31 जानेवारीपूर्वी करा ‘हे’ काम, नाहीतर होईल FASTag बंद

Aishwarya Potdar

NHAI FASTag Update : कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ने नुकताच एक महत्त्वपूर्ण वाहननियम बदल केला आहे, हा बदल FASTag KYC संबंधित आहे; NHAI ने ‘वन व्हेईकल, वन फास्टॅग’ मोहीम सुरू केली आहे, 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, ही प्रोसेस पूर्ण न केल्यास तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागू शकतो. तुम्ही जर कारचालक आणि फास्टॅग यूजर असाल, तर पुढील माहिती संपूर्ण वाचा.

FASTag Update

वन व्हेईकल, वन फास्टॅग मोहीम

‘तुम्हाला तुमचा प्रवासासोबत टोल प्रक्रिया सुखकर आणि सोपी जावी’ यासाठी एक वाहन- एक फास्टॅग उपक्रम अमलात आला आहे;  वन व्हेईकल, वन फास्टॅग मोहीम द्वारे ‘एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग वापरणे किंवा वेगवेगळ्या वाहनासाठी एकच फास्टॅग वापरणाऱ्या वापरकर्त्यावर आळा घालता यावा,’ हेच ध्येय आहे आणि जे वापरकर्ते 31 जानेवारीपूर्वी FASTag KYC पूर्ण करणार नाहीत अश्यांचे FASTag बँकद्वारे बंद केले जातील.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

संपूर्ण भारतामध्ये साधारण 8 कोटी फास्टॅग वापरकर्ते आहेत, फास्टॅग हा कार खरेदी करताना उपलब्ध केला जातो पण तरीही अनेक लोक प्रवास करत असताना ऐन वेळी ऑनलाइन वेबसाइटवरून , टोल प्लाझावरून फास्टॅग विकत घेवून गाडीच्या समोर चिटकवतात किंवा काही प्रवासी मनमानी करत जाणूनबुजून कारच्या विंडस्क्रीनवर FASTags  चिटकवत नाहीत, अश्या फास्टॅग गोंधळात होणारी टोल वसुली प्रक्रिया पूर्ण करताना अनावश्यक उशीर होते ज्यामुळे इतर प्रवाशयाना गैरसोय किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. FASTag ने भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रोसेसमध्ये ‘वन व्हेईकल, वन फास्टॅग मोहीम’ द्वारे प्रवास अधिक सुखकर होईल.

FASTags ची KYC प्रक्रिया ऑनलाइन अपडेट करा सोप्या पद्धतीने

 • IHMCL ग्राहक पोर्टलवर अथवा https://fastag.ihmcl.com या वेबसाईटवर विजीत करा.
 • नोंदणी केलेला मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • लॉग-इन झाल्यानंतर डॅशबोर्ड मेनूवरच्या डाव्या बाजूचा, “माझे प्रोफाइल” पर्याय निवडा.
 • ‘माझे प्रोफाइल’ ह्या पर्यायामध्ये तुमची KYC स्टेटस आणि प्रोफाइल डिटेल्स सबमिटेड प्रदर्शित केले जाईल. जर तुमची KYC अजूनही पेंडिंग असेल तर
 • ‘माझे प्रोफाइल’ > KYC > ग्राहक प्रकार निवडा.
 • यानंतर तुम्हाला तुमचा ओळखपत्र पुरावा आणि पत्ता पुरावा कागदपत्र जमा करुन पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे.

वाचा: एन्डेव्हरसह फोर्ड भारतात का परत येणार? काय आहे मास्टर प्लॅन?

FASTags ची KYC प्रक्रिया ऑफलाइन अपडेट करण्याची सोपी पद्धत

ऑफलाइन पद्धतीने FASTags ची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेत जाऊन फास्टॅग अपडेट करण्याचा अर्ज भरावा लागतो, तुमचा नवीन डेटा बँकेकडून अपडेट केला जातो, यासाठी तुमची रिलेशनशिप मॅनेजर कडून मदत घेऊ शकता.

फास्टॅग केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC)
 • मतदार ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पॅन कार्ड
 • नरेगा जॉब कार्ड (ज्यावर राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.)

वाचा: ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट 11 लाखात लाँच, Kia Seltos च्या प्रतिस्पर्धीची मार्केटमध्ये ‘दमदार एंट्री’

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मी कोल्हापुरी मुलगी असून नागपूर येथून हॉटेल मॅनेजमेंट डिग्री पूर्ण केली आहे. मला ऑटोमोबाईल क्षेत्राची आवड असून त्याबद्दल लिहायला आवडते.

Leave a Comment