24 किमी मायलेज देणारी, मारुती सुझुकीची नवीन स्पोर्टलूक स्विफ्ट कार पहिली का?

Published:

नव्या वर्षात ऑटो सेक्टरमध्ये स्वतःच वर्चस्व पुन्हा गाजवण्यासाठी, मारुती सुझुकी इंडिया ने स्वतःची नवी-कोरी कार लाँच करण्याची तयार केली आहे, या कारचे नाव आहे नवीन-जनरेशन फोर, जिचा लुक स्पोर्टी असणार आहे. मारुती सुझुकीची चालू आयकॉनिक स्विफ्ट आणि Baleno या दोन्ही कार ची प्रेरणा घेऊन, या ‘सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह’ कार मध्ये ‘आकर्षक’ असे डिझाइनिंग केले आहे.

  • कूल यलो रेव्ह’ कॉन्सेप्ट मॉडल लाँचिंग
  • सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह: डिझाइन आणि फिचर्स
  • सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह: इंजिन
  • मारुती सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह’ अपेक्षित लाँच तारीख आणि प्रतिस्पर्धी

सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह

स्विफ्टच्या ‘कूल यलो रेव्ह’ कॉन्सेप्ट मॉडल लाँचिंग

मारुती सुझुकीला वाहन बाजारपेठेत ‘तगडी आणि अट्रॅक्टिव्ह कारची कंपनी’ म्हणूनच ओळखलं जात, या कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेतच, पण लोकांच्या सर्वात जास्त पसंदीस पडलेली गाडी म्हणजे स्विफ्ट, म्हणूनच या कंपनीच्या निर्मात्याने चालू स्विफ्ट मध्ये, काही कॉस्मेटिक बदल करत ‘कूल यलो रेव्ह’ ही कॉन्सेप्ट स्विफ्टच्या स्पोर्टियर मॉडेलला दिली. Suzuki swift cool rev ही कॉन्सेप्ट 2024 मध्ये जपान टोकियो मधल्या, ऑटो सलोन मध्ये बघायला मिळणार आहे.

वाचा: या स्मार्टफोन कंपनीने बनवली टेस्लापेक्षा ऍडव्हान्स कार, 800 किमी रेंज आणि 265 चे टॉपस्पीड

सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह डिझाइन आणि फिचर्स

मारुती आयकॉनिक न्यू-जनरल स्विफ्टप्रमाणे, ही स्विफ्टची नवीन आवृत्ती अधिक स्पोर्टी आणि आकर्षक दिसण्यासाठी या गाडीच्या बाहेरील बाजूस ‘कमाल बदल’ करण्यात आले आहेत. 2024 नवीन मारुती स्विफ्टमध्ये ड्युअल-टोन पिवळ्या रंग पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. गाडीच्या बाहेरील बाजूला नवे कोरे स्मोक्ड एलईडी टेल लॅम्प- हेडलॅम्प, ग्राफिक्स नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डोअर पॅनल्सवर डेकल्स,ग्लॉस ब्लॅक कलर फ्रंट स्किड प्लेट आणि ब्लॅक-आउट अलॉय व्हील दिल गेलं आहे.

सुझुकी स्विफ्ट कूल रेव्ह इंजिन

इंजिन बाबतीत माहिती द्यायची झाली तर, 2024 सुझुकी स्विफ्टमध्ये Z12E नावाच, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन्स असणारे 1.2-लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये दिल जाणार आहे, हे इंजिन छोट्या आकारच असून, याची 80bhp ची कमाल पॉवर आणि 108nm चे पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या गाडीच इंजिन 24 किमी प्रति लिटर इतकं चांगले मायलेज देऊ शकतं .

मारुती सुझुकी स्विफ्ट कूल रेव्हची अपेक्षित लाँच तारीख आणि प्रतिस्पर्धी

मारुती सुझुकी नवीन-जनरल स्विफ्ट नव्या वर्षातल्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते अशी शक्यता मांडली जाते. या गाडीची किंमत 6.50 लाख – रु. 10.00 लाख असू शकते. या गाडीचे ह्युंदाई ग्रँड i10 Nios, Citroen C3, Tata Tiago आणि Renault Kwid हे प्रतिस्पर्धी असू शकतील.

वाचा: नवीन बजाज चेतक २०२४ लाँच होणार, मिळणार १२६ किमी रेंज, जास्त टॉपस्पीड आणि फास्ट चार्जिंग

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment