Renault Winter Check-Up Camp: मोफत गाडी चेकअप आणि स्पेअर्सवर तुफान डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

Renault Winter Service Check-Up Camp: रेनॉल्ट इंडिया ने फ्री हिवाळी चेकअप कॅम्प सुरु केला असून नोव्हेंबर २० ते नोव्हेंबर २६ या सहा दिवसांसाठी असणार आहे. रेनॉल्ट कार मालक जवळच्या सर्विस स्टेशन ला जाणून आपली गाडी चेक करण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता.

रेनॉल्ट इंडिया फ्री विंटर चेकअप सर्विस कॅम्प

गाडी सेल झाल्यानंतर ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा आणि ग्राहकांच्या मनात विश्वासाहार्यता वाढावी यासाठी २० नोव्हेंम्बर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मोफत कार चेकअप शिबीर सुरु करण्यात आला आहे. ‘रेनॉल्ट विंटर कॅम्प’ घोषणे नंतर कंपनी वचनबद्धता कायम ठेवत असल्याचे स्पष्ट होते.

रेनॉल्ट इंडियाच्या म्हणण्यानुसार, विंटर सर्विस कॅम्प आयोजन करण्याचे प्राथमिक उद्देश म्हणजे वाहनांच्या इंजिन किंवा इतर पार्टस मध्ये हिवाळ्यात कोणत्या हि प्रकारची बाधा न येता ग्राहकांचा तणाव विरहित ड्रायविंग चा अनुभव कायम राहावा. आपण नेहमीच पाहतो कि, थंडीच्या दिवसांमध्ये वाहन सुरु होण्यास प्रॉब्लेम देते किंवा एका इग्निशन मध्ये सुरु होत नाही, कधी कधी थंडीत गाडी झटके मारते किंवा मिस फायर करते अश्या प्रॉब्लेम्सला ग्राहकांना सामोरे जावे लागू नये याकरिता रेनॉल्ट मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मालकांना गाडीचे प्राथमिक चेकअप आपल्या स्किल्ड आणि वेल क्वालिफाइड टेक्निशिअन्स च्या मदतीने करून देणार आहे आणि ते सुद्धा अगदी मोफत.  अश्या प्रकारच्या पिरियॉडिक चेकअप्स मुळे गाडी प्रॉब्लेम फ्री चालते आणि टेन्शन फ्री ownership experience मिळतो.

स्पेअर पार्टस वर मिळणारा डिस्काउंट

  • लेबरचार्ज वर १५% डिस्काउंट.
  • निवडक पार्टस वर १०% डिस्काउंट (फिल्टर, ब्रेकिंग पार्ट्स, कूलंट आणि ब्रेक ऑइल).
  • निवडक अॅक्सेसरीजवर ५०% पर्यंत सूट (बॉडी आणि सीट कव्हर,बॉडी स्टाईल
    किट, इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीजवर , मॅट्स आणि मड गार्ड, स्टीयरिंग व्हील कव्हर्स, एअर
    डिफ्लेक्टर, आलोय व्हील्स).
  • माय रेनॉल्ट ग्राहकांसाठी निवडक पार्टस आणि अॅक्सेसरीजवर अतिरिक्त ५% सूट
  • एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास १०% ऑफ
  • रोडसाईड असिसीस्टन्ट खरेदी केल्यास १०% बेनेफिट्स.
  • कॅस्ट्रॉल ब्रँडेड इंजिन ऑइल रिप्लेसमेंटवर 5% सूट

हे हि वाचा – Upcoming top 5 Tata EV: या ‘5’ आगामी टाटाच्या इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

तुमच्या रेनॉल्ट कारची नोंदणी कशी करावी?

तुमच्याकडे रेनॉल्टची कोणतीही गाडी असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या नंबर (18003154444 ) वर कॉल करून तुमच्या जवळच्या सर्विस सेंटर वर अपॉइंटमेंट बुक करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही माय रेनॉल्ट अँप द्वारे किंवा जवळच्या शोरूमला संपर्क करू शकता.

टर्म्स आणि कंडिशन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment