Ather 450s Electric scooter Price: ऍक्टिवा पेक्षा स्वस्त ई-स्कूटर तब्बल 37 हजारांचा डिस्काउंट, पहा तुमच्या शहरांतील किंमत

Ather 450s electric scooter Price Cut: देशातील अग्रगण्य इलेकट्रीक स्कूटर मॅनफॅक्चरर कंपनी अथर एनर्जी ने अथर एपेक्स लॉन्च केल्या नंतर लगेच त्यांच्या बेस व्हेरिएंट 450s या मॉडेलवर तब्बल 37 हजार रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला असून कंपनीने देशातील सर्व राज्यात ही कपात केल्याचे स्पष्ट केले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, नागपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या शहरांत Ather 450s या मॉडल ची on-road price बद्दल जाणून घेऊ इच्छित आहात तर हा लेख नक्की वाचा.

ठळक मुद्दे – 

  • 450S वर किमतीत 37,700 रुपये इतकी मोठी कपात
  • हे मॉडल दिल्लीमध्ये ₹97,500 किमतीत उपलब्ध
  • OLA s1 X+ ला टक्कर देण्यासाठी ग्राहकांना सर्वात मोठा डिस्काउंट

Ather 450s Discount: महाराष्टातील व रोड प्राईज

बेंगळुरूस्थित एथर एनर्जीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या एंट्री-लेव्हल मॉडेल 450S वर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या कंपनीने 450S या बेस मॉडेलची किंमत तब्बल ₹25,000 तर बैटरी वॉरंटी ची किंमत ₹ 5,498 आणि प्रो पॅकची किंमत तब्ब्ल ₹17,700 ने कमी केली आहे यामुळे 450S हे मॉडल तुम्ही 37,700 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंट सह खरेदी करू शकता. या डिस्कॉउंटचा महाराष्ट्रात फायदा घेण्यासाठी तुम्हाला शोरूमला भेट देण्याची आवश्यकता नाही, अथरच्या ऑफिशल वेबसाइटला भेट देऊन तुम्ही गाडीवर डिस्काउंट मिळवू शकता.

वाचा – Tata Punch EV: फक्त २१ हजारांत करा बुक, कलर्स आणि व्हेरिएंट्स तपशील लॉन्चपूर्वी उघड

Ather 450s ऑन-रोड प्राईज – 

450s या मॉडेलची एक्स-फैक्टरी किंमत ₹1,56,199 आहे. यातून फेम 2 सबसीडी ₹ 21,041 आणि स्कूटर डिस्काउंट ₹ 25,002 वजा करुन एक्स-शोरूम किंमत ₹1,10,157 होते. यामध्ये इन्शुरन्स ₹6,853 आणि आरटीओ चार्जेस जमा केल्यास 450s या बेस मॉडल ची महाराष्ट्रातील किंमत होते फक्त ₹1,17,268 आणि तुम्हाला प्रो पैक मॉडल घ्यायचे असल्यास बेस किमतीवर ₹ 22,210 ऐवजी फक्त  ₹9,999 आणि एक्स्ट्रा बैटरी वॉरंटी साठी ₹5,499 ऐवजी फक्त 1 रुपया भरावा लागणार आहेत ज्याने Ather 450s प्रो पैक मॉडल ची महाराष्ट्रातील ऑन-रोड किंमत ₹1,27,267 द्यावी लागेल.

वाचा – Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

फायनान्स स्किम उपलब्ध – 

Ather 450s चे बेस अथवा प्रो पैक मॉडल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 5.99 %इतक्या कमी व्याजदराने एक्सिस बँक, एचडीएफसीबँक, आयडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स सारख्या बँकाकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. ग्राहक झिरो डाउन पेमेंट सह 5 वर्ष्याची परत फेड कालावधी घेऊ शकतात आणि ₹ 2,046 प्रति महिना इतका कमी हफ्ता भरावा लागेल.

वाचा – मारुतीच्या या स्मार्ट हायब्रीड गाडीने घेतला पेट, रिअल-इस्टेट व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

Ather 450s फिचर्स

450s ही अथर एनर्जी ची सर्वात बेस इलेक्ट्रिक स्कूटर जरी असली तरी यामध्ये बरेच एडवांस फिचर्स दिले आहेत जसे की ऍप कनेक्टिविटी, 90 किमी टॉप स्पीड, नॅविगेशन, डिस्क ब्रेक, अल्युमिनियम बॉडी.

अथर च्या या स्कूटर मध्ये 2.9 kWh चा बॅटरी पॅक दिला जातो ज्याने 115 किमी क्लेम आणि 90 किमी रियल रेंज मिळते. 5.4 kw पीक पॉवर असणारी pmsm बेल्ट ड्राईव मोटर दिली जाते ज्याने 90 किमी टॉप स्पीड मिळतो. याशिवाय इको, राइड आणि स्पोर्ट्स असे मॉड दिले जातात याशिवाय गाडी रिव्हर्स घेण्यासाठी सुद्धा एक मोड दिला जातो.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment