ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट 11 लाखात लाँच, Kia Seltos च्या प्रतिस्पर्धीची मार्केटमध्ये ‘दमदार एंट्री’

ह्युंदाईची मोस्ट अवेटेड कार- Hyundai Creta चे आज लाँचिंग झाले असून, या एसयूव्ही कार बद्दलची संपूर्ण ठळक माहिती बाहेर पडली आहे; ‘आकर्षक डिझाइन अपग्रेड, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि नवीन दमदार इंजिन’ या खासीयतने भरपूर असणारी ह्युंदाईची नवीन कार ह्युंदाईच्या इतर सेगमेंटमधली लोकप्रिय एसयूव्ही फेसलिफ्ट कार ठरत आहे. या SUV कारची ट्रान्समिशन ऑप्शनसोबत संपूर्ण व्हेरियंटनुसार किंमतसुद्धा जाहीर झाली आहे.

  • ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचा फर्स्ट लुक
  • क्रेटा फेसलिफ्ट मधले ड्राईव्ह मोडस
  • 2024 क्रेटा फेसलिफ्टचे लेटेस्ट अपडेट्स
  • क्रेटा फेसलिफ्ट सेफेटी आणि सेफटी रेटिंग्स
  • ह्युंदाई 2024 क्रेटा फेसलिफ्ट किंमत
  • क्रेटा फेसलिफ्ट SUV कारचे इंजिन आणि डायमेन्शन
  • 2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट रंग पर्याय आणि बुकिंग

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट फर्स्ट लुक

2024 Hyundai Creta

2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टमध्ये लक्ष वेधून घेणारं इंटीरियर दिल गेलं आहे, ज्यामध्ये आकर्षक डॅशबोर्ड लेआउट, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम साठी ड्युअल इंटिग्रेटेड 10.25-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे.

रिडिझाईन केलेले LED टेललाइट्स आणि टेलगेट, तसेच पुढील आणि मागील बाजूस LED लाइट बार सोबतच पुढील आणि मागील बंपर, स्प्लिट हेडलॅम्प, ग्रिल आणि अलॉय व्हील मुले ह्युंदाईची ही कार बाहेरूनसुद्धा अधिकच आकर्षक दिसते.

ह्युंदाई 2024 क्रेटा फेसलिफ्ट ड्राईव्ह मोडस

नव्या 2024 Hyundai Creta facelift मध्ये तीन ड्रायव्हिंग मोड दिले गेले आहेत; इको मोड, नॉर्मल मोड. आणि स्पोर्ट मोड. शिवाय मिडसाईझ SUV मध्ये तीन ट्रॅक्शन मोड दिले गेले आहेत; स्नो, मड आणि सॅण्ड, हे मोड ड्राइवर ड्रायव्हिंग करताना राईड सोयीस्कर होण्यासाठी परिस्थितीनुसार बदलू शकतो.

2024 Hyundai Creta facelift

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट अपडेट्स

2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टमध्ये आकर्षक वैशिष्ठे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, लेव्हल 2 ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) 360-डिग्री कॅमेरा, बोस ब्रॅण्डची दमदार साउंड सिस्टीम, हवेशीर फ्रंट सीट्स, आणि पॉवर ड्रायव्हर सीट शिवाय मागील प्रवाश्यांना ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हा पर्याय मिळतो.

वाचा: Hyundai Creta 2024: क्रेटाच्या सर्व मॉडेल्सच्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती, संपूर्ण लिस्ट

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट सेफेटी

नेहमीप्रमाणे ह्युंदाईने सेफेटी दृष्टिकोन समोर ठेऊन कारमध्ये बदल घडवून आणले आहेत, या एसयूव्ही कारमध्ये सहा एअरबॅग्ज, चारही चाकाना डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि 360-डिग्री कॅमेरा या सुविधा दिल्या आहेत. ह्या मॉडेलची खासियत लेव्हल 2 ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) ही असून या कारमध्ये ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), क्रॅश सेफटीसाठी फ्लोअर आणि साइड सिल सुद्धा मिळत आहेत. या कारला सुरक्षा रेटिंग 3 स्टार (ग्लोबल एनसीएपी) मिळाले आहेत.

वाचा: 31 जानेवारीपूर्वी करा ‘हे’ काम, नाहीतर होईल FASTag बंद

ह्युंदाई 2024 क्रेटा फेसलिफ्ट किंमत आणि प्रतिस्पर्धी

ह्युंदाई क्रेटा चं  भारतीय बाजारपेठेत 2015 मध्ये आगमन झाल्यापासून Hyundai Creta नेया वर्षापर्यंत जवळजवळ 9 लाखांहून अधिक SUV विक्री केली आहे, फेसलिफ्टेड Hyundai Creta हि एसयूव्ही E, EX, S, S (O), SX, SX Tech आणि SX (O) या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची किंमत 11 लाख ते 20 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहेत.

प्रकार1.5-लिटर पेट्रोल मॅन्युअल ट्रांसमिशन 1.5-लिटर पेट्रोल CVT1.5-लिटर डिझेल एमटी1.5-लिटर डिझेल AT
E व्हेरिएंट11 लाख रुउपलब्ध नाही12.45 लाख रुउपलब्ध नाही
EX व्हेरिएंट12.18 लाख रुउपलब्ध नाही13.68 लाख रुउपलब्ध नाही
एस व्हेरिएंट13.39 लाख रुउपलब्ध नाही14.89 लाख रुउपलब्ध नाही
S(O) व्हेरिएंट14.32 लाख रुरु. 15.82 लाखरु. 15.82 लाखरु. 17.32 लाख
एसएक्स व्हेरिएंट१५.२७ लाख रुपये*उपलब्ध नाहीउपलब्ध नाहीउपलब्ध नाही
एसएक्स टेक व्हेरिएंटरु 15.95 लाख*रु. 17.45 लाख*रु. 17.45 लाख*उपलब्ध नाही
SX (O) व्हेरिएंटरु. 17.24 लाख*रु. 18.70 लाख*रु. 18.74 लाख*20 लाख रुपये*

ह्युंदाईच्या क्रेटा फेसलिफ्टची तुलना स्कोडा कुशाक, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर, होंडा एलिव्हेट, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, सिट्रोएन सी3 एअरक्रॉस, आणि फॉक्सवॅगन तैगुन, एमजी एस्टर यांच्याशी केली जाऊ शकते.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

क्रेटा फेसलिफ्ट इंजिन आणि डायमेन्शन

Hyundai क्रेटामध्ये दिल गेलेलं इंजिन हे सगळ्यात कमी आवाज करणार आणि रिलायेबल इंजिन आहे. हि कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Hyundai Creta फेसलिफ्ट इंजिन मध्ये तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे; 1.5-लीटर पेट्रोल, 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल.

डिटेल्स1.5-लिटर पेट्रोल1.5-लिटर टर्बो-पेट्रोल1.5-लिटर डिझेल
ट्रान्समिशन6-स्पीड MT, CVT7-स्पीड DCT6-स्पीड MT, 6-स्पीड AT
टॉर्क144 एनएम253 एनएम250 एनएम
पॉवर115 PS160 PS116 PS

2024 Hyundai Creta फेसलिफ्टची 1,635 मिमी उंची, लांबी 4,330 मिमी आणि रुंदी 1,790 मिमी इतकी आहे.

Creta 2024 फेसलिफ्ट रंग पर्याय

Hyundai Creta हि SUV एक ड्युअल-टोन सोबत सहा मोनो-टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे,

  • ड्युअल-टोन कलर ऑप्शन : ब्लॅक रूफसोबत ऍटलास व्हाईट
  • मोनो-टोन पेंट कलर ऑप्शन: रॉबस्ट एमराल्ड पर्ल, फायरी रेड, रेंजर खाकी, एबीस ब्लॅक, ऍटलास व्हाईट आणि टायटन ग्रे

2024 ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट बुकिंग

तुम्हीसुद्धा ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट विकत घेण्याच्या विचारात असाल तर , 25,000 रुपयांच्या नाममात्र टोकन रकमेवर, तुम्ही हि ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही बुक करू शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment