टोयोटा टायसर लाँच, मारुतीच्या फ्रॉंक्सवर पडणार का भारी? जाणून घ्या फिचर्स,किंमत, बुकिंग-डिलीवरी आणि सर्व काही

टोयटोची नवीन कार लाँच झाली आहे; टोयोटा अर्बन क्रूजर टायसर जिची किंमत 10 लाखाच्या आतमध्ये आहे. पेट्रोल आणि CNG ह्या पर्यायातून उपलब्ध असणारी ही Toyota Taisor कार फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशनम्यूल मारुती सुझुकीच्या फ्रॉंक्सला टक्कर देऊ शकते अशी चर्चा रंगत आहे. तुम्हाला जर 5 सीटर प्रीमियम सबकॉम्पॅक्ट क्रॉसओवर एसयुव्ही घेण्याच्या विचारात असाल, तर टोयोटाची नवीन अर्बन क्रूजर तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो का हे जाणून घ्या सदर लेखातून.

टोयोटा अर्बन क्रूजर टायसर किंमत

ही एसयुव्ही संपूर्णपणे FWD म्हणजे ‘फ्रंट व्हील ड्राइव’ थोडक्यात कार ढकलण्यासाठी पॉवर इंजिनमधून पुढच्या चाकांना दिली जाते. 5 मूळ वेरिएंट्समधून उपलब्ध असणाऱ्या ह्या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशनचे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. ह्या अर्बन कारची किंमत 7.74 लाखापासून सुरू होते ते 13.04 लाखावर येऊन थांबते. रेड,सिल्व्हर आणि व्हाइट सनरूफ सोबत स्पोर्टिन रेड,कॅफे व्हाइट, अँटिसिंग सिल्व्हर, ग्रेमिंग ग्रे आणि ल्यूसेंट ऑरेंज यासारख्या रंगातून ही कार बाजारात उपलब्ध आहे.

वाचा: एथर रितझा पाण्यात उतरल्यावर काय झालं ? जाणून घ्या रितझाचे फिचर्स आणि किंमत

टोयोटा टायसर vs मारुती सुझुकी फ्रॉंक्स

फ्रॉंक्स आणि टायसरच्या एकसारख्या फिचर्समध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्ट्रर, 360 डिग्री कॅमेरा आणि इंजिन स्टार्ट अथवा बंद करण्याचे बटण यांचा समावेश आहे. दोन्ही कारचे इंजिन 999 cc- 1197 cc चे आहे.दोन्ही कारच्या किंमती 7 लाख ते 13 लाख दरम्यान आहेत. ह्या सर्व गोष्टी जरी समान असल्या तरी टोयाटो टायझरमध्ये आणि मारुती फ्रॉंक्समध्ये भिन्नता आढळते ते म्हणजे गाडीच्या डिझाईनमध्ये, दोन्ही गाडींचे एक्सटीरियर आणि इंटीरियर थोडक्यात आतील-बाहेरील बाजूमध्ये वेगळेपणा लगेच निदर्शनास येतो. फ्रँक्सच्या तुलनेत टायसर मध्ये जाडीला मोठे पण आकाराने छोटे ग्रिल दिले आहेत. नव्याने स्टाईल केलेले DRLS आणि हेडलँप सोबत टायझरचा बंपरसुद्धा संपूर्णपणे नव्याने डिझाइन केलेला आहे. फ्रँक्सच्या तुलनेत टायसरमध्ये नव्याने डिझाइन केलेले 16 इंचाचे आलोय व्हील दिलेले आहेत. टायसर मधले केबिन अतिशय स्पेशियस म्हणजेच मोठे आहे.

वाचा: मुंबईच्या भर रस्त्यावर गोलमालचा अभिनेता इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसला !

टायझरच्या सेफ्टी फिचर्समध्ये 6 एअरबॅग, ABS सोबत EBD, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट सोबत चाइल्ड सिट सेफ्टीसारख्या फिचर्सचा समावेश आहे. या कारच्या एडवांस्ड फिचर्समध्ये 9 इंचाची टचस्क्रीन असणारी इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल- क्रूस कंट्रोल यांसारखी अधिक फिचर्स मिळतात.

वाचा: Ather Rizta किंमत, बुकिंग-डिलीव्हरी, रंग, रेंज, वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती

टायसर इंजिन माहिती

या कारमध्ये ऑटोमॅटिक सोबत मॅन्युअल ट्रांसमिशन ह्या पर्यायासोबत पेट्रोल आणि CNG इंजिन मिळतं, हे इंजिन 999 cc-1197 cc चे आहे. सीएनजीची टाकी ही कंपनी-फिटेड आहे. 76.43- 98.69 bhp इतकी पॉवर आणि 147.6 Nm-113 Nm इतका टॉर्क या इंजिनमर्फत तयार होऊ शकतो. मायलेजच्या बाबतीत मारुती फ्रॉंक्स ही कार पेट्रोल इंधनातून 21.79 kmpl आणि CNG मधून 28.51 km/kg इतकं मॅलेज देते टीआर त्याच तुलनेत टायसर पेट्रोल इंधनातून 21.7 kmpl आणि CNG मधून 28.5 km/kg इतकं मायलेज देते.

टोयोटा अर्बन क्रूजर टायसर बुकिंग आणि डिलीवरी

ह्या कारची डिलीवरी 2024 मे मध्ये सुरू होणार असून या कारसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू झाली असून, तुम्ही ह्या कारचे बुकिंग 11 हजार रुपयांची टोकन किंमत देऊन करू शकता. टोयोटा अर्बन क्रूजर टायसर बुकिंग आणि डिलीवरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या टोयोटा शोरूममध्ये जाऊन भेट देऊ शकता.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment