इलेक्ट्रिक अल्टो बाजारात हजर ! ही वाचा Maruti Alto Electric ची सगळी माहिती

Maruti Suzuki Alto Electric version

मारुती सुझुकीची लोकप्रिय आणि सर्वात विकली जाणारे अल्टो ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लवकरच बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध होणार आहे या इलेक्ट्रिक अल्टोला 200 पर्यंतची रेंज मिळणार आहे.

इलेक्ट्रिक अल्टोचे हायलाईट 

  • चालू अल्टो इतकीच कॉम्पॅक्ट 
  • पॉवर पॅक आणि फन-टू-ड्राइव
  • फास्ट चार्जर ने फक्त एका तासात 80% पर्यंत चार्ज होणार

आतापर्यंत इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स सारख्या कार मेकर कंपनीचे नाव घेतले जायचं! पण आता यानंतर टाटा मोटर्सच्या टाटा नॅनो सोबत सारखेच सारखीच मारुतीची अल्टो पण इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये वाहन बाजारपेठेत पाय टाकत आहे. चला जाणून घेऊया अल्टो ईव्ही भारतीय बाजारपेठेत कधीपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे तसेच या कारचे ॲडव्हान्स फीचर्स स्पेसिफिकेशन सोबत अल्टो ईव्हीचे किंमत सुद्धा.

मारुती सुझुकी ने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले पाऊल टाकण्यासाठी येत्या काही वर्षात दहा लाखाहून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकण्याचा निश्चय केलेला आहे, म्हणूनच या कारमेकर कंपनी त्यांचे सर्वात हायेस्ट मायलेज आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये विकली जाणारी सुझुकी अल्टोच इलेक्ट्रिक व्हर्जन भारतीय बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करून देत आहे या अल्टो कार सोबत लवकरच मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक बॅगन आर सुद्धा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे.

इलेक्ट्रिक अल्टो बॅटरी आणि रेंज

सध्या चालू मारुती अल्टो या कारची लांबी 3445mm, रुंदी 1515mm, उंची 1475mm आणि व्हीलबेस 2360mm इतका आहे, दरम्यान मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक अल्टोची मापे सुद्धा चालू अल्टो सारखीच असण्याची शक्यता मांडली जाते. त्यात सोबत चालू अल्टोला 800 cc च पेट्रोल इंजिन मिळतं जे 69 Nm इतका टॉर्क आणि 47 BHP इतकी पॉवर जनरेट करतात, तर त्याच दरम्यान इलेक्ट्रिक अल्टोमध्ये 26kWh चा बॅटरी पॅक देण्यात येणार आहे, सोबत सिंगल स्पीड आल्टोमॅटिक ट्रान्समिशनचा सुद्धा पर्याय दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक अल्टो मधली बॅटरी 75 BHP इतका इतकी पॉवर आणि 170 Nm इतका टॉक जनरेट करत करू शकते. या कार मधील बॅटरी 100% चार्ज करण्यासाठी चार तास लागतात जर तुम्ही फास्ट चार्जरने या कारची बॅटरी चार्ज केली तर फक्त 60 मिनिटात 0 ते 80 टक्के इतकी या कारची बॅटरी चार्ज होऊ शकते. यातील लिथियम आयन बॅटरी पॅक एका चार्ज वर 300 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकतो.

इलेक्ट्रिक अल्टो फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

सेफ्टीसाठी या कारमध्ये ABS आणि EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट सारखे स्टॅंडर्ड फीचर्स देण्यात येतील. इलेक्ट्रिक अल्टो ऍडव्हान्स फीचर्स मध्ये किलेस एन्ट्री, स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल, हेड लॅम्प सोबत टेल लॅम्प, म्युझिक सिस्टीम, आल्टोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारखे टीचर्स देण्यात येणार आहेत.

अल्टो ईव्ही किंमत

मारुती अल्टो स्टॅंडर्ड व्हेरिएंट 2 लाख ते 5 लाख या किमती दरम्यानचे आहे तर त्या तुलनेत मारुती अल्टो ईव्हीची किंमत 5 लाख ते 7 लाख यादरम्यान असण्याची शक्यता मांडली जातेय.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment