Tata Nexon VS Suzuki Brezza 2023 – संपूर्ण कंपॅरिजन | कोणती घ्यावी? वाचा माहिती

2023 Tata Nexon Vs Maruti Suzuki Brezza Feature Comparison in Marathi: तुम्हला माहितीये का? टाटा नेक्सॉन भारतातील पाहिली B2-segment SUV ज्यामध्ये ड्रायवर शेजारी बसणाऱ्या पासिंजर साठी सुद्धा हाईट अड्जस्ट करण्याचे फिचर दिले आहे जे ब्रेझा मध्ये दिले जात नाही. Tata Nexon VS Suzuki Brezza यामध्ये कोणत्या गाडीमध्ये उत्कृष्ट इंजिन, मायलेज, लांबी, रुंदी आणि बूट स्पेस दिले आहे, कोणती गाडी प्रॅक्टिकली उत्तम आहे हे डिटेल मध्ये कम्पॅरिजन आजच्या या लेखात असणार आहे.

टाटा निक्सन चे नुकतेच फेसलिफ्ट लाँच करण्यात आले आहे. लाँच होताच गाडी बद्दल लोक खूप चर्चा करू लागले आहेत आणि प्रत्यक्षात बघायला उत्सुक झाले आहेत. गाडीची डिजाईन इतकी जबर आहे कि प्रति स्पर्धी कंपन्या अक्षरशः कोमात गेल्या आहेत. पण ब्रिझा सोडून सध्या निक्सन ची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी मारुती सुझुकी ब्रेझा आहे. त्यामुळे दोन्ही पैकी कोणती कार खरेदी करावी याचा विचार करूनच ग्रहकाची हवा खराब होती.

Tata Nexon VS Suzuki Brezza: डायमेन्शन्स

कंपॅरिजन सुरु करूया डायमेन्शन्स पासून. नवीन निक्सन ची लांबी आहे ३९९५ एमएम आणि ब्रेझ्झा ची लांबीसुद्धा सेम ३९९५ एमएम आहे. निक्सन ची रुंदी आहे १८०४ एमएम आणि ब्रेझ्झा ची रुंदी आहे १७९० एमएम. निक्सन ची उंची १६२० एमएम आहे आणि ब्रेझ्झा ची उंची १६८५ एमएम इतकी आहे. ग्राउंड क्लिअरन्स मध्ये निक्सन ची उंची आहे २०८ एमएम इतकी आणि ब्रेझ्झा ची १९८ एमएम इतकी आहे.

बूट स्पेस च्या बाबतीत टाटा निक्सन मध्ये ३८५ लिटर चा स्पेस दिला जातो आणि दुसरीकडे ब्रेझा मध्ये फक्त ३२८ लिटर चा स्पेस डिक्की मध्ये दिला जातो. यावरून एक समजते कि ब्रेझा ची उंची सोडली तर टाटा निक्सन बूट, लांबी, रुंदी आणि ग्राउंड क्लिअरन्स ने जास्त आहे. त्यामुळे डायमेन्शन्स मध्ये निक्सन जिंकते.

Tata Nexon VS Suzuki Brezza: इंजिन आणि मायलेज

आत्ता बोलूयात गाडीच्या हृदयाबद्दल म्हणजेच इंजिन बद्दल. टाटा ने निक्सन मध्ये पेट्रोल आणि डिजेल दोन्ही चा ऑपशन दिलेला आहे पण ब्रेझा मध्ये फक्त पेट्रोल चा ऑपशन उपलब्ध आहे. ब्रेझा सीएनजी मध्ये सुद्धा उपलब्ध असल्याने हा १ फायदाब्रेझा ला मिळतो. आता दोन्ही कंपन्यांच्या इंजिन च्या पॉवर आणि परफॉर्मन्स बद्दल बोलूयात. टाटा निक्सन मध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन ११८ हॉर्स पॉवर आणि १७० एनएम चा टॉर्क प्रोड्युस करते. दुसरीकडे ब्रेझा मध्ये १.५ लिटर चे नाचुरली ऍस्पिरेटेड ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे जे १०२ हॉर्स पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क जनरेट करते. जर CCआणि smoothness ने तुलना केली तर ब्रेझा मध्ये १५०० सीसी ची इंजिन दिले आहे आणि निक्सन फक्त १२०० सीसी आहे. ब्रेझा मध्ये ४ सिलेंडर इंजिन असल्याने सायलेंट इंजिन मिळते पण निक्सन मध्ये फक्त ३ सिलेंडर असल्याने रेशो जुळत नाही त्यामुळे व्हायब्रेशन्स आणि इंजिन नॉइज जास्त असेल. पण परफॉर्मन्स आणि पॉवर च्या बाबतीत तुलना केली तर निक्सन ब्रेझा च्या तुलनेत जास्त हॉर्स पॉवर आणि टॉर्क प्रोड्युस करते त्यामुळे हे जास्त पॉवरफुल असेल.

रिअल लाईफ मध्ये दोन्ही वाहनांचे इंजिन सफिशिअंट पॉवर प्रोड्युस करते. त्यामुळे रोजच्या वापरात खराब रस्ते, घाट किंवा इतर ठिकाणी प्रॉब्लेम्स येणार नाहीत.

इंजिन बद्दल बोलतोय तर मायलेज वर पण नजर टाकुयात कारण प्रत्येक ग्राहका साठी हि महत्वाची गोष्ट आहे. निक्सन मध्ये १७.०५ kmpl चे मायलेज कंपनीने सांगितले आहे आणि दुसरीकडे ब्रेझा मध्ये १८ kmpl चे मायलेज कंपनीने सांगितले आहे. पण निक्सन पेक्षा ब्रेझा दैनंदिन जीवनात जास्त ऍव्हरेज प्रदान करेल यात काही शंकाच नाही. तुम्ही कशी गाडी चालवता, कोणत्या रस्त्यांवर चालवता यावर सुद्धा ऍव्हरेज ठरते त्यामुळे यात बोलण्यासारखं जास्त काही नाहीये.

टाटा निक्सन विरुद्ध मारुति सुझुकी ब्रेझ्झा: एक्सटेरिअर इंटेरिअर आणि फीचर्स

एक्सटेरिअर पासून सुरु करूयात,

हे बघा ब्रेझा किंवा निक्सन यामधील डिजाईन आणि लुक हे दोन्ही सब्जेक्टिक असू शकत. कोणाला निक्सन आवडू शकते तर कोणाला ब्रेझा, त्यामुळे यावर जास्त भाष्य न केलेलंच बरं. तुम्हीच तुमची चॉईस सांगा बार कमेंट करून.

इंटेरिअर च्या बाबतील निक्सन आणि ब्रेझा चे कंपेरिजन केले तर दोन्ही वाहनात प्रॅक्टिकल फीचर्स दिले आहेत. पण निक्सन चे नवीन जनरेशन चे इंटेरिअर आणि फीचर्स ब्रेझा पेक्षा खूप स्टायलिस्ट आणि आकर्षक आहेत. इंस्ट्रुमेंट कन्सोल मध्ये टाटा निक्सन ला फुल्ली डिजिटल कॉन्सोल दिला आहे तर दुसरीकडे ब्रेझात सेमी डिजिटल कन्सोल आहे. निक्सन मध्ये १०.२५ इंच असणारी हरमन म्युसिक सिस्टिम दिली आहे तर ब्रेझत ९ इंच स्क्रीन दिली आहे. नेकसोन ९ JBLस्पिक्सर्स ने सुसज्ज आहे तर ब्रेझ्झा मध्ये स्टॅंडर्ड ६ स्पिकर्स दिले आहेत. निक्सन चा AC कंट्रोल पॅनल टच बेस आहे तर ब्रेझत बटन्स दिले आहेत. सीट्स निक्सन चे व्हेंटिलेटेड आहेत तर ब्रेझात हा फिचर मिसिंग आहे. ब्रेझात सिम्पल स्टेरिंग दिले जाते जे कॉमन स्टेरिंग आहे पण निक्सन मध्ये २ स्पोक डिजिटल लाईटवाले फ़ुटूरिस्टीक स्टेरिंग दिले आहे. हेड्स अप डिस्प्ले हि एकच अशी गोष्ट आहे जी ब्रेझा मध्ये आहेत परंतु निक्सन मध्ये नाही.

काही कॉमन फीचर्स दोन्ही वाहनात दिले आहेत जसे कि वायरलेस चार्जिंग. क्रूझ कंट्रोल, ऑटो AC, ३६० डिग्री कॅमेरा. रिअर AC व्हेंट्स.

मारुति सुझुकी ब्रेझ्झा विरुद्ध टाटा निक्सन: सेफटी

महत्वाचा मुद्दा जो तुमच्या फॅमिली साठी खूप गरजेचं आहे तो म्हणजे सेफटी. आता तुम्हाला वाटेल कि मारुती सुझुकी च्या सेफटी . पण ब्रेझ्झा उन्मे से नाही है. या गाडीचा ४ स्टार्स मिळाले आहेत जे कि उत्तम आहे. पण. निक्सन पूर्वीच्याच x१ प्लॅटफॉर्म वर बनलेली आहे त्यामुळे ५ स्टार सेफटी प्रदान करते. दोन्ही वाहन सेफटी बाबत उत्तम आहेत पण निक्सन रिअल लाईफ मध्ये नेहमीच टफ सिद्ध झाली आहे.

काँकलुशन: 

एवढं सगळं सांगून सुद्धा तुमचं मन द्विधा मनःस्तिथीत असेल तर हे बघा जर तुम्हाला सगळं जास्त पाहिजे म्हणजे स्पेस, लांबी, फीचर्स, डिजाईन आणि सेफटी तर तुम्ही डोळे झाकून निक्सन घ्या पण. सीएनजी ऑपशन, स्मूथ इंजिन, चांगले मायलेज आणि रिलायबल सर्विस पाहिजे असेल तर ब्रेझ्झा घ्या. जय महाराष्ट्र.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment