1 जानेवारीपासून बीएमडब्ल्यू इंडिया कार किंमती 2 टक्क्यांनी वाढणार..!

Ajinkya Sidwadkar

Updated on:

BMW India Announces 2% Price Hike: भारतामध्ये नव्या वर्ष्यात अनेक कंपन्या वाहनांच्या किंमतीत वाढ करत आहेत, यात आता बीएमडब्ल्यू ने एंट्री केलीय. बीएमडब्ल्यू इंडिया ने 1 जानेवारी 2024 पासून बीएमडब्ल्यू 2 सिरीज ग्रॅन कूप, बीएमडब्ल्यू 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन, बीएमडब्ल्यू M 340i, बीएमडब्ल्यू 5 Series, बीएमडब्ल्यू 6 Series, बीएमडब्ल्यू 7 Series, बीएमडब्ल्यू X1 अन्य मॉडेल्स 2 टक्क्यांनी महाग होणार आहेत अशी घोषणा कंपनीने अधिकृतरित्या केली आहे.
आगामी वर्षात बीएमडब्ल्यू इंडिया ने इतर वाहन विक्रेत्यांप्रमाणे किंमत वाढवली असून याबाबतीत बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह यांची दुजोरा देत स्पष्ट केले आहे कि, बीएमडब्ल्यू इंडियाच्या संपूर्ण मॉडेल श्रेणी मध्ये किमतीत वाढ करण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असुन, यामध्ये वाढत्याउत्पादन खर्च, मोबिलिटी आणि कच्या मालाच्या दरातील होणाऱ्या चढ उतारांचा विचार करुन, बीएमडब्ल्यू वाहनाच्या किंमती वाढवण्यात येत आहेत.
BMW India

भारतामध्ये विकले जाणारे बीएमडब्ल्यू चे मॉडेल्स

भारतामध्ये आत्ताच्या घडीला बीएमडब्ल्यू चे एकूण 27 मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यापैकी काही मॉडेल्स खालीलपैकी,

 • बीएमडब्ल्यू 2 सिरीज ग्रॅन कूप,
 • बीएमडब्ल्यू 3 सिरीज ग्रॅन लिमोझिन
 • बीएमडब्ल्यू M 340i
 • बीएमडब्ल्यू 5 Series
 • बीएमडब्ल्यू 6 Series
 • बीएमडब्ल्यू 7 Series
 • बीएमडब्ल्यू X1
 • बीएमडब्ल्यू X3
 • बीएमडब्ल्यू X5
 • बीएमडब्ल्यू X7
 • बीएमडब्ल्यू X5
 • बीएमडब्ल्यू X7
 • बीएमडब्ल्यू XM

बीएमडब्ल्यू इंडियाच्या कारमध्ये 2 टक्क्यांनी वाढ

बीएमडब्ल्यू ने नववर्षात केलेल्या दरवाढीच्या घोषणेत जवळजवळ दोन टक्के जी साधारणता एक ते पाच लाखांपर्यंत वाढ केली जाणार आहे. बीएमडब्ल्यू चे सर्वात स्वस्त मॉडल,  X1 SUV असून ह्या गाडीच्या बेसमॉडेलची किंमत ₹ 48.90 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरु होते, बेस व्हेरियंटच्या किमतीत दोन टक्के म्हणजेच ₹ 97,800 इतक्या रुपयांची दर वाढ होणार आहे.

बीएमडब्ल्यू ची सर्वात महाग गाडी बीएमडब्ल्यू XM आहे, ज्याची किंमत 2,60 कोटी आहे आणि या गाडीच्या किंमतीमध्ये 2 टक्के वाढ म्हणजे 5,20,00 पर्यंत इतकी होऊ शकते. येत्या नवंवर्षात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि ऑडी इंडियाने सुद्धा गाड्यांच्या किमतीत वाढ केली असल्याने, आता या गाड्यांच्या दरवाढीच्या यादीत बीएमडब्ल्यू चे ही नाव जोडले गेले आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

वाचा – Ather 450 Apex Booking Start, जाणून घ्या फीचर्स, लाँच आणि डिलिवरी Date

वाचा – Huge Discount On Mahindra: महिंद्रा XUV400 EV वर 4.2 लाख डिस्काउंट, महिंद्राची गाडी घ्यायची सुवर्णसंधी !

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment