Tata Punch EV पुन्हा कॅमरा-कैद, नव्या स्पाईशॉटमध्ये दिसले हे ‘कमालीचे बदल‘

Spyshots of Upcoming Tata Punch Ev: टाटा पंच च्या पुन्हा एकदा चाचणी करताना काही फोटोस लीक झाले आहेत, ज्या पाहून टाटा पंच बाबतीतली महत्त्वाची माहिती बाहेर पडत आहे. ज्यामध्ये अलॉय व्हीलची आणि टचस्क्रीन बद्दल खास माहिती बाहेर पडत आहे. हेरगिरी केलेल्या मॉडेल्स मध्ये जाणून आलेले बदल आणि स्पाईकार Tata Punch Ev च्या मांडण्यात आलेल्या अपेक्षा

  • टाटाची नव्या वर्षातली लॉन्च होणारी कार ही Tata Punch Ev असणार
  • नेक्सॉनसारखे स्प्लिट हेडलाइट्स
  • केबिन फिचर्स बदलू शकतात
  • दोन बॅटरी पॅक असण्याची शक्यता
  • २०२४ पर्यंत १५ लाखाच्या आत किंमत असणारी इलेक्ट्रिक कार

याआधीसुद्धा चाचणी दरम्यात ह्या गाडीमधल्या डिझाइन केलेले लोखंडी जाळी ,डिस्क ब्रेक आणि नवीन एअर डॅम हाउसिंग बाबतची माहिती बाहेर पडली होती, आणि आता स्पाईशॉटद्वारे पुन्हा एकदा कॅमेरामध्ये कैद झालेली Tata Punch Ev मध्ये सगळ्यात महत्वाचा दोन गोष्टी आढळून आल्या, ज्यात अलॉय व्हीलची अनुपस्थिती आणि फ्री-फ्लोटिंग टचस्क्रीन गोष्टी आहेत.

IMG 0566

या Tata Punch Ev मध्ये सेमि डिजिटल ड्रायव्हर डिसप्ले , ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल आणि ३६० डिग्री कैमरा या फिचर्स असण्याची शक्यता मांडली जातेय. गाडीमध्ये नवीन नेक्सॉन सारख्या काही वैशिष्ट्ये देण्यात ऐल आहेत ज्यापैकी स्प्लिट-हेडलाइट सेटअप आणि एलईडी डीआरएल. गाडीच्या आतल्या स्पाईशॉटस मध्ये  दिसल आहे की,’ टू स्पॉक स्टिअरिंग व्हील त्यावर टाटाचा लोगो’ झळकून येतो, शिवाय पॅडल शिफ्टर, ज्यामुळे बॅटेरीची लेव्हल रिजनरेट करायला मदत होते.

Tata safety बाबतीत इतर गाड्यांच्या तुलनेत अव्वल येत, आणि म्हणूनच गाडीत असणाऱ्या इतर प्रवासी सोबत चालक यांच्यासाठी एकूण ६ एअरबॅग पुरवण्यात आल्या आहेत , सोबत इलेक्ट्रिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS) हेसुद्धा ह्या गाडीत असण्याची शक्यता मांडली जातेय.

अशी असणार Tata Punch Ev ची बॅटरी

IMG 0565

 

दोन बॅटरी पैक असणारी Tata Punch Ev ची ५०० किमी इतकी असणार आहे. यातील इलेक्ट्रिक मोटर साधारण 75 PS to 100 PS इतकी पॉवर तयार करू शकते.

‘या’ तारखेला होणार TATA इलेक्ट्रिक कार लॉन्च

लवकरच ही गाडी नववर्षात आपल्या भेटीस येत आहे, १५ लाखांच्या आत किमतीची ही EV असणार आहे. ह्या गाडीच्या ठराविक किमतीबाबत सांगायचं तर १२ लाख पासून सुरु होणारी ही गाडी आहे. ही किंमत एक्स शोरूम आहे. गाडीची वैशिष्ठे आणि फिचर्स समोर ठेवल्यास ह्या गाडीची तुलना शक्यता आहे. MG Comet EV आणि Tata Tiago EV हिच्यासोबत केली जाऊ शकते.

हेपण वाचा:

Best SUV Tata Nexon Price: इतकी आहे ‘नवीन टाटा नेक्सॉन’ ची भारतात किंमत

New Tata Altroz Racer: टाटा मोटर्स करणार धमाका, Hyundai i20 N line चा द एन्ड?

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment