जुनी गाडी घेताना काय महत्वाचे असते, किलोमीटर रिडींग किंवा वय – वाचा सविस्तर

Ajinkya Sidwadkar

शार्क टैंक वाले अश्निर ग्रोवर यांचा विडिओ पहिल्या नंतर तुम्ही सेकंड हॅन्ड गाडी घेऊन पैसे वाचवण्याचा विचार करत आहात तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जुनी गाडी घेते वेळी महत्वाचे काय असते Kms कि Age?

कंपनी, मॉडेल, मेंटनटस आणि पार्टस या सगळ्या सेकंडरी गोष्टी असतात. गाडी घेते वेळी Kms OR Age? यामध्येच माणूस नेहमीच कन्फयुज होतो. उदाहरणार्थ – ७० हजार kms चाललेली २०१८ ची टाटा नेक्सॉन ७ लाख रुपये आणि ३० हजार kms चलेली २०२० ची नेक्सॉन ९ लाख रुपये. जगजाहीर आहे कि तुम्ही २०२० चे ३० हजार kms चालली निक्सन खरेदी कराल. कारण नवीन मॉडेल आणि रनिंग पण कमी, आता जर याचेच उलटे केले म्हणजे २०१८ नेक्सन ३० हजार kms पळली आणि २०२० nexon ६० हजार, आता तुम्ही काय करणार?

हे बघा जुनी गाडी घेते वेळी ना kms ना age गाडी उत्तम स्थितीत आहे ठरवू शकतं. कोणत्याही ऑफिशल सर्विस रेकॉर्ड शिवाय २० हजार kms चालली गाडी धोकादायक ठरू शकते या उलट प्रॉपरली मेंटेन विथ सर्विस रेकॉर्ड ५० हजार चाललेली गाडी फायदेशीर ठरते. भारतात kms ला वैल्यू दिली जाते पण गाडी किती जुनी आहे आणि सर्विस रेकॉर्ड मेंटेन आहे का? हे सुद्धा महत्वाचे असते. नवीन गाडीचे kms कमी असणे या मागे हे सुद्धा कारण असू शकते कि गाडी बरेच दिवस सर्विस सेंटरला उभी होती किंवा मीटर रिव्हर्स केलेले असू शकते.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

तुम्ही कश्याला महत्व देता kms कि age? कॉमेंट मध्ये सांगा आणि अश्याच विडिओ साठी सब्स्क्रिब करा सब्स्क्रिब करा ऑटो हेल्पर मराठी.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version