Hyundai Creta facelift :नव्या फिचरसह ह्युंदाई क्रेटा कारच ‘फेसलिफ्ट’ जाणून घ्या नवे अपडेट आणि किंमत

Ajinkya Sidwadkar

कारच्या दुनियेत बहुप्रतिक्षित Hyundai Creta च फेसलिफ्ट एंट्री करायला सज्ज झाल आहे. 16 जानेवारी 2024 दिवशी ह्युंदाई क्रेटाच्या फेसलिफ्टच अनावरण होणार आहे. ह्युंदाईची बेस्ट-सेलर SUV Creta चे फेसलिफ्ट डिझाइन, वैशिष्ट्ये, इंजिन वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी खालील माहिती जरूर वाचा.

  • ह्युंदाईची माहिती
  • ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टचे असे असणार अपडेट
  • Hyundai Creta facelift ची वैशिष्ट्ये

ह्युंदाईची माहिती

Hyundai च्या एक्स्टर ,venue, ग्रँड i10, NIOS, I20 या गाड्यांच्या यादीत Hyundai Creta ची प्रचंड क्रेझ आहे. २०२० पासून भारतीय बाजारपेठेत विकली जाणारी क्रेटा परदेशीय बाजारपेठेतसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. आतापर्यंत ह्युंदाईची वाहने अपडेट करुन इतर देशांच्या बाजारपेठेत विकल्या जात असायच्या पण असे अपडेट भारतात ह्युंदाईने क्रेटामध्ये कधी केले नाहीत. भारतामध्ये क्रेताच्या बाबतीत घडणारा हा पहिला बदल असणार आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

ह्युदाई क्रेटा फेसलिफ्ट : अपडेट आणि डिझाईन

क्रेटाचे फेसलिफ्ट करताना जास्त काही छेडछाणी एन करता थोडक्यात आणि किरकोळ बदल शिवाय नवीन अलॉय व्हील डिझाइन या गाडीत असणार आहेत. या गाडीची चाके थोडी मोठी असू शकतात अशी शक्यता मांडली जातेय. H-shaped LED DRLs, स्प्लिट वर्टिकल LED हेडलॅम्प आणि ब्रॅंडन्यू ग्रि डिझाइन Creta फेसलिफ्टला मिळत आहेत. गाडीच्या बॅकसाईडमध्ये टेल लॅम्प , टेलगेट असू शकतात.

गाडीच्या इंटीरियर बाबतीत बोलायचं झाल तर नवीन इंटीरियर थीम सोबत सगळ्यात महत्वाचा अपडेट ADAS सूट आणि 360-डिग्री कॅमेरा असणार आहे. 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन सुद्धा या गाडीत मिळणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट :इंजिन

इंजिन स्पेसिफिकेशन्स ची माहिती देता या ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट मध्ये 1.5-लीटर NA टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे. ज्याची शक्ती 160 hp इतकी असणार आहे, ह्या SUV कारमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिनसुद्धा आहे. सात-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मॅन्युअल गिअरबॉक्स इंजिनशी जोडले गेलेले मिळणार आहेत.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट: किंमत आणि प्रतिस्पर्धी

इतर SUV गाड्यांच्या यादीतल्या स्कोडा कुशाक, ग्रँड विटारा, किआ सेल्टोस ,फोक्सवॅगन तैगुन, एमजी हेक्टर, सिट्रोएन सी3 एअरक्रॉस यासारख्या गाड्यांना ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट तगडी टक्कर देऊ शकते आणि किमतीच्या बाबतीत जास्त काही खुलासा जरी झालं नसला तरी चालू SUV क्रेटाच्या तुलनेत नव्या ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ची किंमत अधिक असू शकते.

हेपण वाचा:

EV Startup Creatara Launch: IIT दिल्ली इंजिनिअर्सने बनवली ‘क्रिएटारा इलेक्ट्रिक स्कूटर’, जाणून घ्या हा ‘EV स्टार्टअप’

Rising Hybrid Cars: इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ‘हाइब्रिड कारला’ जास्त प्राधान्य..का मिळतेय हाइब्रिड कारला जास्त पसंदी ?

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment