Gogoro Electric Scooter: अनलिमिटेड रेंज देणारी मेड इन पुणे ई-स्कूटर लाँच, पहा काय आहे खास

तैवानी इलेकट्रीक टू-व्हिलर निर्माता कंपनी गोगोरो ने मेड इन महाराष्ट्र “क्रॉसओव्हर”  ई-स्कूटरला दिल्ली येथे लाँच केले आहे. हि ईव्ही सध्या गोव्यात आणि दिल्ली येथे B2B ग्राहकांना विकली जाणार असून जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ दरम्यान मुंबई आणि पुणे येथे विक्री साठी उपलब्ध असणार आहे. सामान्य ग्राहकांसाठी गोगोरो क्रॉसओव्हर एप्रिल २०२४ ते जुन २०२४ च्या दरम्यान विक्री साठी उपलब्ध असेल.

गोगोरो कंपनीची क्रॉसओव्हर का खास आहे आणि या गाडीची संपूर्ण इंडस्ट्री मध्ये इतकी चर्चा का आहे याबद्दल या लेखात जाणून घेऊया.

Gogoro Crossover GX250, 50 & S – डिजाईन, स्पेसिफिकेशन्स, रेंज, बॅटरी आणि मोटर

गोगोरो एक तैवान बेस कंपनी असून अनेक दिवसांपासून ते भारतीय मार्केट मध्ये त्यांचे बॅटरी स्वॅप स्टेशन्स चे जाळे उभे करत असून फायनली १२ डिसेम्बर २०२३ रोजी त्यांनी मल्टी पर्पज इलेकट्रीक वेहिकल क्रॉसओव्हर लाँच केली आहे. हि गाडी माल वाहून नेणाऱ्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन डेव्हलप केली गेली असून गाडीत ३ मॉडेल्स आणि कस्टमायजेशन्स चे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

गोगोरो क्रॉसओव्हरचा निर्माण “ऑल-टेरेन फ्रेम” या रि-डिजाईन केलेल्या फ्रेम वर केला गेला असून अनेक स्टोरेज ऑपशन्स, रायडींग ऑपशन्स आणि कस्टमायझेशनचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्रॉसओव्हर मध्ये टोटल तीन व्हेरिएंट्स लाँच केले गेले असून यामध्ये GX250, 50 आणि S हे व्हेरिएंट्स आहेत.

gogoro crossover

गोगोरो क्रॉसओव्हरची डिजाईन ग्राहकांना जास्तीत जास्त माल वाहून नेता यावा अशी बनवण्यात आली आहे. पुढच्या बाजूस टेलिस्कोपिक फोर्क शॉक ऍब्जॉर्बर्स आणि पाठीमागील बाजूस ड्युअल शॉक ऍब्जॉर्बर्स इन्स्टॉल केले गेले आहेत. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 176 mm इतका दिला असल्याने या गाडीला टू -व्हिल एसयूव्ही म्हटले गेले आहे.

वाचा – फक्त ९० हजारांत मिळणारी ओलाची हि इलेक्ट्रिक स्कूटर बनली होंडा ऍक्टिवाचा कर्दनकाळ, वाचा फीचर्स

क्रॉसओव्हर मध्ये पाय ठेवायची जागा सपाट आणि रुंद देण्यात आली आहे ज्याने ग्राहकांना तिथे देखील सामान ठेवण्याची मुभा मिळेल. या व्यतिरिक्त गाडीची डिजाईन रगिड आणि मजबूत असून सगळे बॉडी पॅनेल्स मोठे आणि जाड देण्यात आले आहेत.  गाडीच्या फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजून १४ इंच व्हील आणि डिस्क ब्रेक दिले गेले आहेत. स्प्लिट सीट्स दिले असल्याने रायडर आणि पिलियन आरामात प्रवास करू शकतात. याशिवाय GX250 या मॉडेल मध्ये खास mounting point extension system दिले आहेत ज्यामध्ये तब्बल 26 locking points आणि चार कार्गो एरिया दिला आहे ज्यामुळे जास्तीत जास्त माल वाहून नेता येतो.

वाचा – Ather 450 Apex Booking Start, जाणून घ्या फीचर्स, लाँच आणि डिलिवरी Date

अनलिमिटेड रेंज मिळणार

ईव्ही मध्ये पुढे आलेली हेड लाईट, गोल-शेप असणारी डिजाईन आणि तीन कलर टोन हि या गाडीची खासियत आहे. गाडीत सेंटर स्टॅन्ड, साईड स्टॅन्ड, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये छोटा कलर डिस्प्ले दिला आहे.  गोगोरो क्रॉसओव्हर मध्ये 2.5 किलोवॅट डायरेक्ट-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर दिली आहे ज्यामुळे 60 किमी/ता पेक्षा जास्त वेग गाठू शकते. कंपनीचा दावा आहे की एका चार्जवर 111 किमी कव्हर करू शकते आणि कंपनीचे प्रत्येक  हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोल पंपमध्ये स्वॅप स्टेशन्स असणार आहेत ज्यावर जाऊन ग्राहक काही मिनिटात डिजचार्ज बॅटरी चेंज करून फुल चार्ज बॅटरी घेऊ शकतो ज्याने ग्राहकाला अनलिमिटेड किलोमीटर हि गाडी चालवता येणार आहे.

वाचा – Honda Activa Electric Scooter जानेवारी मध्ये होणार लाँच, पहा रेंज आणि टॉपस्पीड

Crossover ModelBattery Capacity
Crossover GX2502.55 kWh Li-ion
Crossover 505 kWh Li-ion
Crossover S6.4 kWh & 7.2 kWh Li-ion

 

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment