दिवाळीच्या ऐन मोक्यावर, OLA स्कुटर रेकॉडब्रेकिंग विक्रीमुळे पुन्हा चर्चेत…!

EV म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनाच्या यादीतील नावाजलेलं नाव ‘ओला’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, आणि ह्या चर्चेचं कारण आहे, ओलाने या महिन्यातील केलेली कमाई…! 2023 च्या ऑक्टोबरमध्ये ओला कंपनीने एक नाही, हजार नाही, दहा हजारपण नाही तर चक्क 24,000 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केलीये. आणि ओला हि भारतातील एकमेक EV वेहिकल ठरली आहे, जिने 35% शेअर मार्केट मानाने खाल्लंय.

ओला कंपनीची ऑक्टोबर 2023 मधली गाड्यांची हायेस्ट विक्री

जसा 2023 चा ऑक्टोबर आला, तशी भारतामध्ये सणासुदीला सुरवात झाली. ऐन नवरात्र,दसरा  आणि दिवाळीच्या मुहूर्तावर भारतातील लोक गाड्यांच्या शोरूमबाहेर गर्दी करायला लागली आणि सगळ्यात जास्त गर्दी होती, ती म्हणजे OLA इलेक्ट्रिक EV गाडयांच्या शोरूमबाहेर…! ओला कंपीनीने माहिती देत सांगितलं, कि ऐन शुभ मुहूर्ताच्या मोक्यावर लोकांनी OLA ची प्रचंड प्रमाणात खरेदी केली, आणि आता ह्या पेट्रोल-डिझेलच्या जमान्यात EV गाड्या भारी पडायला लागल्या आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये ओला कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत 2.5 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ह्या कंपनीचे सोने झाले आहे. आणि त्यात दिवाळी चार दिवसावर ठेपली असून, अजूनही OLA EV ची मागणी वाढत आहे.

फक्त 5 महिन्यांत 1 लाख युनिट्सची विक्री…

ओला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये OLA इलेक्ट्रिक गाडीला प्रचंड प्रमाणात मागणी होती,अक्षरश ओला कंपनीने केवळ 5 महिन्यात स्वतःच्या EV विकून सगळं मार्केट टाईट केलं. 2023 च्या एका वर्षात ओला कंपीनीच्या गाडीची 100% मागणी वाढत जवळजवळ एक लाख स्कूटर ची विक्री केली गेली.

होंडाची ‘हि स्पोर्ट्स बाईक’ फक्त इतक्या लाखात, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत..!

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 पहिल तर क्लासिक 350 विसरून जाल!

OLA इलेक्ट्रिक EV खरेदी करण्याची 4 कारणे

बाकीच्या कंपनीच्या तुलनेत OLA ने मार्केटमध्ये मोठी झेप घेतलीये, अशी काय कारण आहेत, काय फीचर्स आहेत कि, OLA EV ला लोक इतके पसंद करत आहेत ?

  • रेंज
  • परफॉर्ममेन्स
  • अंडर सीट स्टोरेज
  • परावडणारी किंमत

श्रीमंतांपासून ते सर्वसामान्यांच्या खिशाला परडवणारी OLA गाडी अनेक व्हरायटी आणि डिझाईन मध्ये परवडणाऱ्या किंमतीत मिळते. या मध्ये असणाऱ्या तीन मॉडेलमध्ये प्रत्येकीची वेगवेगळी खासियत , फीचर्स आणि किंमत असल्याने ग्राहकांचा कल ओला ह्या गाडीच्या दिशेने वाढला आहे. आणि हो हो म्हणत 2023 मध्ये जवळपास 35 टक्के मार्केटचे शेअर स्वतःकडे ओढून घेतले आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment