कमी किंमतीमध्ये ओलाची स्कूटर न्या घरी, कारण मिळतेय आता 5000 रुपयांची ऑफर

Aishwarya Potdar

इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? पण आता इलेक्ट्रिक स्कूटरवरची सबसीडी बंद होणार म्हणून निर्णय घ्यायला आढेवेढे घेताय का? मग आता तुमची काळजीच मिटली म्हणून समजा, कारण इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप कंपनी ओला इलेक्ट्रिक आता त्यांच्या बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरवर ऑफर देत आहे. ही Ola Electric ऑफर नक्की काय आहे? ओलाच्या कोणत्या स्कूटरवर आहे आणि किती कालावधीसाठी आहे ? याची सविस्तर माहिती सदर लेखात मिळेल.

ओलाच्या टॉप स्कूटरवर मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक

ओलाच्या टॉप स्कूटर येस 1 प्रो आणि येस वन एयर या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर ही कंपनी 3000 ते 5000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देत आहे, जर तुम्ही या दोन्ही स्कूटरची खरेदी लोन अथवा EMI म्हणजेच हसत्याच्या मदतीने घेत असाल तर तुम्हाला निवडक बँकेच्या कर्ज आणि हप्त्यावर हा कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचारात असाल तर 15 एप्रिलपर्यंत हीच ती सुवर्णसंधी आहे, ज्यमार्फत तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर लाभ मिळू शकतो.

वाचा: टोयोटा टायसर लाँच, मारुतीच्या फ्रॉंक्सवर पडणार का भारी? जाणून घ्या फिचर्स,किंमत, बुकिंग-डिलीवरी आणि सर्व काही

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

काय आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑफर?

ओला येस वन प्रो या स्कूटरची किंमत 1,29,000 रुपये इतकी आहे तर ओला येस वन एयरची किंमत 1,04,999 इतकी आहे आणि ह्या स्कूटरवर तुम्हाला 4 प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत.

  1. 2,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस
  2. एक्सटेंडेड वॉरंटीवर 50% सवलत
  3. क्रेडिट कार्ड EMI वर 5000 रुपयांपर्यंत सवलत
  4. ओला एस वन एक्स प्लस वर 20,000 हजारांची सवलत

जर तुम्ही Ola S1 Pro जनरेशन 2 आणि S1 Air स्कूटर खरेदी करताना तुमची पेट्रोल स्कूटर एक्स्चेंज केली, तर तुम्हाला 2,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळणार आहे सोबत Ola S1 Pro, S1, S1 Air आणि S1 X+ या स्कूटरच्या खरेदीवर एक्सटेंडेड म्हणजे वाढीव वॉरंटीवर तुम्हाला 50% ऑफ मिळणार आहे. तुम्ही जर क्रेडिट कार्डच्या मदतीने ह्या स्कूटरची खरेदी केली, तर तुम्हाला 5% ऑफ ते 5000 रुपये ऑफचा फायदा मिळू शकतो. S1 X+च्या मूळ खरेदीवर खरेदीवर 20,000 हजारांची सवलत मिळून, ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त 90,000 किंमतीमध्ये विकत घेऊ शकता.

वाचा: 30 लाखाच्या आतमध्ये मिळणार महिंद्राची नवीन 7 सीटर ईव्ही आणि चाचणीदरम्यान कळली डिझाईनची माहिती

ओला येस वन प्रो माहिती

ओला येस वन प्रो या स्कूटरला 4 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे 180- 195 किमी रेंज मिळते. या स्कूटरचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास इतका आहे. या स्कूटरची किंमत 1.4 लाखापासून सुरू होते ते 1,47 लाखावर संपते.

वाचा: मोठ्या कुटुंबासाठी टोयाटोची एक्सवॅन, दुसऱ्या सीटचा बनतो टेबल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ओला येस वन एयर माहिती

ओला येस वन एयरची किंमत 1.2 लाख इतकी असून या स्कूटरमध्ये 3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे स्कूटर एका चार्जमध्ये 101 किमी इतकी रेंज देते. तुम्हाला या स्कूटरच्या डिस्काउंट सोबत अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या ओला शोरूममध्ये भेटू देऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment