. ह्या कारची इलेक्ट्रिक बॅटरी चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात आणि जर बॅटरीला 50 किलोवॅटच्या चार्जर ने चार्ज केलं तर फक्त 56 मिनिटामध्ये हि बॅटरी चार्ज होते. बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यांनतर 465 किलोमीटर इतकी रेंज मिळते.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment