मारुतीच्या या स्मार्ट हायब्रीड गाडीने घेतला पेट, रिअल-इस्टेट व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

Ajinkya Sidwadkar

मारुती सुझुकी ची प्रीमियम सात सीटर XL6 या गाडीच्या हायब्रिड झेटा मॉडेला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. हि आग इतकी भीषण होती कि त्यामध्ये रिअल-इस्टेट व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार हि गाडी जानेवारी २०२३ मध्ये खरेदी करण्यात आली होती.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अंचेपल्या टोल प्लाझाजवळ मारुती XL6 ला अचानक आग लागली. या गाडीमध्ये ४८ वर्षीय रियल इस्टेट उद्योजक, अनिल कुमार प्रवास करत होते. ते त्यांच्या राहत्या घरी जलाहल्लीजवळील शेट्टीहल्ली या ठिकाणी जात असताना हा अपघात घडला. कुमार यांनी प्रचंड आगीच्या वेढ्यातून सुटण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु ते गाडीबाहेर पडू शकले नाही आणि त्यांचा गाडीत होरपळून मृत्य झाला. या घटने नंतर हायब्रीड वाहनांच्या सुरक्षितते बाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

काय आहे हायब्रीड तंत्रज्ञान?

पेट्रोल किंवा डिझेल वाहनांच्या सोबतीने चांगले मायलेज मिळावे आणि इंधन आयातीचा भार कमी व्हावा यासाठी या तंत्रज्ञानाला वाहनात वापरले जात आहे. या हायब्रीड टेक्नोलोंजि मुळे गाडी इंजिन पॉवर सोबतच बॅटरी आणि मोटरच्या साहाय्याने इलेकट्रीक पॉवर ने चालते ज्यामुळे जास्तीत जास्त मायलेज मिळते शिवाय नॉर्मल इलेकट्रीक वाहन सारखे चार्ज साठी वाट पाहावी लागत नाही आणि गाडी कायनेटिक एनर्जीने बॅटरीला चार्ज करत राहते ज्याने युटिलायजेशन उत्तम होते.

सध्या मारुती, टोयोटा, होंडा आणि ह्युंदाई या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून अनेक वाहन या प्रकारामध्ये येत आहेत. अश्या प्रकारच्या गाडीमध्ये लिथियम आयन बॅटरी दिलेली असते जी अंडर बॉडी फिट केलेली असते. या बॅटरी मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास इलेकट्रीक वाहनां प्रमाणेच पेट घेऊ शकते.

वाचा – महिंद्रा थारने घेतले चक्क पाण्यातल्या बोटीचे रुप, हिमाचल प्रदेशातला वाहतूक कोंडीवर जीवघेणा उपाय

हायब्रीड किंवा इलेकट्रीक वाहन वापरताना काय खबरदारी घ्यावी?

आजच्या युगात तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. गाडीमध्ये थर्मल रनअवे होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते. अनेक सेन्सर्स असतात जे डेटा गोळा करून गाडीचे सर्व भाग सुरक्षित आहेत ना यावर लक्ष ठेऊन असतात. परंतु काही वेळेस सेन्सर्स मध्ये बिघाड असेल आणि गाडीने पेट घेतला तर चालकाला वॉर्निंग मिळत नाही म्हणूनच स्वतः खबरदारी म्हणून वारंवार डॅशबोर्ड वॉर्निंग चेक करत रहा, गाडी १०० किमी चालवल्यानंतर विश्रांती घ्या गाडी थंड होऊ द्या, घाट अथवा ट्राफिक मध्ये एसी वर ज्यास्त लोड देऊ नका आणि महत्वाचं म्हणजे गाडीमध्ये नेहमी फायर एक्सटीगाइजर ठेवायला विसरू नका. गाडीतून जळालेला गंध येत असल्यास लगेच गाडीतून बाहेर पडा. आणि गाडीचा मराठी भाषेत रिव्हिव बघण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा.

सोर्स

 

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version