Hyundai Discount: ह्युंदाईच्या कार्स वर तब्ब्ल दीड लाखांचा डिस्काउंट; जाणून घ्या कोणत्या कार वर किती डिस्काउंट

Hyundai Car Discount December 2023 – डिसेंबर महिना हा कार खरेदी करणाऱ्यांसाठी खूप खास महिना असतो कारण प्रत्येक ऑटो कंपन्या त्यांच्या कार्स वर लाखोंचा डिस्काउंट देतात. सध्या भारतातील नंबर २ ची कार विक्रेता कंपनीने महाराष्ट्रातील शोरूम मध्ये सर्व कार्स वर डिस्काउंट जाहीर केला असून काही ठराविक एसयूव्हीज वर ततब्ब्ल दीड लाख रुपयां पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. कोणत्या कार वर किती डिस्काउंट मिळणार आहे या लेखात सविस्तर जाणून घेऊया.

ह्युंदाई डिसेंबर डिस्काउंट धमाका ऑफर २०२३ महाराष्ट्र

जानेवारी २०२४ रोजी नवीन वर्षात ग्राहकांना ह्युंदाईच्या वाहनांवर प्राईज हाईक झालेली पाहायला मिळणार आहे. किंमत वाढी सह कंपनीचा डिस्काउंट सुद्धा कमी केला जाणार असल्याने ग्राहकांना डबल लॉस होऊन कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या ह्युंदाईच्या कार पोर्टफोलिओ मधील प्रत्येक वाहनांवर डिस्काउंट उपलब्ध आहे. यामध्ये ह्युंदाई निओस i१०, i२०, क्रेटा, एक्सटर, व्हेन्यू आणि वेर्णा हि वाहन सामील आहेत.

ह्युंदाई i२० डिसेंबर डिस्काउंट

image 2

ह्युंदाई i२० या प्रीमियम हॅचबॅक वर ₹७५ हजारां पर्यंत डिस्काउंट आणि बेनेफिट्स ग्राहकांना दिला जाणार आहे.

क्रेटा डिसेंबर डिस्काउंट

image 3

ह्युंदाई क्रेटा डिसेंबर डिस्काउंट ऑफर २०२३ या अंतर्गत नवीन एसयूव्ही बायर्स ना पेट्रोल मॉडेल वर तब्ब्ल ₹५० हजारां पर्यंत डिस्काउंट आणि बेनेफिट्स मिळणार आहे.

एक्सटर डिसेंबर डिस्काउंट

image 4

डिसेंबर डिस्काउंट ऑफर २०२३ मध्ये नुकतीच लाँच झालेली मायक्रो एसयूव्ही एक्सटर या गाडीला कंपनी तर्फे EX या व्हेरिएंट करीता ₹१० हजारां पर्यंत ऍक्सेसरीज डिस्काउंट दिला जाणार आहे.

वाचा – Hyundai Creta facelift :नव्या फिचरसह ह्युंदाई क्रेटा कारच ‘फेसलिफ्ट’ जाणून घ्या नवे अपडेट आणि किंमत

व्हेन्यू डिसेंबर डिस्काउंट

image 1

लोकप्रिय मिनी एसयूव्ही ह्युंदाई व्हेन्यू या गाडीवर तब्ब्ल ₹१ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ग्राहकांना दिला जाणार आहे.

वाचा – Hyundai Verna 5 Star: काय सांगता? ह्युंदाई वेरना ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट मध्ये मिळाले ५ स्टार्स

वेर्णा डिसेंबर डिस्काउंट

HyundaiVerna Pole scaled

ह्युंदाई वेर्णा या फाईव्ह स्टार रेटेड सेफटी सह येणारी सिडान तुम्हाला मोठ्या डिस्काउंट सह घरी नेण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने या गाडीवर ₹१ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बेनेफिट्स दिले जाणार आहेत.

ह्युंदाई ग्रँड निओस i१० डिसेंबर डिस्काउंट

image

ह्युंदाई ग्रँड निओस i१० डिसेंबर डिस्काउंट मध्ये महाराष्ट्रातील विविध शहरात ₹१ लाख ५० हजारां पर्यंत बेनेफिट्स आणि डिस्काउंट दिला जाणार आहे.

ह्युंदाई ग्रँड निओस i१० भारतातील एक लोकप्रिय हॅचबॅक असून यामध्ये १.२ लीटर कप्पा पेट्रोल इंजिन दिलेले आहे हे इंजिन ६००० rpm वर ८३ ps पॉवर निर्माण करते. गाडीला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही ट्रान्समिशन चा पर्याय दिलेला आहे. इंधन पर्यायात नुसते पेट्रोल आणि पेट्रोल सोबत सीएनजी चा ऑपशन या गाडीत दिला जातो. पेट्रोल मध्ये 20.7 kmpl सीएनजी मध्ये 26.2 kmpl  चे क्लेम मायलेज हि गाडी प्रदान करते. Hyundai Grand i10 Nios ची भारतामध्ये किंमत 5.29 लाख रुपये ते 8.51 लाख एक्स-शोरूम रुपये पर्यंत आहे. Hyundai Grand i10 Nios Magna CNG मॅन्युअल वेरिएंटची किंमत 7.07 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment