होंडाची ‘हि स्पोर्ट्स बाईक’ फक्त इतक्या लाखात, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत..!

सध्याच्या घडीला adventure motorcycles ची खूप मागणी आहे, आणि ह्या sports motorcycle च्या चढाव स्पर्धेत आता होंडाने एंट्री केलीये, त्यांच्या नवीन Honda XL750 Transalp च्या माध्यमातून. गेल्या सोमवारी होंडाच्या जपानी निर्मात्याने, पूर्णपणे जपानमध्ये बिल्ट-अप (CBU) करून भारतात आणली जाणारी, ‘होंडा XL750 Transalp’ लॉंच केले असून, हि नवी कोरी गाडी फक्त बिगविंग डिलरशिपच्या मार्फत विकली जाईल, अशी माहिती दिली आहे. तुम्हीदेखील Sports motorcycle चे फॅन असाल आणि ह्या नवीन Honda XL750 Transalp विकत घेण्याचा विचार करत असाल,तर  हि संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे, कारण या माहितीत तुम्हाला Honda XL750 Transalp बद्दल वैशिष्ट्ये,इंजिन, डिझाइन- रंग पर्याय आणि किंमत मिळेल.

Honda XL750 Transalp: इंजिन पॉवर फिगर

Honda XL750 Transalp च इंजिन ‘लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन’ इंजिन आहे. ज्याची 90bhp आणि 75Nm टॉर्क बनवण्याची क्षमता आहे.  या गाडीचं इंजिन अजून चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी सिलेंडरला ‘निकेल-सिलिकॉन कार्बाइडमध्ये’ (Ni-SiC) मध्ये कोटिंग केले आहे. शिवाय या Honda XL750 Transalp च्या लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिनमध्ये थ्रोटल बॉडी डाउनड्राफ्ट इनटेक दिला आहे.

या वैशिष्ट्यांमुळे Honda XL750 Transalp मोटोरसायकल चर्चेत

5.0 इंचाच्या TFT पँनेल असणारी हि Honda XL750 Transalp मध्ये एका Bike rider ला गरज असेल इतके पर्याय display मध्ये दिले आहेत, ज्यात इंजिन पॅरामीटर्स ,गियर-पोझिशन इंडिकेटर,स्पीडोमीटर, टॅकोमीटर, इंधन गेज आणि वापर, राइडिंग मोड आणि इतर पर्याय display मध्ये दिसतात. सोयीनुसार चालक समोर असणारा डिस्प्लेच मॅनेजमेंट स्क्रीनच्या मदतीने किंवा डाव्या हँडलबारवरील स्विचगियरच्या मदतीने करू शकतो.

जावा येझडी वर मिळत आहे खास दिवाळी ऑफर आणि ४ वर्ष एक्सटेंडेड वॉरंटी, फक्त १८८८ च्या ईएमआय मध्ये घरी न्या

रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 पहिल तर क्लासिक 350 विसरून जाल!

रायडर्सला भावणारी हि वैशिष्ट्य आणि हि 5 राइडिंग मोड आहेत Honda XL750 Transalp मध्ये 

खास रायडर्स साठी ह्या Honda XL750 Transalp motorcycle मध्ये स्पोर्ट मोड, स्टँडर्ड मोड, रेन मोड, ग्रेव्हल मोड आणि यूजर मोड दिला आहे. गाडी चालवताना ‘स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम’ च्या मार्फत चालक स्वतःचा मोबाईल अथवा स्मार्टफोन बाईकशी कनेक्ट करून कॉल,मॅसेज ,म्युसिक आणि नेव्हिगेशन याचा वापर करू शकतो.

Honda XL750 Transalp:  रंग, वैशिष्ट्ये आणि किंमत

कोणतीही गाडी घेताना चालक सेफटी फीचर्सचा विचार सर्वात आधी करतो. म्हणूनच होंडाने या गाडीत ‘आपत्कालीन स्टॉप सिग्नल’ फिचर दिले आहे आहे, जे लॅम्प फ्लॅश करून मागच्या वाहनांना अचानक ब्रेकिंगची माहिती देते आणि दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीमध्ये दिलेलं ‘ऑटोमॅटिक टर्न सिग्नल फंक्शन’ ज्यामुळे चालकाला हँडल बारवरून हात न काढता वळण घेता येते.

या गाडीमध्ये रॉस व्हाईट आणि मॅट बॅलिस्टिक ब्लॅक या दोन रंगांचा पर्याय मिळणार आहे. शिवाय या गाडीची डिलिव्हरीसुद्धा सुरु झाली आहे आता भारतामध्ये काही ठराविक शहरांमध्ये या Honda XL750 Transalp च्या बुकिंग सुरु झाल्या आहेत ज्यामध्ये मुंबई , हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, इंदूर गुरुग्राम , कोची आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

भारतामधल्या , या नव्या XL750 Transalp sports bike ची किंमत 10,99,990 रुपये इतकी किंमत ठेवली गेली आहे.

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment