Tata Zephyr Launch Date in India: कॉन्सेप्ट कि सत्यात उतरणार, वाचा सविस्तर

Ajinkya Sidwadkar

सध्या सोशल मीडिया वर Tata Zephyr edition harrier चे फोटोज तुफान वायरल होत आहेत. नुकताच वाईड बॉडी TATA Harrier Facelift 2023 चा फोटो एका सोशल हॅण्डल वर अपलोड करण्यात आला असल्याने प्रत्येक कार प्रेमींची उत्कंठा वाढली असून Tata Zephyr Launch Date आणि road price जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात टाटा हॅरीअर झेफर या कार बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.

  • टाटा हॅरीअर झेफर एडिशन सोशल मीडियावर ट्रेंडिंग
  • संपूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर

Tata Zephyr Launch Date in India

सध्या इंस्टाग्रामच्या zephyr_designz’s या पेजवर टाटा हॅरीअर चा पिवळ्या आणि लाल रंगात असलेला कस्टम वाईड बॉडी कॉन्सेप्टचा फोटो जबरदस्त वायरल झाला आहे. हि कॉन्सेप्ट डिजायनारच्या कल्पनेतून साकारली असल्याने सर्वच ठिकाणी वाह-वाह मिळत आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अपलोड केला असून आतापर्यंत या फोटोला ४० हजरांहून जास्त लाईक्स आल्या आहेत.

Courtesy – zephyr_designz instagram

 

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

टाटा हॅरीअर नुकतीच एक महिन्यापूर्वी लाँच झाली असून झेफर या डिझाइनर ने याच वर्जनचे मॉडिफिकेशन करून सर्वांसमोर मांडले आहे ज्यामध्ये पुढचा बंपर, पाठीमागचा बंपर, कस्टम रिअर – फ्रंट aero फेंडर्स, डिफ्फुजर्स, चार एक्सहौस्टर्स आणि Vorsteiner VFF 107 वर बसवलेले Advan Neova टायर्स यामुळे गाडीचा संपूर्ण लुक हा स्पोर्टी आणि आकर्षक झाला आहे.

Tata Zephyr V2 नवी कॉन्सेप्ट

Courtesy – zephyr_designz instagram

टाटा हॅरीअर झेफर या डिजाईन चे मोठयांप्रमाणावर कौतुक नाही झाले असे डिज़ाइनरला वाटले त्यामुळे त्याने याचे V2 काढले ज्यामध्ये ओईएम पार्ट्स मॅट ब्लॅक प्लास्टिक कलरमध्ये बदलले, संपूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बंपर, कस्टम फ्रंट आणि रिअर एरो फेंडर्स, डिफ्यूझर, क्वाड एक्झॉस्ट, अॅडव्हान निओवा टायर्समध्ये गुंडाळलेल्या व्होर्स्टेनर VFF 107 वर बसले त्यामुळे पूर्वीपेक्षा हॅरीअर अधिक स्पोर्टी दिसू लागली.

टाटा झेफर लाँच कधी होणार?

टाटा झेफर एडिशन जे एका डिझाइनर ने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर मॉडिफाई केले आहे. टाटा हॅरीअर Zephyr २०२३ एक कल्पकता असून टाटा मोटर्स ने ऑफिशिअली यावर काहीही भाष्य केलेलं नाही किंवा कुठेही स्टेटमेंट दिलेले नाही म्हणजे Tata Zephyr एक कॉन्सेप्ट असून ती १९ नोव्हेंबर २०२३ रोजी लाँच झाली आहे पण सत्यात ती कधीही लाँच होऊ शकत नाही. पण कल्पनाशक्तीला काहीही सीमा नसते म्हणूनच जर हि गाडी ऑफिशिअली लाँच झाली असती तर तिची ऑन रोड किंमत किती असू शकते यावरही आपण अंदाज बंधू शकतो.

वाचा – जुनी गाडी घेताना काय महत्वाचे असते, किलोमीटर रिडींग किंवा वय – वाचा सविस्तर

Tata Zephyr on Road Price

कार कॉन्सेप्ट डिझाइनर zephyr_designz’s ने हॅरीअर मध्ये केलेले मॉडिफिकेशन्स सर्व हाय एन्ड पार्टस वापरून केलेलं आहेत. याशिवाय गाडीच्या structure मध्ये बदलावं करत वाईड करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता india मध्ये Tata Zephyr ची on Road Price ६० लाख ते ७० लाखांच्या दरम्यान होऊ शकते.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version