TATA Nexon सह वाढली, टाटाच्या ‘या’ टॉप गाड्यांची किंमत

Tata Motors Price Hike: सध्या EV चा जमाना आहे, आणि ईव्ही म्हंटल; कि टाटा मोटर्सची चर्चा होतेचं, TATA motors इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत नेहमीच एक्सपेरिमेंटल राहील आहे. टाटा इंडिया ची नुकतीच ‘Punch EV’ लॉन्च झालीये, जिच्या चर्चेने संपूर्ण मार्केटची हवा टाईट झाली आणि आता टाटा पंच इव्ही नंतर चर्चा होतेय, ती म्हणजे TATA Tiago, Nexon, Harrier आणि Safari मॉडेलच्या ‘वाढलेल्या किंमतीमुळे’, या दरवाढीचा परिणाम टाटाच्या सर्व वाहनांवर होणार आहे.

  • टाटा मोटर्सच्या वाहनांची दरवाढ
  • दोन वर्षातली टाटा मोटर्सनेची वाहनविक्री
  • TATA Punch EV फीचर्स, किंमत
  • टाटा नेक्सॉनची किंमत 11,795 रुपयांने वाढली
  • टाटा पंच, टाटा टीगोरच्या किंमतीत दरवाढ
  • मारुती सुझुकीच्या ग्राहकांना दरवाढीचा फटका

‘या’ तारखेपासून टाटा मोटर्सच्या वाहनांची दरवाढ

Tata Motors-टाटा मोटर्स

लोकप्रिय कार टाटा निक्सन, हॅरियर आणि पंच सारख्या कार बनवणारी कंपनी टाटा, दरवाढीचा निर्णय कंपनीच्या कच्च्या मालाचा वाढलेला खर्च , महागाई आणि उत्पादन खर्चवाढीमुळे घेतला असून हि दरवाढ 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होईल. टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांसह (EVs) इतर प्रवासी वाहनावर हि दरवाढ लागू होत आहे. 0.7 टक्के वाढ Tata Motors च्या वाहनांच्या किमतीत होणार आहे.

या दोन वर्षात Tata Motorsने केली जबरदस्त वाहनविक्री

कोरोनानंतर बाकीच्या कंपन्याप्रमाणे; टाटा मोटरला सुद्धा नुकसानाचा फटका बसला, पण तरीही अडचणींना न जुमानता टाटा मोटर्सने कोरोना नंतरच्या वर्षात 9 टक्के वाढीने जबरदस्त वाहन-विक्री केली. टाटा मोटर्सने 2022 डिसेंबर मध्ये 40,043 युनिट्सची विक्री केली तर, 2023- डिसेंबर मध्ये विक्री 43,470 युनिट्सची विक्री केली.

वाचा: टाटा हॅरियर ईव्हीचा इंटरनेटवर धुमाकूळ

TATA Punch EV फीचर्स, किंमत

टाटा पंच ईव्ही ची Rs.10.99 – 15.49 लाख हि मूळ किंमत असून या 5 सीटर कारमध्ये स्मार्ट, स्मार्ट प्लस, ऍडव्हेंचर, एम्पॉर्ड आणि एम्पॉर्ड प्लस हे व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. एअर प्युरिफायर,10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हवेशीर फ्रंट सीट आणि सनरूफ सपोर्टिंग वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी यासारख्या फीचर्सने भरपूर असणाऱ्या, टाटा पंच ईव्हीमध्ये प्रवाश्यांच्या सेफटीसाठी; सहा एअरबॅग्ज,इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्ड दिले आहेत.

पंच EV मध्ये दोन बॅटरी पॅक दिल्या गेल्या आहेत, ज्यामधली 25kWh बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यांनतर 315 किलोमीटर इतकं अंतर पार करू शकते आणि 35kWh बॅटरी चार्ज केल्यांनतर 421 किलोमीटर रेंज देऊ शकते.

वाचा: ‘5 गॅरेंटेड टिप्स’ ज्यामुळे वाढेल, तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

टाटा नेक्सॉनच्या टॉप मॉडलची किंमत 11,795 ने वाढली

5 प्रकारांमध्ये उपलब्ध असणारी Tata Nexon EV ची किंमत ₹ 13.99 लाखांपासून सुरू होते ते या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 16.85 लाख एक्स-शोरूम पर्यंत जाते. XZ Plus LUX Dark Edition या कारची किंमत 16.85 लाख इतकी असून टाटाच्या नवीन दरवाढीच्या नियमाप्रमाणे या टाटा नेक्सॉनच्या टॉप मॉडलची किंमत 11,795 रुपयांने वाढण्याची शक्यता मांडली जाते.

टाटा पंच, टाटा टीगोरच्या किंमतीत दरवाढ

पंच चे पेट्रोल इंजिन असणारे Adventure MT ही टॉप मॉडल असून, याची 6.9 लाखच्या किंमतीवर 4,263 रुपयांनी किंमत वाढणार आहे तर, टाटा टीगोर XZ Plus Dual Tone CNG या मॉडेलची मूळ किंमत 8.42 लाख असून, या किंमतीत 5,894 रुपयांची वाढ होऊन ही किंमत 8,47,894 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टाटा मोटरसोबत मारुती सुझुकीच्या ग्राहकांना बसणार दरवाढीचा फटका

ऑटोमोटिव्ह उद्योग क्षेत्रात टाटा मोटर्ससोबत, मारुती सुझुकी इंडियाने सुद्धा आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून मारुती सुझुकीच्या वाहनांची दरवाढ, ‘कंपनी उत्पादन खर्च कमी करत वाढ भरून काढण्यासाठी’ केली आहे.

मारुती सुझुकीच्या लोकप्रिय वाहनांमध्ये जिमनी एसयूव्ही, ब्रेझा, मारुती स्विफ्ट आणि ग्रँड विटारा या गाड्यांचा समावेश असून 2023 च्या वर्षात मारुतीच्या वाहनविक्रीत 21 टक्के वाढ झाली आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment