कमी पैशात अधिक सुरक्षा देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी कोमाकीची फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर

Aishwarya Potdar

कोमाकीची फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर पुन्हा एकदा नव्याने लाँच झाली आहे. या स्कूटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर इतकी रेंज मिळते शिवाय ही स्कूटर बजेट फ्रेंडली म्हणजे चक्क 70,000 रुपयांच्या आत मिळणारी इलेक्ट्रिक स्कूटर असून, यात अनेक अपडेटेड फीचर्स मिळाले आहेत, चला या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घेवूयात.

पर्यावरण संदर्भात जागरूकता दाखवत आणि एखाद्या रायडरच्या गरजा लक्षात घेऊन कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरला बनवण्यात आलेल आहे, ज्यामध्ये आकर्षक तसेच गरजेचे असे फीचर्स देण्यात आलेले आहेत. कोमाकी फ्लोरा या इलेक्ट्रिक स्कूटरकडे पाहिल्यानंतर रेट्रो डिझाईनचा फील येतो; गारनेट रेड, जेट ब्लॅक, सॅक्रामेंटो ग्रे या तीन रंगातून ही स्कूटर बाजारात उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या सीटिंग बाबतीत माहिती देता, ह्याची बसण्याची व्यवस्था खूप आरामदायी आहे. दोन रायडर आरामात प्रवास करू शकतील, अशी या स्कूटरची जोडणी केली आहे. मागील प्रवाशाला ग्रैबरेल आणि हेडरेस्ट दिल गेलं आहे, शिवाय फ्लोराला तब्बल 18 लिटरची बुटस्पेससुद्धा  दिली गेली आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

वाचा : भारतात मारुती एर्टिगा हायब्रीड कधी येणार? हायवे कारला मिळतेय ईव्हीपेक्षा परवडेल असे मायलेज

वाचा : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट 11 लाखात लाँच, Kia Seltos च्या प्रतिस्पर्धीची मार्केटमध्ये ‘दमदार एंट्री’

वाचा : Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

LIPO4 बॅटेरी पैक असणाऱ्या फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर ला 3 kW ची मोटर दिली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची क्षमता 3 Kwh इतकी आहे, स्कूटरचा पुढचा डिसब्रेक आणि मागचा ड्रम ब्रेक आहे, एका चार्जमध्ये 85 ते 100 किलोमीटरचा पल्ला ही स्कूटर गाठू शकते. तब्बल चार तास 55 मिनिटात ही स्कूटर पूर्णपणे चार्ज होते आणि एकदा चार्ज झाली की, ही  इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 100 किलोमीटर पर्यंत प्रवास आरामात पार करू शकते, या स्कूटरचा टॉप स्पीड 65 किलोमीटरचा आहे.

फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिजिटल ऑडोमीटर, स्पीडोमीटर आणि ट्रिपमीटर दिलेले आहेत, शिवाय लो बॅटरी अलर्टचे फिचर यामध्ये मिळते. अनेक सेंसर, सेल्फ डायग्नोसिस, वायरलेस अपडेट आणि स्मार्ट डॅशबोर्ड सोबत या स्कूटरच्या ॲडव्हान्स फिचर्समध्ये पुश-स्टार्ट बटण, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रेडिओ एफएम, एक साऊंड सिस्टिम, SOS इमर्जन्सी बटण, डे टाईम एलईडी रनिंग लॅम्प आणि एलईडी हेडलॅम्प यांचा सुद्धा समावेश आहे. सेफ्टीसाठी पार्किंग असिस्टंट, क्रूज कंट्रोल दिले गेलेले आहे या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड्स आपल्याला मिळतात इको, स्पोर्ट आणि टर्बो.

या स्कूटरचे स्टॅंडर्ड व्हेरिएंटची किंमत 69,000 इतकी आहे, तुम्ही जर बॅटरी पॅकला आगीचा अथवा जळण्याचा धोका नसणाऱ्या बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर कोमाकीची फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment