ओलाचे नवीन अपडेट, घरी बसून करता येणार स्कूटर अपडेट, ही घ्या माहिती

Published:

Ola S1 X Variant Gets new update

ओला इलेक्ट्रिक कडून ओला येस वन एक्सला अपडेट देण्यात आले आहे, ज्यामध्ये एक खास फिचर्सची आणि रेंजची वाढ झाली आहे, हे अपडेटसाठी तुम्हाला शोरूममध्ये जाण्याची गरज नाही, कारण खालील लेखाद्वारे तुम्ही या स्कूटर अपडेटची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

ओला S1 X तपशील

महाराष्ट्रामध्ये ग्राहकांना ola s 1 x मे मध्येच डिलीव्हर करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Ola S1 X  2 kWh, Ola S1 X Plus 3 kWh आणि Ola S1 X 4 kWh या तीन प्रकारातून बॅटरी पॅक मिळतो. 2 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 95 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतका आहे. 3 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 151 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास आहे आणि 4 kWh मॉडेलची एका चार्जमध्ये 190 किमी इतकी रेंज देण्याची क्षमता आहे. ह्या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास इतका आहे.

ओला S1 X नवीन अपडेट

या स्कूटरच्या नवीन अपडेटसाठी तुम्हाला शोरूममध्ये जाण्याची अजिबात गरज नाहीये, ह्या स्कूटरला OTA अपडेट (ओवर-द-एयर अपडेट) मिळत आहे. जे ऑटोमॅटिक सॉफ्टवरद्वारे स्कूटरला मिळते. त्याचप्रमाणे स्कूटरमध्ये नवा मोड  जोडण्यात आला आहे, ज्याच नाव वेकेशन मोड (vacation mode) आहे. ह्या मोडच्या मदतीने तुम्ही खूप कालावधीसाठी स्कूटर वापरणार नसाल, तेव्हा ह्या मोडला वापरून तुमची स्कूटर डिप स्लीपमध्ये बदलू शकता. ह्या मोड द्वारे तुमची बॅटरी जास्त काळ टिकण्याची मदत होते.

OTA अपडेट (ओवर-द-एयर अपडेट) म्हणजे काय?

ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स म्हणजे नवीन सॉफ्टवेअर, फर्मवेअर किंवा मोबाइल डिव्हाइसवर इतर डेटाची वायरलेस डिलिव्हरी करता येते.

ओलाच्या S1 X वर मिळतोय डिस्काउंट

Ola S1 X च्या 2 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या व्हेरिएंटची मूळ किंमत 79,999 रुपये आहे तर या व्हेरिएंटची सवलतीनंतरची किंमत 69,999 रुपये इतकी आहे. Ola S1 X Plus 3 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या व्हेरिएंटची मूळ किंमत 94,999 रुपये आहे तर या व्हेरिएंटची सवलतीनंतरची किंमत 84,999 रुपये आहे. Ola S1 X 4 kWh बॅटरी पॅक असणाऱ्या या व्हेरिएंटची मूळ किंमत 109,999 रुपये आहे तर या व्हेरिएंटची सवलतीनंतरची किंमत 99,999 रुपये आहे.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment