एन्डेव्हरसह फोर्ड भारतात का परत येणार? काय आहे मास्टर प्लॅन?

Ford Comeback in India: भारतामध्ये फोर्ड पुन्हा वाहन विक्री साठी परतणार असून एन्डेव्हर या एसयूव्ही सह पुन्हा ऑपरेशन्स सुरु करणार आहे. 

फोर्ड ने भारत का सोडले? 

किया मोटर्स आणि एमजी सारख्या नवख्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत उशिरा येऊन आज त्यांनी आपला झपाट्याने विस्तार केला आहे. भारतीय मार्केटची नस ओळखून त्यांनी आपले बस्तान बसवले खास करून किया इंडिया ने. नवीन कंपन्यांनी जोरदार सुरुवात केला पण सर्वात जुनी ऑटोमेकर “फोर्ड” भारतात तग धरू शकली नाही. काहींच्या मते मार्केट एसयूव्ही कडे केंद्रित होत आहे ज्यामुळे फोर्ड ग्राहकाची मन ओळखू शकली नाही पण फोर्डच तर एक अशी कंपनी होती जीने भारतात एसयूव्ही काल्चरला हातभार लावला. मग असं काय घडलं कि फोर्ड भारतातून गेली?

सर्विस बद्दल गैरसमज

अगदी कंपनीने भारताला राम-राम करे पर्यंत भारतात फोर्डच नाही तर इतर वाहनाच्या सर्विस बद्दल अनेक गैरसमज होते आणि आज हि काही प्रमाणात आहेत. फोर्ड ची गाडी लोकल मेकॅनिक रिपेअर करू शकत नाही आणि सर्विस सेंटर परवडत नाही अशी लोकांमध्ये धारणा होती. आजकाल लोक शहाणे झाले असून कोणतीही गाडी लोकल मेकॅनिक पेक्षा सर्विस सेंटरला नेणं पसंत करतात. त्यामुळे सर्विस सेंटरलाच रिपेअर किंवा सर्व्हिस करणे आता सामान्य झाले आहे आणि सर्विस स्टेन्शन्स सुद्धा खेडो-पाड्यात झाली आहेत त्यामुळे या बदललेल्या वातावरणाचा फायदा आता फोर्डला होऊ शकतो.

टॅक्समुळे वाढती किंमत

भारतात इंजिन साठी बदलणारे नियम आणि डिझेल इंजिन बाबत वाढते कडक नियम यामुळे घाट्यात सुरु असलेल्या फोर्डला इंजिन RND साठी खूप खर्च येणार हे माहित होत. त्यात इंजिन नुसार टॅक्स त्यामुळे वाहनाच्या किमती प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा जास्त झाल्या असत्या ज्यामुळे फोर्ड सजून चिखलात रुतत गेली असती.

भारतीयांचा बदलता टेस्ट

भारतीय हे value for money गाडी विकणाऱ्या कंपन्यांच्या गाड्या घेणं पसंत करतात. कोरियन, जापनीज आणि इंडियन ब्रॅण्ड्स कमी किमतीत उत्तम डिजाईन आणि फीचर्स असणारे वाहन आणि परवडणारे मायलेज प्रदान करत होत्या. दुसरीकडे  फोर्ड २०१० साली लाँच केलेली वाहनच छोटे बदल करून फेसलिफ्ट म्हणून विकत होती.

फोर्ड भारतात परतणार?

सध्या भारतीय मार्केट मध्ये सुरु असलेल्या बातम्यांनुसार फोर्ड भारतात परतणार असे वाटत आहे. फोर्ड ने त्यांचा तामिळनाडूतील प्लांट विक्रीसाठी JSW ग्रुपशी अंतिम बोलणी केली असताना अचानक विक्री रद्द केली आहे आणि दुसरीकडे न्यू जनरेशन फोर्ड एन्डेव्हरचे पेटंट रजिस्टर केले आहे.  या बातमीवरून हे समजते कि फोर्ड २०२५ पर्यंत नवीन फोर्ड एन्डेव्हर एसयूव्ही सह आपले ऑपरेशन्स भारतात सुरु करू शकते.

वाचा – लाँच पूर्वीच “ह्युंदाई क्रेटा २०२४ फेसलिफ्ट” चा विडिओ वायरल, पहा कशी दिसते आता

काय आहे परतण्यामागची कारण?

फोर्ड पुन्हा येणार याच महत्वाचं कारण म्हणजे भारतातील वाढती कार्सची मागणी आणि मोठे मार्केट. दुसरं म्हणजे देशात टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टर यांची डुओपॉली आणि तिसरे म्हणजे भारतात वाढती इलेकट्रीक वाहनांची मागणी.

आपला यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

शक्यता – 

फोर्ड भारतात १९९५ साली महिंद्रा सोबत भागेदारी करून एंट्री केली होती त्या प्रमाणेच यावेळेस देखील फोर्ड भारतात टाटा मोटर्स किंवा महिंद्रा सोबत भागेदारी करू शकते. संध्या भारतीय ब्रॅण्ड्स एसयूव्ही आणि इलेकट्रीक सेगमेंट मध्ये चांगली कामगिरी करत आहेत परंतु टोयोटाच्या फॉर्च्युनरला टक्कर देण्यास दोन्ही कंपन्या असमर्थ आहेत. त्यामुळे दोन्ही पैकी एक कंपनी फोर्ड शी हातमिळवणी करून एन्डेव्हर भारतात विकण्याचा प्लॅन करत असू शकते. माझ्या मते सध्या टाटा मोटर्सच अशी कंपनी आहे जे पीसींजर वाहन विक्रीत दोन नंबरला आहेत आणि त्यांच्याकडे फुल साईज एसयूव्ही ची कमतरता आहे. त्यामुळे फोर्ड आणि टाटा मोटर्स एकत्र येऊ शकतात.

वाचा – Best 7 Seater Car: मोठ्या फॅमिलीसाठी चार बेस्ट 7 सीटर कार, उत्कृष्ट 26 Kmpl मायलेज कमी किंमत

कशी आहे आगामी फोर्ड एन्डेव्हर?

बाहेर देशात “एव्हरेस्ट” नावाने विकली जाणारी एन्डेव्हर आधी पेक्षा अधिक अपग्रेड आणि सेफटी ने सुसज्ज असणार आहे. गाडीमध्ये रगिड बाहेरील डिजाईन, नवीन ग्रील, C-आकार DRLs आणि हेडलॅम्प सेटअप, नवीन बॉनेट डिजाईन, व्हील, २१ इंच अलॉय व्हील्स, केबिन मध्ये 12.4-इंच की डिजिटल इंस्ट्रूमेंट स्क्रीन, नवीन स्टेरिंग असे अपडेट्स दिले जाणार आहेत.

वाचा – पहा किया सॉनेट २०२४ च्या महाराष्ट्रातील सर्व व्हेरिएंट्सच्या ऑन रोड प्राईज

इंजिन – 

एन्डेव्हर 3.0-लिटर V6 टर्बोचार्ज्ड सिंगल-टर्बो आणि बाय-टर्बो डिझेल इंजिनसह येते. पेट्रोल इकोबूस्ट  2.3-लिटर इंजिन पर्याय उपलब्ध आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये सहा-स्पीड ऑटोमॅटिक आणि फोर्डच्या 10-स्पीड सिलेक्ट शिफ्ट ऑटोमॅटिकचा समावेश आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment