मुंबईच्या भर रस्त्यावर गोलमालचा अभिनेता इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना दिसला !

आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटीनासुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची भुरळ पडली आहे ही काही नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही, ह्याचंच ताज उदाहरण म्हणजे अभिनेता कुणाल खेमूची मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावरची इलेक्ट्रिक स्कूटरची राईड. कुणाल खेमू हा हा बॉलिवूड मध्ये एक चांगला अभिनेता आणि डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. पतुडी यांचा जावई आणि सैफ अळी खानचा मेहुणा कुणाल याने, ‘गो गोवा गॉन, ढोल, गोलमाल 3 आणि सुपरस्टार’ सारख्या हिट चित्रपटामध्ये दर्जेदार काम आहे, याआधी ऍक्टिंगमुळे चर्चेत येणारा हा अभिनेता आता गर्दीत इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेत असल्यामुळे अचानक चर्चेत आला आहे.

मुंबईच्या ट्रॅफिकला डूच्चू देत कुणालची इलेक्ट्रिक स्कूटर राईड

याआधीसुद्धा कुणाल इलेक्ट्रिक स्कूटरला चालवण्याचा अनुभव घेत असताना चाहत्यांनी व्हिडीओ बनवून शेयर केले आहेत, ज्यामध्ये कुणाल अगदी कॅज्युअल टीशर्ट – कार्गो ट्राऊझर आणि शूजमध्ये दिसून येत होता. जेव्हा कुणालचा हा व्हिडीओ इंटरनेट वर व्हायरल होत होता, तेव्हा त्याच्या चाहत्यांना कुणालच्या ह्या कृतीचं अप्रूप वाटले आणि आता पुन्हा एकदा वर्दळीच्या रस्त्यावर कुणा ह्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या राईडने कुणाल मधला सामान्य माणूस दिसून आला आहे. भल्या मोठ्या ट्रॅफिक च्या लाईनला बाय-बाय करताना ह्या अभिनेत्याकडे इ- किक स्कूटर होती. जिकडे सिलेब्रिटी पाण्यासारखा पैसा कारमध्ये ओतताना हा अभिनेता मस्तपणे आरामात इलेक्ट्रीक स्कूटरच्या राईडिंगचा अनुभव घेत होता. काही चाहत्यांना कुणालच्या या राईडच कौतुक वाटले तर काहीना चर्चेसाठी केलेला स्टँट वाटला.

वाचा: जगातली पहिली ऑटोमॅटिक ओलाची स्कूटर, ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या ओला सोलोची संपूर्ण माहिती

वाचा: इथे मिळणार तुम्हाला मारुती जिमनीवर २ लाखापेक्षा जास्त डिस्काउंट, जाणून घ्या इंजिन आणि फिचर्स माहिती

वाचा: एथर रिझताचे बुकिंग सुरु, 999 रुपये भरुन करा ह्या सोप्या पद्दतीने बुकिंग

कलयुग, जख्म आणि कंजूस मख्खीचुस सारख्या चित्रपटामध्ये कुणालने कमाल एक्टिंग केली असून आता कुणालने दिग्दर्शित केलेला मैडगॉन एक्सप्रेस हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, या चित्रपटांमध्ये दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी यांनी एक्टिंग केली  असून हा चित्रपट गोव्याच्या सहलीला निघालेल्या तीन मित्राच्या प्रवासावर आधारित आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरचे मालक असणारे सेलिब्रिटी

सामान्य माणसापासून सेलिब्रिटी सुद्धा इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक स्कूटरचे चाहते झालेले आहेत. लोकप्रिय कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीने सुद्धा एथर एनर्जीची नव्याने लाँच झालेली एथर रितझा विकत घेतले असून ही बातमी खुद्द अनुभवने त्याच्या ट्विटर हँडलवरून दिली होती. रितझा इलेक्ट्रिक स्कूटर ही आजपर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधली सर्वात मोठी सीट असणारी स्कूटर म्हणून नावारूपास आली आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी इतका असून एका चार्जमध्ये ही स्कूटर 160 किमीची रेंज देते. नुकतेचं एथरने ह्या नव्या स्कूटरची किंमत सुद्धा जाहीर केली आहे, रितझाला 1.10 लाखात लाँच करण्यात आले आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment