TVS scooty pep plus: ‘यंगस्टरच्या खिशाला परवडणारी स्कूटी’ कॉलेजमध्ये जायला TVS ची बेस्ट स्कूटी, वाचा संपूर्ण माहिती

कॉलेजमध्ये जाण्यासाठी स्कूटर हवीये ? पण बजेट कमी आहे? मग काळजी कशाला? कॉलेजमध्ये जाणाऱ्या  मुला-मुलींसाठी अशी एक स्कूटी लाँच झाली आहे, जी एक लाख रुपयांच्या आतमध्ये म्हणजे अगदी 70 हजारापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळते. या स्कूटरचे नाव आहे; टीव्हीएस स्कूटी पेप प्लस. तुम्ही जर रोजच्या वापरासाठी खासकरून मुलींसाठी हलक्या वजनाची स्कूटी शोधत असाल तर तुमच्यासाठी टीव्हीयेस स्कूटी पेप प्लस बेस्ट स्कुटी म्हणून पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेवूया या स्कूटरचे फिचर्स आणि संपूर्ण माहिती.

टीव्हीयेस स्कूटी पेप प्लस

टीव्हीयेस स्कूटी पेप प्लस ही स्कूटर कॉलेजकुमारासाठी किंवा तरुण मुलींसाठी एक उत्तम आणि स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. ही स्कूटर एक्वा मॅट, निरो ब्लू, कोरल मॅट, ब्लॅक, गुलाबी आणि तपकिरी रंगामधून उपलब्ध आहे. या स्कूटीमध्ये आकर्षित करणारी गोष्ठ म्हणजे स्कुटीमध्ये असणारा प्रीमियम 3D लोगो आणि टेक्चर्ड प्रीमियम सीट्स. स्कूटरच्या इलेक्ट्रिक एडवांस्ड फिचर्समध्ये ECU कंट्रोल्ड इग्निशन सिस्टिम, 12 V-5 AH ची बॅटरी, हेडलँप, टर्न-सिग्नल लॅम्प  आणि टेल- लॅम्प चा समावेश आहे.

वाचा: जगातील पहिली सीएनजी बाईक, बजाज पल्सरबद्दल जाणून घ्या सर्व माहिती

टीव्हीयेस स्कूटी पेप प्लस फिचर्स आणि संपूर्ण माहिती

पुढील सस्पेन्शन- टेलिस्कोपिक आणि मागील म्हणजेच रिअर सस्पेन्शन मोनोशॉक आहेत. स्कूटी अतिशय लाइटवेट म्हणजेच 100 किलोपेक्षासुद्धा कमी वजनाची आहे. 1230 मिमी व्हीलबेस, 135 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 4.2 लिटरची फ्युएल टँक या स्कुटीमध्ये देण्यात आली आहे. स्कूटीमध्ये सिंगल सिलेंडर फ्युएल इंजेक्शन – 87.8cc BS6 इंजिन दिले गेले आहे, जे 6.5 NM इतका टॉर्क आणि  5.36 bhp इतकी पॉवर तयार करत. एका लीटरच्या पेट्रोलमध्ये ही स्कूटी 80 किमी पेक्षा अधिक मायलेज देते. कमी किंमतीमध्ये परवडणारी म्हणून TVS Scooty Pep Plus हा एक उत्तम पर्याय आहे. स्कूटीच्या इतर एडवांस्ड फिचर्समध्ये फूटलॅम्प, साइड स्टँड इंडिकेटर, स्टोरेज अंडर सिट, USB चार्जिंग पोर्ट सारखे इतर फिचर्स मिळतात. ह्या स्कूटीवर 5 वर्षाची वॉरंटी मिळते. ह्या स्कुटीची किंमत 66,000 रुपये इतकी आहे. तुम्हाला जर या स्कुटीची बुकिंग अथवा टेस्ट रायिड घ्यायची असेल तर तुम्ही थेट TVS शोरूममध्ये भेट देऊ शकता.

वाचा: तुफान कमाई केली होंडाने, पाहा Honda 2W विक्री-अहवाल

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment