टाटा मोटर्स ऑटो सेल सप्टेंबर जाहीर, तब्ब्ल 82,023 वाहन विकली तरीही ५% ने घसरला

Tata Motors Auto Sales September 2023: मोटर्स ने सप्टेंबर 2023 मध्ये वाहनांची 82,023 इतकी धडाकेबाज विक्री केली आहे, पेसिंजर वाहन विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटो मनुफॅक्चरर बनली आहे

  • टाटा मोटोर्सचा प्रवासी वाहनांचा सेल सप्टेंबरमध्ये 5% घसरला.
  • टाटा मोटर्स बनली देशातील तिसरी मोठी ऑटोमेकर.
  • एक महिन्यात तब्ब्ल 82,023 ववाहनांची विक्री.

टाटा मोटर्स ऑटो सेल सप्टेंबर २०२३

टाटा मोटर्स ने सप्टेंबर 2023 मध्ये वाहनांची 82,023 इतकी धडाकेबाज विक्री केली आहे, पेसिंजर वाहन विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटो मनुफॅक्चरर बनली आहे पण स्वदेशी ऑटोमेकरने प्रवासी वाहन विभागातील सप्टेंबरमध्ये विक्रीत पाच टक्क्यांची घसरण नोंदवली.टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात एकूण 45,317 कार विकल्याचा दावा केला आहे, जे एका वर्षापूर्वी याच महिन्यात नोंदणीकृत 47,864 कारच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी आहे. सेल कमी होण्याचे मुख्य कारण टाटा नेक्सन चे उपडेट मॉडेल लाँच होण्याची वाट पाहत होते.

क्रेटा घेताय? जरा थांबा नवीन CRETA FACELIFT 2024 येतेय! जाणून घ्या वैशिष्ट्ये

विक्री काही टक्क्यांनी कमी झाली असली तरी टाटा मोटर्स लि.ची डीलरशिपवर व्हिसिटर्स ची संख्या सप्टेंबर मध्ये 2 टक्के वाढली असून व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांची एकूण विक्री 82,023 युनिट्सवर पोहोचली आहे. एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री 12% वाढून 39,064 युनिट्सवर पोहोचली. अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री 45% वाढून 12,867 युनिट्सवर पोहोचली. प्रवासी वाहनांची विक्री 5% घसरून 45,317 युनिटवर आली. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री 57% वाढून 6,050 युनिट झाली.

टाटा मोटर्सच्या विक्रीवर परिणाम होण्याचे कारण

पॅसेंजर व्हेईकल्स आणि पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेईकल्स चा सेल सप्टेंबर 2023 मध्ये डिक्लाईन होण्यामागेचे कारण निक्सनचे फेसलिफ्ट असल्याचे मानले जात आहे. खुद्द व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र  यांनी विक्रीच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हटले आहे कि, टाटा नेक्सन, पंच सीएनजी, अल्ट्रोज सीएनजी आणि टीगोर सीएनजी हे नवीन उत्पादन लॉन्च झाल्यामुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पासिंजर वेहिकल्सची विक्री मजबूत राहिली.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री शैलेश चंद्र पुढे म्हणाले, “नवीन लाँच आणि उत्सवापूर्वीच्या ऑफटेकमुळे आर्थिक वर्ष 24 च्या Q2 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री मजबूत राहिली. टाटा मोटर्सने Q2 FY24 मध्ये 1,38,939 कार आणि SUV ची तिमाही विक्री पोस्ट केली, आमच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च तिमाही, Q2 FY23 पेक्षा – 2.7% कमी आहे. आमच्या EV व्यवसायाने मजबूत गती कायम ठेवली आहे आणि वर्षानुवर्षे सुमारे 55% वाढ नोंदवली आहे. Q2 FY24 मध्ये, आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण ट्विन-सिलेंडर CNG ऑफरचा विस्तार Tiago, Tigor आणि Punch या कंपन्यांना केला, ज्यांना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment