लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीने लाँच केली 1 लाखच्या आतमध्ये 4G इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत, रंग, रेंज आणि सर्व काही

Aishwarya Potdar

इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टसाठी प्रसिद्ध असणारी एसर इलेक्ट्रिक कंपनी लवकरचं EBikeGo सोबत स्वतःच पाहिलं वाहन – इलेक्ट्रिक स्कूटर MUVI 125 4G स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच करत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एसर साठी भविष्यातील इलेक्ट्रिक वाहन भविष्याच्या दृष्टिकोनातून मोठी झेप असु शकते. चला जाणून घेवूया या MUVI 125 4G बद्दल संपूर्ण माहिती.

Acer MUVI 125 4G इलेक्ट्रिक स्कूटर

EBikeGo ही एक इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करणारा भारतीय स्टार्टअप असून आता ही कंपनी लॅपटॉप, मॉनिटर, डेस्कटॉप आणि टीव्ही बनवणाऱ्या नामांकित कंपनी एसर सोबत एकत्रित येऊन Acer MUVI 125 4G इलेक्ट्रिक स्कूटरला बाजारातपेठेत उतरवत आहे. MUVI-125-4G ह्या बाईकची रचना 80 किलोमीटरची रेंज देईल अशी बनवली आहे. 4G इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये इतकी आहे.

वाचा: मुंबईच्या भर रस्त्यावर गोलमालचा अभिनेता इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसला !

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

सिंगल फुल चार्जवर 80km रेंज देणारी बॅटरी

ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची जोडणी युरोपियन टेक्नोलॉजीच्या अंतर्गत बनवले असून, ही स्कूटर खाजगी आणि B2B साठी म्हणजे व्यवसाय वापरातही वापरली जाऊ शकते. ह्या स्कूटरमध्ये दिलेली 48V 35.2Ah लिथियम आयन बॅटरी ही स्वॅपबल म्हणजेच काढघालीची आहे. तुम्ही या बाइक मध्ये फिचर्स कस्टमाइझ म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. या स्कूटरची फ्रेम अगदी लाइटवेट ठेवण्यात आली आहे, जिच्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यात मदत होते. 16 इंचाचे व्हील असणाऱ्या 4G इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितसाचा आहे. 10 A चार्जरच्या मदतीने या स्कूटरच्या बॅटरीला चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास पुरेसे आहेत आणि 48V 5A चार्जरच्या मदतीने ह्या स्कूटरच्या बॅटरीला चार्ज होण्यासाठी 7तास लागतात.

पोलर व्हाइट, कार्बन ब्लॅक आणि ग्लेशिअर सिल्वर या रंगामध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. ब्लूटूथ ऑप्शन असणाऱ्या या स्कूटरच्या डॅशबोर्ड मध्ये LCD डिस्प्ले, ज्यामध्ये iOS आणि अँड्रॉईड हे दोन्ही ऑप्शन दिले गेले आहेत.

वाचा: Ather Rizta किंमत, बुकिंग-डिलीव्हरी, रंग, रेंज, वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती

पेट्रोल बाईक VS एसर मुवी 125 4G इलेक्ट्रिक स्कूटर

आजकालचे वाढणारे इंधन भाव लक्षात घेता, एखाद्या पेट्रोल स्कूटर अथवा बाईकला प्रतिकिलोमीचे अंतर कापण्यासाठी 2 रुपयांचा खर्च येतो, पण त्याच तुलनेत MUVI 125 4G इलेक्ट्रिक स्कूटरला प्रतिकिमीचे अंतर कापण्यासाठी फक्त 0.30 पैसे/रुपये इतका खर्च येतो. शिवाय MUVI इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी तुम्ही अगदी घरीसुद्धा चार्ज करू शकता. तुम्हाला या स्कूटरसाठी 5 वर्षाची वॉरंटी दिली जाते सोबत एक्सटेंडेड वॉरंटी हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे.

वाचा: एथर रितझा पाण्यात उतरल्यावर काय झालं ? जाणून घ्या रितझाचे फिचर्स आणि किंमत

प्री-बुकींग करण्याची सोप्पी पध्दत

ह्या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट-राईड अथवा प्री-बुकींग तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने करू शकता. 999 रुपये भरून या इलेक्ट्रीक 4G स्कूटरचे तुम्हाला रिझर्वेशन करता येते, मूळ किंमत 1,49,999 असणाऱ्या ह्या स्कूटरला तुम्ही 99,999 रुपयात खरेदी करू शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment