‘ही’ ईव्ही स्कूटर पेट्रोल स्कूटरपेक्षा स्वस्त, जिला मिळते सर्वात सुरक्षित बॅटरी जाणून घ्या फिचर्स, रेंज, किंमत आणि सर्व काही

Okaya Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Okaya EV स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर ओलाशी वरचढ करत पुन्हा चर्चेत आली आहे, या चर्चेचं कारण या इ-स्कूटरची आता पेट्रोल इंजिन स्कूटरपेक्षा स्वस्त दरात खरेदी केली जाऊ शकते. या स्कूटरमध्ये वापरली जाणारी LFP बॅटरी सर्वात सुरक्षित बॅटरी म्हणून ओळखली जाते. तुम्हीसुद्धा अशी इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहात का, जी 150 km पेक्षा जास्त रेंज देईल शिवाय परवडणाऱ्या किफायतीशीर किंमतीमध्ये मिळेल तर ओकाया इलेक्ट्रीक स्कूटर हा खूप चांगला पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो. चला जाणून घेयूया या ओकाया स्कूटरच्या लिमिटेड ऑफर्स, फिचर्स, रेंज, किंमत आणि बुकिंगबद्दलची सर्व माहिती.

भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे, आणि आता यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ओकाया ईव्हीने सुद्धा स्कूटरची किंमत चक्क 18,000 रुपयांनी कमी केली  आहे. तुम्ही जर ही स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर 29 फेब्रुवारी 2024 च्या आधी ह्या स्कूटरला खरेदी करुन 18,000 रुपयांचा फायदा मिळवू शकता. लोंग रेंज देणाऱ्या Okaya च्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मॉडेलची किंमत 74,899 ते 1,19,990 रुपयांपर्यंत असून, ही स्कूटर एका चार्जमध्ये 140 ते 160 किलोमीटरचे अंतर पार करते.

वाचा: टाटाने दिला ग्राहकांना धक्का ! हॅचबॅक कारवर 2.80 लाखपर्यंत सूट, नेक्सॉन आणि टियागो ईव्ही खरेदीवर करा बचत

29 फेब्रुवारी 2024 पर्यंत या किंमतीमध्ये मिळणार ओकाया ईव्ही

ओकाया ईव्हीच्या फास्ट F4 मॉडलची किंमत डिस्काउंटची आधी 1,37,990 रुपये होती आणि आता डिस्काउंट दरम्यान ही किंमत 1,19,990 (एक्स-शोरूम) इतकी आहे. फास्ट F3 मॉडलची किंमत डिस्काउंटची आधी 1,24,990 रुपये होती आणि आता डिस्काउंट दरम्यान ही किंमत 1,09,990 (एक्स-शोरूम) इतकी आहे. MotoFast मॉडलची किंमत डिस्काउंटची आधी 1,41,999 रुपये होती आणि आता डिस्काउंट दरम्यान ही किंमत 1,28,999 (एक्स-शोरूम) इतकी आहे.

ओकाया ईव्ही हायलाइट

ओकाया ईव्हीमध्ये LFP -लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी वापरल्या आहेत, ज्या भारतीय हवामान परिस्थितीसाठी खूप सुरक्षित टेकनौलॉजीने चांगल्या मानल्या जातात. ह्या प्रकारातील इलेक्ट्रिक बॅटरी NMC बॅटरीपेक्षा जास्त लाइफस्पैमच्या असतात.

वाचा: यामाहा मोटरने ‘देशी इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्टअपला’ दिला, 335 कोटी रुपयांचा निधी

सर्व ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये BLDC हब मोटारचा वापर केला आहे. ओकाया फास्ट मध्ये दिलेल्या मोटरमधून 1200 डब्ल्यू पॉवर जनरेट होते. या स्कूटरमध्ये पुढील आणि मागील दोन्ही ड्रम ब्रेक असून, दोन्ही चाकांच्या एकत्रित ब्रेकिंग सिस्टिम येते. या इलेक्ट्रिक स्कूटरची राइडिंग रेंज 160 किमी आहे, हिचा हायस्पीड 70 किमी प्रतितास आहे, या स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 5-6 तास लागतात.

85 किमी रेंज देणारी ओकाया F2B आणि ओकाया F2T

ओकाया F2B ची किंमत 89,999 रुपये तर F2T ची किंमत 84,999 रुपये असून या दोन्ही मॉडेलमध्ये  2000W ची मोटर दिली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.2 kWh लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅकचा सामवेश आहे, या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप-स्पीड 70   आहे. F2T मॉडल एकदा चार्ज केल्यानंतर 85 किमीची रेंज प्रदान करते तर F2B एका चार्जवर 70 ते 80 किमीची रेंज प्रदान करते असा दावा कंपनीने केला आहे.

वाचा: टाटा मोटर्सच्या 4 नवीन इलेक्ट्रीक कार झाल्या लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ओकायाची अधिक माहिती

ओकायाची सर्वात पॉपुलर बाइक ओकाया फास्ट, ओकाया फ्रीडम, ओकाया फास्ट एफ 2बी
आहे तर सर्वात महाग बाइक ओकाया इलेक्ट्रिक ओकाया फास्ट जिची किंमत 1.38 लाख ,या कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडल ओकाया इलेक्ट्रिक ओकाया क्लासआईक्यू ज्याची किंमत 74,499 इतकी आहे, ओकायाच्या सर्व मॉडेलचा फ्यूल टाइप इलेक्ट्रिक आहे.

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील 2024 किंमत

  • ओकाया क्लासआईक्यू : 74,499
  • ओकाया फास्ट एफ2टी: 99,400
  • ओकाया फ्रीडम: 75,899
  • ओकाया फास्ट: किंमत 1.25 – 1.38 लाख
  • ओकाया फास्ट एफ 2बी: 1.03 लाख

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment